चाळिशीनंतर शरीरात होणारे बदल थांबवण्यासाठी सहा उपाय

चाळीशीनंतर वाढणारे वजन नियंत्रित ठेवण्याचे ६ प्रभावी मार्ग चाळिशीनंतर शरीरात होणारे बदल थांबवण्यासाठी सहा उपाय

शरीराचे वाढते वजन आणि लठ्ठपणा ही जगभरात एक मोठी समस्या बनली आहे.

वजन जास्त प्रमाणात वाढल्याने मधुमेह, रक्तदाब, पर्यायाने हृदयविकार या विकारांची भीती अधिक प्रमाणात वाढते.

याशिवाय कर्करोग आणि अतिरिक्त वजन याचा नजीकचा संबंध असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे.

कर्करोगामुळे मरण पावलेल्या रुग्णांपैकी १४ टक्के पुरुष आणि २० टक्के स्त्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक वजन असलेल्या होत्या असे एका पाहणीत आढळून आले आहे.

शारीरिक संबंधांवरही अतिरिक्त वजन आणि लठ्ठपणाचा परिणाम होतो.

जास्त वजनामुळे केवळ शारीरिक व्याधीचा जडतात असे नव्हे, तर मानसिक दौर्बल्यही निर्माण होण्याचे शक्यता असते.

लठ्ठ माणसे अनेकदा चेष्टेचा विषय ठरतात. लठ्ठ माणसांमध्ये अनेकदा न्यूनगंड निर्माण होतो.

त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो आणि त्याचा मोठा परिणाम एकंदर व्यक्तिमत्वावर होत असतो.

बरेच लोक तरूण वयातच वजनाने ‘भारी’ असतात.

वाढत्या वयाप्रमाणे त्यांचे वजनही वाढत जाते. वयाच्या चाळीशीनंतर वजन वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

आपल्या संप्रेरक पातळीतीळ बदल, शारीरिक हालचालींचे प्रमाण कमी होणे, ताणतणाव कमी होणे झोपेचे प्रमाण कमी होणे यामुळे चाळिशीनंतर वजन वाढू लागते.

वाढते वजन हे अनेक प्रकारच्या शारीरिक व्याधींना निमंत्रण देणारे ठरते.

त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे ही निरोगी राहण्यासाठी कळीची बाब आहे.

वाढलेले वजन कमी करणे ही बऱ्यापैकी अवघड गोष्ट आहे. मात्र, ते अगदीच अशक्य नाही.

वजन कमी करण्यासाठी काही प्रभावी मार्ग आहेत. त्याचा अवलंब करून आणि त्या दृष्टीने अनुकूल असे आहाराचे नियिजन करून आपण वजन कमी करू शकतो.

वयाच्या चाळीशीचा टप्पा गाठल्यानंतर कर्बयुक्त आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते.

कर्बयुक्त आहार हे शरीराचे चलनवलन सुरळीत ठेवण्यासाठीचे इंधन आहे.

त्यामुळे कर्बयुक्त आहाराचा पूर्ण त्याग करणे उपयोगाचे ठरणार नाही.

कर्बयुक्त पदार्थांमधून आपल्या शरीराला पोषक द्रव्य मिळत असतात.

काही वेळा ते वजन कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरते.

मात्र, त्यासाठी योग्य प्रमाणात कर्बयुक्त आहार घेणे आवश्यक आहे.

त्यासाठी विपुल प्रमाणात फायबर असलेले कर्बयुक्त पदार्थ सेवन करणे इष्ट ठरेल.

२) आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवा

वजन कमी करण्यासाठी भाज्या किंवा पालेभाज्या हा उत्तम आहार आहे.

भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषणमूल्य असते.

त्यामध्ये अनावश्यक कॅलरीज असत नाहीत.

भाज्यांच्या सेवनामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियमित राखण्यास मदत होते.

त्याशिवाय जेवणानंतर आपल्याला परिपूर्णतेची भावना देखील मिळते.

भाज्यांचे प्रमाण आहारात वाढल्यामुळे उच्च कॅलरीयुक्त पदार्थ कमी प्रमाण कमी होण्यास मदत होते.

३) मद्यपान टाळा

सध्याच्या काळात मद्यपान करणे, पार्ट्यांना हजेरी लावणे हे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाऊ लागले आहे.

मात्र, मद्यपानामुळे वेगाने वजन वाढते.

विशेषत: चाळिशीनंतर हा धोका अधिक असतो.

बहुतेक अल्कोहोलयुक्त पेयांमध्ये कॅलरीजचे प्रमाण मोठे असते.

त्यामुळे आपले वजन वेगाने वाढू शकते.

त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर मद्यपान पूर्णतः बंद करणेच उत्तम ठरेल.

त्यामुळे शरीरातील कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित करणे शक्य होणार आहे.

४) शारीरिक हालचालींवर भर द्या

जसजसे वय वाढत जाते तसतसे शारीरिक श्रम, व्यायाम आणि एकूणच हालचालींचे प्रमाण कमी होत जाते. त्याचा परिणाम म्हणून वजनात वाढ होते.

वजन आटोक्यात आणण्यासाठी आणि घटविलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमितपणे व्यायामासाठी वेळ काढणे गरजेचे आहे.

रोज ठराविक वेळेला चालणे, योगासने, सायकल चालविणे, शक्य असेल तर आठवड्यातून काही दिवस पोहायला जाणे अशा प्रकारचे व्यायाम करणे आणि त्यात सातत्य ठेवणे महत्वाचे आहे.

व्यायामात अनियमितता असेल तर वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही.

घरच्या घरी व्यायाम करण्यासाठी दहा उत्तम Android Apps!

५) ताणतणाव दूर ठेवा

सध्याच्या काळात मानसिक ताणतणावांचे प्रमाण वाढते आहे.

चाळिशीनंतरच नव्हे तर सर्वच वयोगटातील लोकांसाठी मानसिक तणाव हे वजन वाढण्याचे एक प्रमुख कारण बनले आहे.

तणावाचे व्यवस्थापन करता आले नाही तर शरीरात भूक वाढविणाऱ्या संप्रेरकांचे प्रमाण वाढते.

त्याचा परिणाम म्हणून आहार; पर्यायाने वजनही वाढते. आपण आपले मन शांत ठेवणे आवश्यक आहे.

त्यासाठी ध्यानधारणा, विविध प्रकारचे छंद जोपासणे, संगीता, विविध कलांचा आस्वाद घेणे, आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टीत मन गुंतवणे आवश्यक आहे.

आणि अर्थातच मनाचेTalks वाचत राहाल तर ताण-तणावांचे नियोजन करणारे लेख नियमितपणे वाचायला मिळतील.

ताणतणाव कमी करण्याचे उपाय वाचा या लेखात

६) पुरेशी झोप घ्या

बहुतेकदा झोपेचा संबंध अळशीपणाशी लावला जातो आणि लठ्ठ, ‘वजनदार’ माणसे आळशी असल्याचे मानले जाते. मात्र, झोपेचे प्रमाण पुरेसे नसले तरीही त्याचा परिणाम म्हणून वजनात वाढ होते आणि लठ्ठपणा येऊ शकतो.

बर्‍याच संशोधनात झोपेचा कालावधी आणि चयापचयातील नकारात्मक बदल यांच्यातील संबंध स्पष्ट करण्यात आले आहेत.

त्यामुळे झोपेच्या अभाव बऱ्याचदा वजन वाढवू शकतो.

त्यामुळे कोणत्याही वयाच्या व्यक्तीने पुरेशी झोप घेतली पाहिजे.

विशेषतः चाळिशीनंतर तर याबाबतचा कटाक्ष पाळणे हिताचे आहे.

गाढ झोप लागण्यासाठी हे उपाय करून बघा

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!