स्वयंपाकघरातली झुरळं पळवण्याचे घरगुती उपाय

स्वयंपाकघरातली झुरळं पळवण्याचे घरगुती उपाय

स्वयंपाकघरात छळणारी झुरळ आता पळवाच…. हे आहेत स्मार्ट उपाय…

कित्येक घरात पाली, झुरळं, डास यांचा मुक्त संचार आपण पाहतो.

स्वयंपाकघर हे तर झुरळांचं हक्काचं ठिकाण असतं.

अन्नधान्य, स्वयंपाकाची भांडी ही त्यांची घरंच होतात.

खरंतर झुरळं जीवजंतू पसरवणारे वाहकच असतात.

त्यामुळे झुरळं वाढली की घरात आजारपण वाढलंच म्हणून समजावं.

म्हणून अशा झुरळांना वेळीच अटकाव घातला पाहिजे.

आता या लेखात आपण जाणून घेऊ की छळणारी झुरळ सहजपणे कशी पळवायची….

१. सिलिका एअरोजेल आणि साखर :

सिलिका एअरोजेल सहसा कपड्यांना आर्द्रता लागू नये म्हणून वापरतात.

तरीही सिलिका एअरोजेल आणि साखर ३:१ या प्रमाणात एकत्र करून जिथे झुरळ फिरतात तिथे पेरून ठेवावे.

झुरळांचा नायनाट होईपर्यंत असे वारंवार करावे.

२. पुदिन्याचं तेल :

२५० मिली पाण्यात १० थेंब पुदिन्याचं तेल घालावं.

ते नीट एकजीव करून घ्यावं. झुरळं असलेल्या ठिकाणी ते फवारल्यावर झुरळं कमी होतात.

३. कांदा, लसूण आणि मिरी :

कांदा लसूण पेस्ट आणि मिरी पावडर एकत्र करून ते १ लिटर पाण्यात घालावं.

झूरळांचा नायनाट होईपर्यंत ते झुरळ येणाऱ्या ठिकाणी फवारावं.

४. कडूनिंबाची पानं :

कडुनिंबाच्या पानांची पेस्ट करून ती पाण्यात विरघळवून घ्यावी.

ते पाणी गाळून एका बाटलीत भरून ठेवा.

रात्री ते झुरळ येणाऱ्या ठिकाणी फवारा. झुरळांची संख्या कमी होईपर्यंत ते करत रहा.

५. साबण आणि पाणी :

एक लिटर पाण्यात चार चमचे डिटर्जंट विरघळवा.

थेट झुरळांवर ते फवारता येईल. झुरळांच्या श्वसनाच्या जागेवर ते पडल्यास गुदमरून झुरळं मरतात.

६. काकडी :

काकडीचे काही तुकडे टिनच्या डब्यात भरून झाकण न लावता तसेच ठेवायचे.

काही वेळाने काकडी आणि टिन यात रिऍक्शन होऊन जो वास येतो त्यामुळे झुरळं येत नाहीत.

७. बोरिक पावडर :

बोरिक पावडर, कणिक, साखर सम प्रमाणात घेऊन ते मिश्रण झुरळं येणाऱ्या ठिकाणी पसरवायचं.

त्यातील बोरिक ऍसिडमुळे झुरळं येत नाहीत.

८. पाईन सोल आणि ब्लिच :

पाईन सोल हे फरशी स्वच्छ करण्याचं एक रसायन आहे.

जमिनीवरचे चिवट डाग घालवण्यासाठी ते वापरलं जातं.

पाईन सोल आणि ब्लिच पाण्यात घालून उकळून घ्यावं. झुरळं येणाऱ्या ठिकाणी ते फवारावं.

९. तमालपत्र :

तमालपत्राच्या पानांची केवळ पावडरसुद्धा झुरळं घालवायला पुरेशी असते.

१०. बेकिंग सोडा आणि साखर :

बेकिंग सोडा आणि साखर सम प्रमाणात एकत्र करून घ्या.

झुरळं येणाऱ्या ठिकाणी ते पसरवा. झूरळांची संख्या नक्कीच कमी होते.

तुम्ही हे सोपे उपाय नक्की करून बघा. याने वेगळं पेस्ट कंट्रोल न करताही झुरळांचा नायनाट होईल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.