इंटरव्ह्यू द्यायला जाताय? मग या टिप्स नक्की वाचा

First impression is the last impression असे म्हणतात.

बऱ्याचदा मैत्रीत किंवा नात्यांमध्ये जरी हे विधान खोटे ठरत असले तरी नोकरीच्या इंटरव्ह्यू बाबत तसे होत नाही.

नोकरीसाठी अर्ज केल्यावर नोकरी मिळण्याआधी एका अवघड गोष्टीचा सामना करावा लागतो, तो म्हणजे जॉब इंटरव्ह्यू.

इंटरव्ह्यू घेणारे आणि देणारे दोघेही एकमेकांना अनोळखीच असतात.

त्यांची पहिली भेट कशी होते, काय बोलणी होतात, कोणत्या पद्धतीने बोलणी होतात हे फार महत्वाचे असते.

त्या भेटीत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीला, इंटरव्ह्यू देताना, इंटरव्ह्यू घेणाऱ्यावर प्रभाव पाडावा लागतो.

त्यावर साहजिकच त्याचे भवितव्य अवलंबून असते.

कित्येकदा असे होते की अनेक हुशार मुले इंटरव्ह्यूमध्ये फसतात.

त्यांना समोरच्यावर हवा तसा प्रभाव पाडता येत नाही.

यामुळे अभ्यासात हुशार, कामात मेहनती असून सुद्धा कित्येक जणांना नोकरी मिळत नाही कारण त्यांना इंटरव्ह्यूमध्ये ‘इम्प्रेशन’ पाडता येत नाही.

आज या लेखात आपण अशा काही महत्वाच्या टिप्स बघणार आहोत ज्याचा तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना नक्की फायदा होईल.

१. तुमचा सी.व्ही. व्यवस्थिती अपडेट करा

तुम्ही ज्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला असतो त्यांना न तुमचे नाव माहीत असते न चेहरा.

तुमच्याबद्दल प्राथमिक माहिती मिळण्याचा त्यांच्यासमोर असलेला एकमेव पर्याय म्हणजे तुमचा सी.व्ही.

तुमचा सी.व्ही. ही तुमची त्यांना पटलेली पहिली ओळख असते त्यामुळे ती चांगलीच असायला हवी.

म्हणूनच सी.व्ही च्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा होता कामा नये.

यासाठी एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सी.व्ही मध्ये व्याकरणाच्या किंवा स्पेलिंगच्या चुका नाहीत ना याची खात्री करून घ्यावी.

तुमच्या सी.व्ही मधून तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख होत असते त्यामुळे त्यातल्या बारकाव्यांकडे जर तुम्ही लक्ष दिले तर तुमच्याबद्दल निश्चितच इंटरव्हू घेणाऱ्याचे मत चांगले होईल.

तुमचा सी.व्ही तयार झाला की तुम्ही तो व्यवस्थित आहे न, त्यात काय सुधारणा हवी आहे का हे विचारण्यासाठी तुमच्या ओळखीतल्या अनुभवी लोकांचा सल्ला घेऊ शकता.

तुमच्या व्यवस्थितपणाबद्दल त्यांची खात्री पटेल. यासाठी तुम्ही खालील गोष्टी करू शकता-

शीर्षक बोल्ड फॉन्ट वापरून लिहावे, त्याला अंडरलाईन करावे.

स्पेसिंग व्यवस्थित हवे.

मोठे परिच्छेद टाळून बुलेट पाँइन्टचा वापर केला पाहिजे.

जॉबशी संबंध असलेल्या मुद्यांना हायलाईट केले पाहिजे.

थोडक्यात तुम्ही तुमची पहिली ओळख म्हणून तुमचा सी.व्ही एकदम नीटनेटका व व्यवस्थित ठेवला पाहिजे.

२. इंटरव्ह्यूसाठी अभ्यास करा

फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून, त्यात चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन पुरत नाही.

इंटरव्ह्यूच्या आधी सुद्धा, खरेतर प्रत्येक इंटरव्ह्यूच्या आधी अभ्यास हा करावाच लागतो.

