ओव्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

तब्येतीच्या अनेक छोट्या-मोठ्या तक्रारींवर उपाय हे आपल्या घरातच दडलेले असतात.

आपल्या रोजच्या वापरात असे अनेक घटक असतात जे तब्येतीसाठी केवळ फायदेशीरच नसतात, तर अनेक समस्यांवर उपाय सुद्धा असतात.

पोटदुखी, घसादुखी, खोकला, मळमळ अशा त्रासांवर तर हे उपाय हमखास यशस्वी ठरतात.

अशाच आपल्या नेहमीच्या वापरातला, काही पदार्थात आवर्जून घातला जाणारा पदार्थ म्हणजे ओवा.

ओवा हा पोटदुखीवर एक हमखास उपाय आहेच पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्याचा अनेक समस्यांवर घरगुती उपाय म्हणून वापर केला जाऊ शकतो.

आपल्या हाताशी असे घरगुती उपाय असतील तर त्याचा आपल्याबरोबरच, आपल्या आजूबाजूच्यांना सुद्धा फायदा होत असतो.

म्हणूनच आज या लेखात ओवा कोणत्या तक्रारी असतील तर वापरावा व कसा वापरावा हे सांगितले आहे.

यामुळे तुमच्या अनेक तब्येतीच्या तक्रारी दूर व्हायला मदत होईल.

ओव्याचे घरगुती उपचारांसाठी उपयोग.

1. बसलेला आवाज मोकळा करण्यासाठी

वातावरणात बदल झाला की बऱ्याचदा व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्दी, खोकला होतो.

अशावेळेस घसा बसून आवाज बदलतो.

बोलायला त्रास होतो. सर्दीमुळे आवाज बसला असेल तर तो मोकळा करण्यासाठी ओव्याचा वापर करता येतो.

यासाठी बोराच्या झाडाची काही पाने आणि ओवा एकत्र करून पाण्यात घालावा व ते पाणी उकळू द्यावे.

पाणी थोडे थंड झाले की ते गाळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

घसा बसून आवाज बदलला असेल, बोलताना त्रास होत असेल तर या उपायामुळे आवाज मोकळा व्हायला मदत होईल आणि घसादुखी सुद्धा कमी होईल.

2. अर्धशिशी

अर्धशिशी, म्हणजेच मायग्रेनमध्ये एकाच बाजूचे डोके, मान दुखते.

या आजारात दुखण्याची तीव्रता खूप जास्त असते.

काहींना दोन तीन दिवस मायग्रेनचा सलग त्रास होऊ शकतो.

मायग्रेनचे दुखणे कमी होऊन लवकर आराम मिळावा यासाठी ओव्याचे पाणी फायदेशीर असते.

मायग्रेनचा त्रास होत असेल तर साधारण अर्धा लिटर पाण्यामध्ये एक चमचा ओवा घालून ते पाणी उकळून, गाळून ठेऊन द्यायचे.

दिवसभर हे थोडे थोडे ओव्याचा अर्क असलेले पाणी पीत राहिल्याने दुखणे कमी होते.

3. सांधेदुखीवर गुणकारी

सांधेदुखीच्या त्रासावर हमखास उपाय म्हणून ओव्याचा वापर केला जाऊ शकतो.

एक वाटी तिळाच्या तेलात एक चमचाभर ओवा घालून तेल चांगले तापवून घ्यावे.

सांधेदुखी कमी होण्यासाठी ते तेल दुखऱ्या सांध्यांना दिवसातून एकदा लावल्याने नक्की फरक दिसून येतो आणि दुखणे कमी व्हायला मदत होते.

4. त्वचेच्या आरोग्यासाठी

त्वचेवर उन्हामुळे काळे डाग पडले असतील, वयानुसार त्वचेवर सुरकुत्या आल्या असतील तर त्या कमी होऊन त्वचा आरोग्यपूर्ण होण्यासाठी ओव्याचा उपयोग केला जाऊ शकतो.

दोन ते तीन चमचे काकडीच्या रसात थोडा ओवा कुटून मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्याला व मानेला व्यवस्थित लावून घ्यावे.

पाच ते दहा मिनिटांनी स्वच्छ धुवून घ्यावे.

यामुळे त्वचा उजळ व टवटवीत दिसायला फायदा होईल. त्वचेवरचे डाग कमी होतील.

5. मुकामारावर उपयुक्त

कधी पडल्यावर हाता पायाला, कमरेला जखम न होता मुकामार लागतो.

हा मुकामार बरा व्हायला बरेच दिवस जातात.

यावर जर सूज असेल तर जास्त वेदना होतात.

जास्त मार लागला असेल तर काळे निळे डाग पडतात.

अशा मुकामारावर जर हळद आणि ओवा याची पुरचुंडी करून बांधली तर दुखणे कमी होते.

यामुळे सूज उतरून व डागाचा काळपट निळा रंग सुद्धा कमी होऊन लवकर आराम मिळतो.

यासाठी एका स्वच्छ सुती कापडामध्ये एक चमचा हळद आणि अर्धा चमचा ओवा घालून ती लागलेल्या ठिकाणी बांधून ठेवावी.

6. तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी

बऱ्याचदा खाण्यात असे अनेक पदार्थ असतात, जसे की कांदा, लसूण ज्यामुळे जेवणानंतर तोंडाला खराब वास येतो.

कधीकधी दात किडून त्यात बॅक्टेरीयाची वाढ होते व यामुळे तोंडाला दुर्गंधी येते.

कारण काही असो, तोंडाची स्वच्छता महत्वाची आहेच.

त्यासाठी दात आणि जीभ व्यवस्थित स्वच्छ ठेवली पाहिजे.

तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे इतर उपाय मागे एका लेखात दिले आहेत.

पण कधीकधी बाहेर असताना किंवा मिटिंगला जाण्यापूर्वी जर जेवण झाले असेल व दात घासणे शक्य नसेल, तर ओवा घालून उकळलेले पाणी बरोबर ठेवावे.

या पाण्याने दोन ते तीन वेळा चूळ भरल्याने तोंडाची दुर्गंधी निश्चितपणे कमी होते.

7. गॅस कमी करण्यासाठी

जर गॅस होऊन पोटात दुखत असेल तर त्यावर ओवा हा एक अत्यंत सोपा उपाय आहे.

यासाठी दोन चिमूट ओवा चावून खावा व त्यानंतर कोमट पाणी प्यावे.

यामुळे पोटातले दुखणे लगेच कमी होते व गॅस कमी व्हायला मदत होते.

गॅस होऊन पोटात दुखू नये यासाठी तळलेल्या पदार्थांमध्ये चिमूटभर ओवा घालावा, म्हणजे हे पदार्थ बाधत नाहीत.

8. सर्दीवर गुणकारी

सर्दी झाल्यावर नाक चोंदले जाते.

अशा वेळेस, सर्दी साठून राहिल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.

यासाठी थोडा ओवा तव्यावर गरम करून त्याची धुरी घेतली तर नाक मोकळे होते आणि सर्दी कमी व्हायला मदत होते

ओव्याचे हे घरगुती उपाय करायला अत्यंत सोपे आहेत.

ऐन वेळेला, अडचणीच्या वेळेस पटकन उपयोगी येतील असे हे उपाय करून बघितल्याने काहीच अपाय सुद्धा होणार नाही.

चिमूटभर ओवा तुमच्या मदतीला किती प्रकारे येऊ शकतो ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना जरूर शेयर करा!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय