जीवन निर्मिती चा प्रवास… अनंताकडून अनंताकडे…

हा प्रवास समजून घेण्याची प्रगल्भता, न आपल्याकडे आहे न ती समजून घ्यायला वेळ. ज्याला हा महोत्सव समजला त्याने निसर्गाच्या ह्या अनंताकडून अनंताकडे जाणाऱ्या प्रवासाचा खरा अनुभव घेतला असं मी म्हणेन.

माणसाची निर्मिती हा निसर्गाचा चमत्कार नाही का? असा विचार अनेकदा मला पडतो. ह्या निर्मितीमध्ये किती गोष्टी अश्या जुळून येतात कि त्याचा विचार आपण कधीच करत नाही. अनंताकडून सुरु होणारा (निर्मितीच्या अनेक शक्यतांमधून) हा प्रवास अनंताकडे (निर्मितीच्या अनेक शक्यतांकडे) जाताना आपल्याला जाणवत सुद्धा नाही इतकं ते सहज आहे. ते सहज आहे म्हणून त्याचं आपल्याला काही वाटत नाही न कधी जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो.

माणसाची निर्मिती होण्यासाठी किंवा एकूणच प्रत्येक सजीवात त्याच्या पुढल्या पिढीची निर्मिती करण्याची सोय निसर्गाने केली असते. निसर्गाला खरे तर हि जाणीव कोणत्याही सजीवात आणि मानवात कोण्या एका जिवाला देता आली असती पण त्याने तसं न करता त्याचे दोन भाग करत अपूर्णांक ठेवत दोन वेगळ्या जीवांची निर्मिती प्रत्येक सजीवात केली. माणूस हा त्यात सर्वात जास्त प्रगल्भ असलेला सजीव. मेंदू सोबत, विचार, मन आणि भावना ह्यांची मिळालेली जोड मानवाला अजून एका वरच्या पातळीवर ह्या सर्व घटनांना सामोरे जाण्याची शक्ती देते. म्हणून सजीव निर्मितीच्या क्रिया ह्या फक्त निर्मिती पुरती स्तिमित न रहाता त्याच्या वरच्या पातळीवर जायला हव्यात. पण अनेकदा आपल्या शक्तींचा माज झालेला माणूस आपल्याच शक्ती विसरून प्राणी बनतो तेव्हा निसर्ग मनातल्या मनात आपल्या निर्मिती वर रडत असेल.

दोन अपूर्णांक एकत्र येतात तेव्हा सम-भोग ह्या पलीकडे त्यात दोन मन, दोन मेंदू, दोन भावनिक आंदोलन, दोन शरीर आणि दोन आत्मा सगळच एकरूप होत असतं. निसर्ग ह्या सगळ्यासाठी किती प्रचंड तयारी करतो ह्याचा माणूस म्हणून आपण कधी विचार करतो का? सेक्स किंवा समागम किंवा संभोग अशी कितीहि नावं दिली तरी अतुच्य पातळीवर होणारं हे मिलन किती खोलवर असते हे किती लोकांना कळते. एका मासिक पाळी पासून सुरु होणाऱ्या प्रवासासाठी शरीर प्रत्येक महिन्यात एक नवीन कवडसे धरते. त्यात हि निर्मिती अत्युच्य पातळीवर व्हावी आणि त्या क्षणाचा आनंद अलौकिक व्हावा ह्यासाठी स्त्री च्या शरीरात अनेक बदल होत असतात. अगदी हार्मोन्स पासून ते भावनिक गरजेपर्यंत. एक छोटासा स्पर्श, मिठी ते शरीरसुख ह्या सगळ्या शारीरिक अनुभवा पलीकडे असलेली स्त्री ची भावनिक गरज मेंदू शरीर स्पर्शातून निर्माण होणाऱ्या संप्रेरकाना भावनिक पातळीवर बदलून एका वेगळ्या उंचीवर नेत असते. म्हणजे बघा शरीरसुख हे नगण्य किंवा निदान महत्वाचे नाही असं म्हणणारी स्त्री त्या एका स्पर्शासाठी किती आतुर असते. हे मन आणि मेंदू ह्यांच्या एकरूप होण्याशिवाय शक्यच नाही. हे सगळे आपल्या नकळत होत असते.

पुरुषाच्या बाबतीत तर शरीरावर भुलणारा पुरुष सुद्धा समागमाच्या त्या अत्युच्य पातळीवर डोळे बंद करून घेतो. हे सहज होते. ज्या नेत्रसुखासाठी तो सतत धडपडत असतो ते सुख समोर असताना आणि स्वतः त्या निर्मितीच्या टोकावर असताना डोळे बंद करून दृष्टीपलीकडे आनंद देणारी यंत्रणा निसर्गाने आपल्यात कधीच बनवून ठेवलेली असते. एक निर्मिती होत असताना तो कलाविष्कार सर्वोत्तम व्हावा म्हणून दोन्ही अपूर्णांक अगदी इरेला जात असतात. निर्मिती तर कशी पण कधी होऊ शकते म्हणजे एक वयात आलेली स्त्री आणि पुरुष कधीही निर्मिती करू शकत असताना. निर्मितीसाठी महोत्सवाची गरज हीच मुळी निसर्गाची किमया आहे. एक शारीरिक मिलनाचा प्रवास हा दोन्ही कडे एका उच्चतम पातळीवर एक अलौकिक आनंद देणारा मानला गेला आहे. बघा कोणालाही विचारलं तर सगळ्यात आनंदाचा क्षण हा तोच म्हणजे बाकी अनेक आनंद आयुष्यात आले तरी सामागमच्या टोकावरून दोघांनी ऑर्गझम अनुभवत टोकावरून खाली पाडण्यात जो आनंद आहे त्याची सर कशालाच नाही.

निसर्गाची रचना ह्या पलीकडे सुंदर आहे. वैज्ञानिक भाषेत सांगायचं झाल तर पुरुषाच्या बाबतीत ल्युब्रीकंट तयार होतात ज्यामुळे शारीरिक स्पर्श आनंदाचा व्हावा तर स्त्री मध्ये अशी संप्रेरक जी ह्या शुक्राणू ना खाण किंवा प्रोटीन पुरवतात ज्यामुळे ते स्त्रीच्या गर्भाशया पर्यंत प्रवास करू शकतील. ह्या शिवाय पुरुषा कडून स्त्री कडे शुक्राणू जाताना त्यांना मिळणारा वेग हा प्रचंड म्हणजे शरीरातील सगळी शक्ती एकवटून दिलेला असतो. हे वाचताना आणि करताना अगदी सहज वाटल तरी शरीरातील किती यंत्रणा ह्यामागे कार्यरत असतात ह्याचा विचार केला तर भोवळ येईल. आपल्यासाठी सहज आणि नित्याची वाटणारी हि कृती करताना अनेक पातळीवर ह्या सगळ्याचं नियोजन निसर्गाने आपल्यात आधीच केलेल आहे. निर्मिती हा एक कलाविष्कार आहे त्यामुळे ते होताना ते अत्युच्य पातळीवरच झाल पाहिजे हा अट्टाहास निसर्गाने आपल्या अनंताकडून अनंताकडे जाणाऱ्या प्रवासात तंतोतंत पाळला आहे.

अनंताकडून म्हणजेच निर्मिती च्या अनंत शक्यतेतून निर्मितीच्या अनेक शक्यतांकडे म्हणजेच अनंताकडे जाणारा हा प्रवास किती माणसे समजून घेतात? किती माणसं ह्याचा महोत्सव करतात? काही करायचं म्हणून करायचं अस म्हणून, तर कितीतरी जबरदस्ती करून, तर काही क्रूरतेची सीमा तोडून ह्या महोत्सवाची वाट लावतात. आजकाल अश्याच रस्त्यांकडे आपण जात आहोत. कारण हा प्रवास समजून घेण्याची प्रगल्भता, न आपल्याकडे आहे न ती समजून घ्यायला वेळ. ज्याला हा महोत्सव समजला त्याने निसर्गाच्या ह्या अनंताकडून अनंताकडे जाणाऱ्या प्रवासाचा खरा अनुभव घेतला असं मी म्हणेन.

वाचण्यासारखे आणखी काही…..

श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….
ऐक सखे! सखीच्या आठवणींचा “अल्बम”!
“अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”- आक्रमक व्हा आणि जिंका!!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “जीवन निर्मिती चा प्रवास… अनंताकडून अनंताकडे…”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय