कमी खर्चात सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रातली १० पर्यटनस्थळे

नेहमीच्या ठरलेल्या पर्यटन स्थळांना कंटाळला असाल, तर या लेखात दिलेल्या माहितीचा तुम्हाला नक्की उपयोग होईल.

मित्रांनो, नवीन वर्षाचे कॅलेंडर बघताना तुम्ही त्यातील लॉन्ग वीकएंड हेरून ठेवलेच असतील ना?

या वीकएंडचे नियोजन सुद्धा तुम्ही सुरु केले असेलच.

लॉन्ग वीकएंड म्हटले की फिरायला जायचे डोक्यात येते आणि फिरायला जायचे म्हटले की आपल्या जवळपासची काही ठराविक ठिकाणेच आपल्या डोळ्यासमोर येतात.

खासकरून एक फक्त वीकएंड पुरत्या मर्यादित अशा दोन दिवसाच्या ज्या सहली आपण करतो त्याकरता ठरलेली अशी काही ठिकाणे असतात.

पण दर वेळेला अशा ठरलेल्या ठिकाणी जायचा कंटाळा येऊ शकतो.

महाराष्ट्र खरेतर आपल्या नावाप्रमाणेच मोठा आहे.

आपल्या या राष्ट्रात कोकणातल्या लाल माती पासून ते विदर्भातल्या काळ्या मातीपर्यंत अनेक वेगवेगळी ठिकाणे आहेत.

जागांच्या, वातावरणाच्या आणि खाद्यपदार्थांच्या वैविध्यासोबतच संस्कृती, बोलीभाषेचे सुद्धा अनेक पैलू अनुभवायला मिळतात.

पर्यटन करण्यामागचा हेतू बदल, विरंगुळा हा असला तरी त्यामधून मिळणाऱ्या अनुभवांमधून आपण अधिक संपन्न होत असतो.

म्हणूनच दर वेळेस त्याच त्या पर्यटन स्थळांना भेट देऊन कंटाळा येऊ शकतो.

अनुभव काय, घेऊ तेवढे कमीच असतात.

पण दर वेळेला अशा मोठ्या ट्रिप्स करणे शक्य होईलच असे नाही.

पण तसे जरी जमले नाही तरी जवळपास न बघितलेली अशी अनेक ठिकाणे असू शकतात.

तुम्हाला सुद्धा पर्यटनाचा पुरेपूर अनुभव घेता यावा, वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची माहिती मिळावी म्हणून या लेखात महाराष्ट्रातील काही अनोख्या स्थळांची माहिती दिली आहे.

यातील तुमच्या सोयीनुसार ठिकाणे निवडून तुम्ही तुम्ही लॉंग किंवा शॉर्ट ट्रिप ठरवू शकता.

1. कोलाड

रायगड जिल्ह्यातील हे एक गाव.

चारही बाजूंनी हिरव्यागार सह्याद्रीच्या रांगा असलेल्या या गावात खूप धबधबे बघायला मिळतात.

इथले कुंडलिका नदीवरचे रिव्हर राफ्टिंग प्रसिद्ध आहेच पण त्याचबरोबर रॅपलिंग, कायाकिंग साठी सुद्धा कोलाड लोकप्रिय आहे.

पावसाळ्यात कोलाडचे धबधबे आणि हिरवा निसर्ग लोकांना भुरळ पाडतो.

निसर्गप्रेमींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

कोलाडला महाराष्ट्रातील ऋषिकेश असेही म्हणतात.

उन्हाळ्याचे तीन महिने सोडले तर जून ते मार्च या महिन्यांमध्ये कोलाडला एक छानशी ट्रिप नक्कीच होऊ शकते.

2. भंडारदरा

भंडारदरा हे अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रिय हिलस्टेशन आहे.

मुंबईपासून केवळ 117 किलोमीटर लांब असलेले हे हिलस्टेशन ‘वीकएन्ड गेटअवे’ साठी अगदी उत्तम पर्याय आहे.

या डोंगरमाथ्यावरच्या गावात खूप प्रसिद्ध धबधबा आहे.

शहरापासून तसे जवळ पण तरीही निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे छानसे, टुमदार गाव शहरी लोकांना आकर्षित करते.

शहराच्या धाकाधकीला कंटाळून शहराजवळच कुठेतरी फिरायला जाणाऱ्यांसाठी भंडारदरा सोयीस्कर आहे.

3. काशीद

कोकणातील एक सुंदर, शांत गाव.

काशीद हे सुंदर, नितळ स्वच्छ आणि लांबसडक समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव आहे.

इथल्या समुद्राचे पाणी पारदर्शक दिसते.

इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथल्या किनाऱ्यावरची वाळू पांढरी आहे.

काशीदमधेच चौल या ठिकाणी असलेल्या बौद्ध लेण्या प्रसिद्ध आहेत.

कोरलाईचा किल्ला सुद्धा काशीद मधील लोकप्रिय ठिकाण आहे.

4. माथेरान

मुंबईहून जाण्यासाठी अतिशय सोयीस्कर असे हे हिलस्टेशन आहे.

माथेरान हे भारतातील सर्वात छोटे हिलस्टेशन आहे.

माथेरानचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य असे की इथे कोणतीही गाडी आणायला परवानगी नाही.

ठराविक अंतरापर्यंत जीप जातात पण तिथून पुढे मात्र कोणत्याही गाडीला प्रवेश नसतो.

माथेरानच्या लाल मातीत फक्त घोडे पळतात.

इथला प्रदूषण विरहित गारवा पर्यटकांना परत परत येण्यासाठी भुरळ पाडतो.

माथेरानला एकूण 36 व्हियू पॉईंट्स आहेत जे चालत किंवा घोड्यावर बसून बघता येतात.

प्रत्येक ठिकाणहून सह्याद्रीच्या हिरव्या रंगात नटलेल्या विविध रूपांचे दर्शन होते.

माथेरानची टॉय ट्रेन, म्हणजे ब्रिटिश काळात बांधलेली लहान रेल्वे, ज्यामध्ये बसून वर येता येते हे इथले अजून एक आकर्षण आहे.

5. दुरशेट

आंबा नदीच्या काठावर वसलेले हे गाव मुंबई व पुणे दोन्हीकडून जवळ असल्यामुळे अत्यंत लोकप्रिय ठिकाण आहे.

पाली आणि महाड या अष्टवियायकांच्या मध्ये, खोपोली जवळ हे गाव आहे.

सह्याद्रीच्या कुशीतले हे गाव दोन दिवसांच्या लहानशा सहलीसाठी चांगला पर्याय आहेच, पण एखाद्या दिवशीच्या सुट्टीसाठी दिवसभर म्हणून जाण्यासाठी सुद्धा सोयीस्कर आहे.

दोन मोठ्या शहरांच्या जवळ असूनही इथे निसर्ग अनुभवायला मिळतो.

6. इगतपुरी

नाशिक जिल्ह्यातील हे ठिकाण म्हणजे पावसाळ्यात निसर्ग प्रेमींसाठी मेजवानीच!

मुंबई-आग्रा महामार्गावर असलेले हे शहर निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.

इगतपुरीमध्ये जगातले सर्वात मोठे विपश्यनेचे केंद्र आहे. ही इथली मोठी खासियत आहे.

ही साधना करण्यासाठी इच्छुक असलेल्यांसाठी हे फार मोठे आकर्षण आहे.

या व्यतिरिक्त सुद्धा इगतपुरीमध्ये ट्रेकिंग, रॉक क्लायिमबिंग सुद्धा करता येते.

त्यामुळे ट्रेकर्ससाठी सुद्धा हे एक आकर्षक ठिकाण आहे.

राधानगरी वॉटरफॉल, कोकणकडा ही ठिकाणे साईटसीईंगसाठी, फोटोग्राफीसाठी चांगली आहेत.

यापैकी काहीही करायचे नसले तरी कुटुंबाबरोबर मोकळ्या वातावरणात, निसर्गात वेळ घालवायला इगतपुरी एक चांगले ठिकाण आहे.

7. मानोरी

मानोरी म्हणजे मुंबईचा मिनी गोवा. मुंबईच्या उत्तर भागात असलेला हा 2 किलोमीटर बीच अतिशय सुंदर आहे.

मारव्याहून मानोरीला येण्यासाठी पाच मिनिटांची फेरी बोट आहे.

गोव्यातल्या बीच प्रमाणे इथे शॅक्स आहेत.

बीचच्या बाजूला काजूची आणि नारळाच्या झाडांची लागवड आहे.

या झाडांना मोठे झुले बांधलेले आहेत.

निवांत समुद्र अनुभवायचा असेल तर मानोरी एकदम चांगला पर्याय आहे.

मुख्य म्हणजे पुण्याहून किंवा नाशिकहुन सुद्धा मानोरीला जायला फार प्रवास करावा लागत नाही.

मुंबईकरांना तर एका दिवसाच्या ट्रिपसाठी सुद्धा हे सोयीस्कर ठिकाण आहे.

इथे इतर अनेक हॉटेल्स बरोबर दोन मोठी रिसॉर्ट्स सुद्धा आहेत. मानोरीला बरेच लोक सायकल चालवण्यासाठी येतात.

8. चिखलदरा

हे महाराष्ट्रामधील अमरावती येथील हे गाव.

हे महाराष्ट्रातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे कॉफीची लागवड केली जाते.

निसर्गाचे सढळहस्ते वरदान असलेल्या या हिलस्टेशनला एखाद्या वीकएंडला जाणे सोयीस्कर पडते.

बीर लेक सारखा सुंदर तलाव, मेळघाट टायगर रिझर्व्ह ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.

नरनाळा, ग्वालीगर हे इथले प्रसिद्ध किल्ले.

गुगामल नॅशनल पार्क हे सुद्धा इथले मोठे आकर्षण आहे.

9. रतनवाडी

भंडारदरा जवळचे हे एक गाव आहे.

इथला रतनगड हा किल्ला प्रसिद्ध आहे. रतनवाडीला अमृतेश्वर हे अतिशय सुंदर असे शिवमंदिर आहे.

रतनवाडीला जायचे रस्ते मात्र तितकेसे सोयीस्कर नाहीत.

पण, भंडारदऱ्यातून आर्थर लेकमधून बोटीने रतनवाडीला येणे हा एक खूप चांगला पर्याय आहे.

बोटिंगचा एक अनोखा अनुभव सुद्धा यामुळे येतो.

10. आंबोली

महाराष्ट्रातून गोव्यात उतरताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागणारे हे सुंदर हिलस्टेशन.

इथे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो.

आंबोली निसर्गामुळे, जैवविविधतेमुळे प्रचंड लोकप्रिय आहे.

वर्षभरात कधीही जावे असे हे ठिकाण असले तरी पावसाळ्यात सुंदर धबधबे, वेगवेगळे प्राणी अनुभवायला आंबोली उत्तम ठिकाण आहे.

गोव्यात जाताना वाटेत या घाटाचा, वातावरणाचा अनोखा अनुभव घेता येतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय