महानता गाठण्याच्या ७ क्लृप्त्या

marathi prernadayi vichar

‘महान म्हणजे काय गं आई’, माझा मुलगा मला विचारत होता.

सांगितलं तर कळावं असं त्याच वयही नाही.

म्हटलं जो सगळ्यांशी चांगला वागतो, कोणाला त्रास देत नाही, जमलं तर मदत करतो, सगळ्यांना हवाहवासा वाटतो तो महान.

सोपं करून सांगा, नाही तर अवघड! अर्थ तर तोच दडलेला आहे ना…

तुमच्या आमच्या भाषेत महान म्हणजे काय????

खूप पैसा, वय जास्त, मोठं कुटुंब सांभाळणारी व्यक्ती, मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती म्हणजे महान का??

असं असेल तर महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, कोलंबस, कोपर्निकस, संत ज्ञानेश्वर, दादासाहेब फाळके, वर्गिस कुरियन, सावित्रीबाई फुले हे काय फक्त इतक्या थोडक्या गोष्टींमुळे महान म्हटले जातात का??

या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अशा कोणत्या गोष्टी होत्या म्हणून त्यांना आपण महान म्हणतो??

बरेच जण अशी दिवास्वप्न पाहतात की मी अमुक तमुक केलं म्हणजे मी महान झालो.

माझा मोठेपणा सगळ्यांनी मान्य करायलाच हवा असा भलताच अट्टाहास….

अशी महानता साध्य करणं अशक्य असतं असं नाही.

पण त्यासाठी काही अंगभूत गुण असावे लागतात.

तर काहीजण प्रयत्नांती ते साध्यही करतात.

त्यासाठी सकारात्मक ध्येय तुमच्यासमोर स्पष्ट असलं पाहिजे आणि ते गाठण्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत.

काही गोष्टींचा त्याग करून काही गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे.

अडथळे येणार त्यावर मात केली पाहिजे.

आणखी अशा कोणत्या क्लृप्त्या आहेत ज्या आपल्याला महान व्हायला मदत करतील ते या लेखात पाहुया.

१. तुम्हाला मिळालेली दैवी देणगी शोधा :

आपण जन्माला आलो म्हणजे आपल्यात काही गुण अवगुण हे असणारच.

मग आपल्यातले असे गुण शोधा त्यांना जोपासा.

ज्या चांगल्या गोष्टींमुळे आनंद मिळतो, समाधान मिळतं त्या नेहमी केल्या पाहिजेत.

ध्येय गाठण्यासाठी स्वतःची तत्व ठरवा, त्याप्रमाणे चालत रहा.

अडचणी येतील त्यावर मात करा.

स्वतःबद्दल वाईट मत मिळालं तर ते शांतपणे ऐकून स्वतःमध्ये योग्य बदल करा.

२. नेमकेपणाने उद्दिष्ट ठरवा :

तुम्हाला नेमकं काय हवं आहे, काय करायचं आहे, त्यासाठी तुमच्याकडे काय आहे ते नीट बघा.

आपल्या कुवतीनुसार या गोष्टी केल्या की अवघड असं काही नसत.

३. ब्रम्हांडाच्या शक्तीवर किंवा देवावर विश्वास ठेवा:

आपण कायमच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या या जगाशी जोडले गेलो आहोत.

त्यामुळे आपण इतरांशी कसे वागतो, बोलतो तशीच प्रतिक्रिया आपल्याला मिळणार.

कधीतरी इतर लोक आपल्याशी कसे वागतात त्यातून आपल्याला शिकता आलं पाहिजे.

त्यासाठी इतरांचे तुम्हाला आभारच मानायला हवेत.

कोणतीही कृती करण्यापूर्वी विचार करा.

इतरांशी कोणत्या गोष्टी बदलाव्या, कोणत्या टाकाव्या ते नीट लक्षात घ्या.

इतरांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली तरी ती शांत आणि संयमाने स्वीकारा.

४. निर्भिडपणे मर्यादांची चौकट ओलांडा :

खरंतर माणूस जन्माला येतो तेव्हा अशी कोणतीही बंधन त्याच्यावर नसतात.

पण जेव्हा समाजात मिसळायला सुरूवात होते तेव्हा त्याच्यावर बंधनं येऊ लागतात.

कोणाशी बोलावं, कसं वागावं, पेहराव कसा असावा, अशा अनेक काय करावं आणि काय करू नये या गोष्टी, काही उपयुक्त तर काही अनावश्यक.

उपयुक्त बंधन सांभाळून अनावश्यक बंधनांना मोडून पुढे जाता आलं पाहिजे.

अशा वेळी कोण काय म्हणेल यापेक्षा ते किती योग्य आहे हे पक्क समजलं पाहिजे.

आत्मविश्वास ठेवून इतरांना पटवून देता आलं पाहिजे. यासाठीच निर्भिडपणा हवा.

५. तुमच्या गुणांचा इतरांनाही उपयोग होऊ दे :

महान होण्यासाठी ध्येय निश्चित हवं.

ध्येय गाठण्यासाठी योग्य मार्ग हवा. या मार्गावरून जात असताना उत्तम गोष्ट करण्याचा प्रयत्न करा. केवळ परिपूर्ण गोष्ट नाही.

परिपूर्णता ही अनुभवातून येते.

मग ते अनुभव चांगले वाईट कोणतेही असोत.

उत्तम गोष्टी स्वतःपासून सुरू करायच्या असतात. लोक त्यातून शिकतात.

मग परिपूर्णता अपोआपच येते.

तुम्हाला मिळालेली शिकवण, अनुभव, विचार यांचा इतरांना उपयोग होऊ दे.

६. पुढच्या पिढ्यांशी संबंध दृढ करा :

a. पुढच्या पिढीतल्या मुलांशी सतत संवाद साधा. त्यांना विश्वासात घ्या. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे.

b. त्यांना बरोबर घेऊन काम करायला लागा. स्वयंसेवक म्हणून त्यांना संधी द्या.

c. तुमचा अनुभव, तुमचं ज्ञान त्यांच्यात वाटा.

d. अनुभवांची योग्य मांडणी करा.

e. पुढच्या पिढीला चांगल्या गोष्टींसाठी उत्तेजन द्या.

f. मुलांच्या स्वप्नांना, ध्येयांना पाठबळ द्या. ते गाठण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.

७. तुम्ही हे सगळं ‘का’ करताय ते विसरु नका :

ध्येय गाठताना अनेक अडचणी येतात, थकवा येतो, उत्साह कमी होतो तेव्हा स्वतःला बजावत रहा मी हे सगळं का करतोय??

हा प्रश्न तुमची मरगळ झटकून टाकेल, तुम्हाला भानावर आणेल, ध्येयाचा पाठपुरावा करायला ऊर्जा मिळेल.

हे सात मार्ग अर्जुनाच्या रथाचे अश्व आहेत असं समजा. त्यावर खुशाल स्वार व्हा.

तुमचं कर्तृत्व पाहूनच लोक तुम्हाला महान समजतील.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

2 COMMENTS

 1. आपल्या प्रत्येकाला महान बनण्यासाठी खुप महत्वच्या, सुरेख टीप आहेत यातील थोड्या थोड्या टीप आपण आपल्या जीवनात अंमलात आणायला सुरवात केली की आपला प्रवास महानतेचा दिशेने सुरु होईल हे मात्र नक्की.
  मनाचे talks टीम चे मनपूर्वक धन्यवाद.

  • #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.

   सर्व लेख नियमितपणे पोहोचण्यासाठी मनाचेTalks चा व्हाट्सएप नंबर, 8308247480 तुमच्या डिव्हाईस मध्ये सेव्ह असू द्या.

   तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.

   त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेल्या तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.