शरीरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय वाचा या लेखात

शरीरातील उष्णता कमी करण्याचे घरगुती उपाय

Tags: उष्णता कमी करण्याचे उपाय, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय, तोंडातील उष्णता कमी करण्याचे उपाय, उष्णता कमी करण्याचे उपाय स्वागत तोडकर, शरीरातील उष्णता वाढण्याची लक्षणे, शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ, पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, शरीरातील उष्णतेचे प्रमाण कमी होऊन थंडावा निर्माण करण्याचे काम कोणते प्राणायाम करते, पोटातील उष्णता

कधी-कधी काही कारणाने एकदम गरम झाल्यासारखे वाटते, बाहेर एवढा उकाडा नसला तरी शरीराचे तापमान वाढल्या सारखे वाटते.

हा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्कीच आला असेल.

खरेतर हा अगदी कॉमन त्रास आहे. याला हिट स्ट्रेस असे म्हणतात.

सामान्यतः आपल्या शरीराचे तापमान ९८.६ फारेन्हाईट इतके हवे पण ते कधीतरी कमीजास्त होत असते. म्हणून माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ९७.८ ते ९९ फारेन्हाईट इतके असावे.

आपले शरीर हे बाह्य वातावरणाशी ऍडजस्ट करून हे तापमान राखत असते.

परंतु, कधीतरी काही कारणाने हे तापमान वाढू शकते. यालाच हिट स्ट्रेस (Heat stress) असे म्हणतात.

यामागे अनेक वेगवेगळी कारणे असू शकतात.

वातावरणात उन्हाळा खूप प्रमाणात वाढणे हे एक कारण आहे पण ते एकमेव कारण मात्र नाही.

तुम्हाला सुद्धा असे अनुभव आलेच असतील.

अशावेळेला या उष्णतेचा त्रास होतोच पण त्यामागचे कारण न समजल्यामुळे परत परत हा त्रास होण्याची शक्यता असते.

एखादी समस्या दूर करायची असल्यास त्या समस्येमागचे कारण मुळापासून नष्ट करणे जरुरी आहे, हो ना?

म्हणूनच आज आम्ही हा लेख घेऊन आलोय.

या लेखात शरीरातील उष्णता कमी करण्याचे काही घरगुती उपाय आहेत.

पण ते बघण्यापूर्वी आपण बघूया की कोणत्या कारणांमुळे ही उष्णता वाढायची शक्यता असते.

१. शरीराचे तापमान वाढवायला कारणीभूत असणारे हे नेहमीचे कारण आहे.

याचा अनुभव सगळ्यांना असतोच.

क्वचित कोणत्या इन्फेक्शनमुळे ताप आल्यावर शरीराचे तापमान वाढते.

पण त्या इन्फेक्शनशी दोन हात करण्याची ती आपल्या शरीराची पद्धत असते.

इन्फेक्शन दूर झाल्यावर शरीराचे तापमान परत नॉर्मल होते.

२. हायपरथायराॅईडीझमच्या त्रासात शरीरात थायराॅईड हे हार्मोन जास्त प्राणात स्त्रवले जाते.

हा आजार असणाऱ्या व्यक्तींना हिट स्ट्रेसचा त्रास होण्याची शक्यता असते.

३. उष्ण आणि दमट वातावरणात दीर्घ काळ राहून शारीरिक कामे केल्याने शरीराचे तापमान तात्पुरते वाढू शकते.

असे झाल्यावर थकवा जाणवतो.

४. घट्ट, सिंथेटिक कापडाचे कपडे घातल्याने शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते.

हे होण्यामागे दोन कारणे असतात, एक तर असे कपडे घाम शोषून घेत नाहीत आणि दुसरे कारण कपडे घट्ट असल्याने त्यात हवा खेळती राहत नाही.

५. तिखट, मसालेदार जेवण झाल्यानंतर शरीराचे तापमान वाढते.

याचबरोबर आहारात जर प्रोटीन्स जास्त प्रमाणात घेतली तरी सुद्धा शरीराचे तापमान वाढते.

६. दारू किंवा कॅफिन जास्त प्रमाणात असणाऱ्या पेयांच्या अति सेवनाने शरीराचे तापमान वाढते.

७. व्यायाम किंवा कोणतेही असे काम ज्यामध्ये शारीरक कष्ट करावे लागतात, केल्यानंतर घाम येऊन शरीराचे तापमान वाढते.

८. कधीकधी काही आजारांचा परिणाम होऊन सुद्धा शरीराचे तापमान वाढते, तसेच काही औषधांमुळे जसे की ऍन्टीबायोटिक्समुळे शरीराचे तापमान वाढण्याची शक्यता असते.

९. पाणी कमी प्रमाणात घेतल्याने, म्हणजेच डीहायड्रेशन झाल्यावर, शरीराचे तापमान वाढते.

शरीराचे तापमान अचानक वाढल्याने गरमी होऊन बैचैन व्हायला होते.

बऱ्याचदा अशा वेळेस काही सुचेनासे होते. काहींना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो.

हे होण्यामागे काय कारणे आहेत हे आपण बघितले.

म्हणजेच हा त्रास व्हायला नको असेल तर काय काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी टाळायच्या हे आपल्याला समजले.

पण हा त्रास होत असताना, तो कमी करण्यासाठी काय उपाय करावेत?

शरीरातील उष्णता कमी होऊन शरीराचे वाढलेले तापमान कमी होण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत.

हे उपाय केल्याने या त्रासापासून आराम मिळेल.

या लेखाच्या पुढच्या भागात आपण हेच उपाय बघणार आहोत.

१. भरपूर पाणी पिणे

तसे तर दिवसभरच भरपूर पाणी पिणे हे आरोग्यासाठी चांगले असते.

दिवसभर घोट घोट पाणी पीत राहिल्याने हायड्रेटेड राहण्यासाठी मदत होते.

जर शरीरात उष्णता जास्त होऊन, शरीराचे तापमान वाढले असेल तर त्यावर पटकन करण्याचा उपाय म्हणजे पाणी पिणे.

एका जागी बसून एक-दोन ग्लास पाणी पिण्याने शरीराचे तापमान पटकन कमी होण्यास मदत होते.

२. थंड पाण्यात पाय बुडवणे

तुमची पाऊले जर तुम्ही थंड पाण्यात बुडवून ठेवली तर शरीराचे वाढलेले तापमान कमी व्हायला मदत होते.

यासाठी एका बादलीत पाणी घेऊन, त्यात थोडे बर्फाचे खडे टाकून त्यात पाय बुडवून बसावे.

१५ ते २० मिनिटांसाठी अशा थंड पाण्यात पाय बुडवल्याने शरीराचे तापमान कमी होते.

हे करताना तुम्हाला सुद्धा २० मिनिटे आराम मिळतो.

यामुळे जर थकवा वाटत असेल तर तो सुद्धा दूर होतो.

३. नारळपाणी

नारळ पाण्यामुळे शरीराची गेलेली एनर्जी परत येण्यासाठी मदत होते.

जेव्हा शरीराचे तापमान वाढते तेव्हा त्यात शरीराची बरीच एनर्जी खर्च होते.

नारळ पाण्यामुळे शरीरात पाण्याचा अंश जाऊन हायड्रेटेड व्हायला मदत होतेच, पण त्यामध्ये असणाऱ्या व्हिटामिन, मिनरल्स आणि इलेक्ट्रॉलाईटमुळे हिट स्ट्रेसमध्ये शरीराला गरज असणारी एनर्जी सुद्धा मिळते.

४. आहारात बदल

आहारात जास्त पाण्याच्या अंश असलेल्या पदार्थांचा समावेश केला तर हिट स्ट्रेसचा त्रास कमी व्हायला मदत होते.

शरीराचे तापमान कमी करण्यासाठी तुम्ही आहारात अनेक प्रकारे बदल करू शकता.

कलिंगड, खरबूज या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते.

या फळांच्या सेवनाने शरीरात पाणी जास्त प्रमाणात जाते.

यामुळे डीहायड्रेशनचा त्रास होत नाही व शरीराचे तापमान नियंत्रणात राहते.

पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या भाज्यांमध्ये सुद्धा अनेक पर्याय उपलब्ध आहे.

सेलेरीची पाने, काकडी, कोबी या भाज्यांमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो.

या भाज्यांचा जास्तीतजास्त फायदा होण्यासाठी शक्यतो त्या ताज्या व कच्च्या खाव्यात. यामुळे शरीरात पाणी जास्त प्रमाणात जाईल.

हिट स्ट्रेस कमी करण्यासाठी या भाज्या वापरून सॅलड करणे हा एक चांगला पर्याय आहे.

५. प्राणायाम – सिताली ब्रीदिंग

प्राणायाम केल्याने शरीराबरोबरच मन सुद्धा शांत होते.

यामुळे शरीराचे जास्त वाढलेले तापमान नियंत्रणात येण्यासाठी मदत होते.

प्राणायाम करताना प्रथम एका जागी शांत बसावे.

आता तोंडाने श्वास घेऊन नाकाने हळूहळू सोडवा.

असे साधारण पाच मिनिटांसाठी करावे.

यामुळे शरीराचे वाढलेले तापमान कमी होऊन, आराम मिळण्यासाठी मदत होईल.

६. कपड्यांची योग्य निवड

जर तुमच्या शरीराचे तापमान वाढण्यासाठी बाहेरचे वातावरण, बाहेरची उष्णता कारणीभूत असेल तर बाहेर जाताना काळजी घ्यायला हवी.

कपड्यांची योग्य निवड करायला हवी.

उन्हात जाताना टोपी घातली पाहिजे किंवा डोक्यावर रुमाल बांधला पाहिजे.

गाॅगल वापरून डोळ्यांचे संरक्षण करणे सुद्धा महत्वाचे आहे.

तसेच हिट स्ट्रेसचा त्रास होणाऱ्यांनी शक्यतो फिकट रंगाचे, कॉटनचे किंवा लिननचे सैलसर कपडे घालावेत.

सिंथेटिक कापडाचे कपडे टाळावेत.

७. कोरफड

कोरफडीचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे असतात, त्यातीलच एक म्हणजे शरीरातील उष्णता कमी करणे.

कोरफडीच्या गराचा वापर यासाठी केला जातो.

यासाठी कोरफडीचे पान फ्रीजमध्ये ठेऊन गरज लागेल तसा त्याचा गर काढून त्वचेवर लावावा.

बाजारात मिळणाऱ्या तयार कोरफडीच्या गराचा वापर सुद्धा केला जाऊ शकतो.

दोन चमचे ताज्या कोरफडीचा गर एक ग्लास पाण्यात मिसळून खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी व्हायला मदत होते.

यामुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहते.

८. ताक

ताकाच्या सेवनाने शरीरातील उष्णता कमी होते.

उष्णतेच्या त्रासामुळे थकल्यासारखे वाटत असताना ताक प्यायल्याने फायदा होतो व गेलेली एनर्जी परत यायला मदत होते.

उष्णता वाढली असेल तर एक ग्लास थंड ताक प्यावे.

९. मेथी बिया

मेथीच्या बिया किंचित भाजून त्याची पूड करून घ्यावी.

ही पूड गरम पाण्यात घालून प्यावी.

यामुळे शरीरातून घाम बाहेर पडेल. घामामुळे शरीरातील उष्णता बाहेर पडून शरीराचे वाढलेले तापमान कमी होते.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

You may also like...

3 Responses

  1. SANJAYSINGH JOSHI says:

    दिवसभरात किती पाणी प्यायला हवे

  2. Smita says:

    Kay ho kahi sangta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!