कदाचित तुम्हाला कामाचा अनुभव असेल सुद्धा पण इंटरव्ह्यूमध्ये त्या संबंधीच्या पुस्तकी माहितीला सुद्धा तितकेच महत्व द्यावे लागते.

शिक्षण संपून, परीक्षा देऊन थोडा अवधी होऊन गेलेला असला तर बऱ्याचदा पुस्तकात वापरलेले टर्म्स, शब्द लक्षात राहत नाहीत.

भलेही काम तुम्हाला येत असो पण इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला पुस्तकात वापरलेले टेक्निकल टर्म्स माहीत हवेत.

यासाठी इंटरव्ह्यूच्या आदल्या रात्री तुम्ही त्याची उजळणी केली पाहिजे.

प्रत्यक्ष इंटरव्ह्यू देताना जेव्हा तुम्ही या टेक्निकल टर्म्सचा वापर करता तेव्हा तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास वाटतो.

यामुळे तुमची बोलण्याची, बसण्याची पद्धत सुधारते.

तुमच्या बोलण्याबरोबरच या सगळ्या गोष्टींचा सुद्धा इंटरव्ह्यू घेणाऱ्यावर प्रभाव पडत असतो.

३. काय बोलायचे, कसे बोलायचे याची तयारी करा

प्रत्येक जॉब वेगळा असतो, प्रत्येक जॉब प्रोफाईल वेगळी असते.

त्यामुळे एका जॉब इंटरव्ह्यूला तुम्ही जे बोलाल तेच सगळीकडे लागू होईल असे नाही.

त्यामुळे इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी जॉब प्रोफाईल नीट बघा, जर जॉब डिस्क्रिबशन दिले असेल तर ते वाचून काय बोलायचे ते ठरवा.

तुमचे कोणते गुण हायलाईट करायचे व कोणते नाही हे तुहाला यावरून समजेल.

जर तुम्ही मार्केटिंगच्या जॉबसाठी इंटरव्हू द्यायला जात असाल तर तुम्हाला लोकांशी बोलायला आवडते, तुम्ही लोकांना पटवू शकता या गोष्टी अधोरेखित केल्या पाहिजेत.

पण जर तुम्ही एखाद्या डेस्क जॉबसाठी अर्ज केला असेल जिथे तुमचा लोकांशी संबंध येणार नाही तर या गोष्टी न सांगितलेल्याच चांगल्या.

याचप्रमाणे प्रत्येक जॉबनूसार तुमच्या सी.व्ही मध्ये सुद्धा तुम्ही आवश्यक असलेले बदल केले पाहिजेत.

जर जॉबच्या तुलनेत तुमचे शिक्षण जास्त असेल तर त्यावर सी.व्ही मध्ये भर न दिलेला चांगला कारण निवड करताना सहसा याकडे लक्ष दिले जाते.

जर तुमचे शिक्षण जास्त असेल तर तुम्ही दुसरा चान्स मिळताच ही नोकरी सोडून जायची शक्यता जास्त असते.

यामुळे या गोष्टी फार हुशारीने कराव्या लागतात.

४. नेहमीच्या प्रश्नांची तयारी करा

इंटरव्हूमध्ये काही प्रश्न हमखास विचारले जातात.

या प्रश्नांची यादी करून त्याची उत्तरे तयार ठेवली तर प्रश्न विचारल्यावर लगेच व आत्मविश्वासाने त्याची उत्तरे देता येतील.

याचबरोबर तुम्ही दिलेल्या उत्तराला अनुसरून अजून काय प्रश्न विचारले जाऊ शकतात ते सुद्धा लक्षात घेऊन त्यावर उत्तरे तयार ठेवा म्हणजे ऐन वेळेला गोंधळ होणार नाही.

इंटरव्हूमध्ये सहसा नेहमी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे,

1. tell us about yourself.

2. What are your strengths/weaknesses?

3. What do you know about our organisation?

4. What is your current job description?

5. Why do you want to join our organisaton?

6. Explain the gap in your education.

7. Why did you choose this specialisation

या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या क्षेत्राशी निगडीत असे काही ठरविक प्रश्न असू शकतात.

ते कोणते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या क्षेत्रातील एखाद्या अनुभवी व्यक्तीची मदत घेऊन तयारी करू शकता.

५. आवाज व देहबोली सुधारायला आरशासमोर तयारी करा

तुम्हाला काय प्रश्ने विचारले जातील, त्याची उत्तरे तुम्ही कशी द्याल याची तयारी आरशासमोर उभे राहून करा.

यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. बोलताना जर तुमच्याकडून काही चुका होत असतील तर त्या सुद्धा तुमच्या लक्षात येतील.

तुमच्या हावभावांवर तुम्हाला यामुळे काम करता येईल.

तुमच्या मित्राला किंवा घरच्यांपैकी कोणालातरी तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारण्याची विनंती करू शकता.

त्यांच्यासमोर बसून तुम्ही खोटा इंटरव्ह्यू देऊ शकता. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.

कोणत्या गोष्टी बोलायच्या याचा अंदाज येईल. आवाजाचे चढ-उतार सुद्धा लक्षात येतील. शब्दांचे स्पष्ट उच्चार जमतील.

संवाद साधण्याचे दोन प्रकार असतात एक म्हणजे प्रत्यक्ष बोलणे आणि दुसरी म्हणजे तुमची देहबोली.

तुमचे उठणे-बसणे, हसणे, हात मिळवणे, बोलताना डोळ्यात डोळे घालून बोलणे, उत्तरे देताना आत्मविश्वासाने देणे या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात.

यामध्येच तुम्ही घातलेले कपडे सुद्धा येतात.

इंटरव्ह्यूला जाताना नेहमी योग्य ते कपडे निवडावेत. आरशासमोर सराव केल्याने तुमच्या देहबोलीवर तुम्हाला काम करता येईल ज्यामुळे तुमचा एकूण प्रभाव चांगला पडेल.

६. अख्या इंटरव्ह्यूची तयारी करा

इंटरव्ह्यूमधील प्रश्न-उत्तराची तयारी तर महत्वाची आहेच.

वरच्या मुद्द्यामुळे ती तयारी तुमची व्यवस्थित होईल पण त्याचबरोबर इंटरव्ह्यूसाठी केबिनमध्ये गेल्यापासून ते केबिनमधून बाहेर पडेपर्यंत काय करायचे, कसे वागायचे याची मनातल्या मनात उजळणी करा.

यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केबिनमध्ये गेल्यावर तुम्हाला “बसा” सांगितल्याशिवाय न बसणे, हात मिळवताना आत्मविश्वासाने मिळवणे या आहेत.

अशाप्रकारे आत जाण्यापासून ते बाहेर पडेपर्यंत सगळ्या इंटरव्हूची तुम्ही मनातल्या मनात उजळणी करून तयारी केली तर इंटरव्ह्यू देताना तुम्हाला सोपे जाईल, तुमच्यात अवघडलेपण जाणवणार नाही.

७. नेहमी खरे बोला

इंटरव्ह्यूला जाताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, ती म्हणजे इंटरव्ह्यू घेणारे हे आपल्यापेक्षा हुशार व अनुभवी असतात.

म्हणूनच ते टेबलच्या पलीकडच्या बाजूला बसलेले असतात.

काही वेळा असे होऊ शकते की तुम्ही समोरच्यावर प्रभाव पडायला काही गोष्टी वाढवून सांगाल, काही वेळा खोटे सुद्धा सांगाल.

पण अशा गोष्टी काही प्रश्न विचारून सहज पकडल्या जाऊ शकतात.

इंटरव्ह्यू घेणाऱ्याला हे पक्के माहीत असते.

तुम्ही एखादी गोष्ट लपवली किंवा खोटी सांगितली तर ती तुमच्या कदाचित लक्षात राहणार नाही पण उलट सुलट प्रश्न विचारून इंटरव्ह्यू घेणारा तुमची उलट तपासणी सहज घेऊ शकतो.

तुम्ही प्रभाव पाडायला म्हणून एखादी गोष्ट कराल पण त्याचा परिणाम उलटाच होईल, असे होता कामा नये.

म्हणूनच इंटरव्ह्यू देताना नेहमी खरेच बोलावे. खरे बोलण्याचा फायदा होणार नाही असे तुम्हाला वाटले तरी या न त्या प्रकारे त्याचा फायदाच होणार असतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय