गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 

गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? 

गाजर म्हटले की आपल्या डोळ्यासमोर लाल चुटूक डोळ्यांचा ससा येतो.

ससा गाजर आवडीने खातो म्हणून त्याचे डोळे असे सुंदर दिसतात.

लहान मुलांना गाजर खाऊ घालताना, त्यांनी गाजर आवडीने खावे म्हणून हीच गोष्ट सांगितली जाते.

गाजर खाल्ल्याने खरोखरच डोळ्यांचे आरोग्य सुधारते. पण ते कसे?

गाजर खाण्याचा हा एकच फायदा आहे का? अजून कोणत्या प्रकारे गाजर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते? 

याच सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखातून मिळणार आहेत. 

१. डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले 

डोळ्यांचे आरोग्य सुधारून, डोळ्यांचे विकार नाहीसे होण्यासाठी गाजर अत्यंत उपयुक्त आहे.

नियमितपणे गाजर खाल्ल्याने दृष्टी सुधारते.

गाजरामध्ये बीटा कॅरोटीन जास्त प्रमाणात असतात. शरीरात गेल्यानंतर या बीटा कॅरोटीनचे रुपांतर व्हिटामिन ‘ए’ मध्ये होते.

व्हिटामिन ‘ए’ हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असते.

गाजरामध्ये लुटीन आणि लायकोपीन ही द्रवे सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे दृष्टी तर सुधारतेच पण त्याचबरोबर रातांधळेपणाचा धोका सुद्धा कमी होतो.

दृष्टी सुधारण्यासाठी, चष्मा लागू नये यासाठी विशेषतः वाढत्या वयातील मुलांना गाजर फायदेशीर ठरते.

रोज जेवताना किंवा संध्याकाळी खायला गाजर दिल्यास डोळ्यांचे आरोग्य सुधारायला नक्की फायदा होतो.

२. वजन कमी करण्यास उपयुक्त 

गाजरा मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असतेच पण त्याचबरोबर कॅलरी सुद्धा कमी असतात.

त्यामुळे गाजर खाल्ल्यावर जास्त कॅलरी खाल्ल्या न जाऊन सुद्धा पोट भरायला मदत होते.

म्हणूनच जर वजन कमी करायचे असेल तर दोन जेवणांच्या मध्ये भूक लागते तेव्हा गाजर खावे.

यामुळे तुमचे पोट भरेल आणि तुम्ही इतर जंक फूडपासून लांब राहाल. 

३. पचनशक्ती सुधारण्यास फायदेशीर 

गाजरामध्ये डायटरी फायबर खूप जास्त प्रमाणात असतात.

पचनक्रिया चांगली होण्यासाठी हा फायबरचा उपयोग होतो.

यामुळे खाल्लेले अन्न लवकर पचण्यास मदत होते.

पचनक्रियेत मदत करणारे आपल्या आतड्यात कार्यरत असणाऱ्या ‘गुड बॅक्टेरीया’च्या वाढी साठी फायबर गरजेचे असतात.

या बॅक्टेरीयाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थातच पचनक्रिया सुधारते.

म्हणूनच पचनसंस्थेच्या तक्रारी, अपचन किंवा कॉन्स्टीपेशन असेल तर आहारात नियमितपणे गाजर घ्यावे. जेवताना गाजराच्या फोडी किंवा गाजराची कोशिंबीर घेणे हा एक चांगला पर्याय आहे. 

४. ह्रदयाच्या आरोग्यासाठी चांगले 

आपल्या शरीरात आढळणाऱ्या कोलेस्टेरॉलचे दोन प्रकार असतात. LDL आणि HDL.

यापेईकी HDL, म्हणजे हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असते.

याला गुड कोलेस्टेरॉल असेही म्हणतात. गाजर खाल्ल्याने शरीरातून LDL, म्हणजेच लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते.

हे LDL किंवा बॅड कोलेस्टेरॉल हे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साठून राहते.

यामुळे ह्रदयाला रक्तपुरवठा कमी होऊन ह्र्दय विकारांचा धोका असतो. ह्र्दय विकाराचा झटका येण्याचे हे महत्वाचे कारण आहे.

म्हणूनच शरीरात गुड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवून बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी गाजर हा एक चांगला पर्याय आहे. 

५. ब्लड प्रेशर कमी करण्यास उपयुक्त 

गाजरामध्ये पोटॅशीयम हे खनिज जास्त प्रमाणात आढळते.

आपले ब्लड प्रेशर (रक्तदाब) नियंत्रणात राहावे यासाठी शरीरात सोडियम व पोटॅशीयमचा समतोल असणे अत्यंत गरजेचे आहे.

सोडियमचे ब्लड प्रेशर वाढवण्यास कारणीभूत असते तर  पोटॅशीयम ते कमी करण्यासाठी.

म्हणूनच उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर आहारातून सोडियमचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ, उदाहरणार्थ मीठ, कमी करायला सांगतात.

याचबरोबर आहारात  पोटॅशीयम खनिज जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. 

पोटॅशीयम हे रक्तवाहिन्यांमधले टेन्शन कमी करून रक्त पुरवठा सुधारते. गाजरात पोटॅशीयम जास्त प्रमाणात आढळते, यामुळे ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तसेच ह्र्दयविकाराचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर असते.

उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी स्नॅक म्हणून गाजर नियमितपणे खावे. 

६. त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले 

गाजरामध्ये जास्त प्रमाणात असणारी, गाजराला त्याचा लाल रंग देणारी बीटा कॅरोटीन, लुटीन, लायकोपीन ही द्रवे त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतात.

गाजरामध्ये जास्त प्रमाणात आढळणारे सिलीकाॅन सुद्धा त्वचेच्या व नखांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

कच्च्या गाजरातून ही द्रवे जास्त प्रमाणात मिळतात. त्यामुळे टवटवीत त्वचा हवी असल्यास शक्यतो गाजर कच्चे खावे.

नियमितपणे गाजर खाल्ल्याने त्वचा अधिक तजेलदार दिसण्यासाठी मदत होते. 

७. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर 

गाजरामध्ये व्हिटामिन, खनिजे व ऍन्टीऑक्सिडनट्स जास्त प्रमाणात असतात.

या सगळ्यामुळे रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी मदत होते. 

ऍन्टीऑक्सिडनट्स ज्या प्रमाणे फ्री रॅडीकल्सपासून शरीरातील पेशींचे संरक्षण करत असतात त्या प्रमाणेच इतर जीवाणू, विषाणू यांच्या पासून सुद्धा शरीराचा बचाव करत असतात. 

८. कॅन्सरचा धोका कमी करण्यास फायदेशीर 

कॅरेटोनाॅइड जास्त प्रमाणात असणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने कॅन्सरचा धोका कमी होण्यासाठी मदत होते.

गाजराच्या नियमित सेवनाने प्रोस्टेट, गुद्द्वाराचा कर्करोग तसेच पोटाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. 

मित्रांनो, गाजराचे हे फायदे वाचून त्याचा समावेश तुमच्या नेहमीच्या आहारात करणे किती गरजेचे आहे हे तुमच्या लक्षात आलेच असेल.

आपल्या रोजच्या आहारात अनेक भाज्या, फळे असतात ज्या आपल्या तब्येतीसाठी चांगल्या असतात हे तर आपल्याला माहीत असते पण त्याचे नक्की फायदे काय, ते त्यातील कोणत्या घटकामुळे ते तितकेसे माहीत नसते.

पण हे सगळे समजल्यावर त्या फळाचा किंवा भाजीचा आपल्या आहारात समावेश करणे किती गरजेचे आहे हे समजते. 

थंडीत गाजरे बाजारात येतात तेव्हा त्याचा उपयोग तुम्ही का केला पाहिजे हे तुम्हाला हा लेख वाचून समजेल. मग वाट कसली बघताय?

बाजारातून ताजी गाजरे आणताय ना? पण त्या पूर्वी तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा लेख नक्की शेयर करा जेणेकरून गाजराचे वेगवेगळे फायदे त्यांना सुद्धा समजतील. 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!