पूर्ण बंगल्याचे ८ वर्ष लाइट बिल न भरणे या कुटुंबाने कसे शक्य केले, वाचा

८ वर्ष घराचे लाईट बिल आणि पाणी बिल न भरलेल्या या कुटुंबाची कथा वाचून आम्ही थक्क झालोय…

तुम्ही सुद्धा ही गोष्ट वाचून आश्चर्यचकित व्हाल.

लाईट बिल, पाणी बिल न भरता राहणे कसे शक्य आहे असाच तुम्हाला प्रश्न पडला आहे ना?

मित्रांनो, यासाठी कोणतीही अफरातफर करायची गरज नाही.

पण हे कसे शक्य आहे तेच या लेखाद्वारे तुम्हाला समजणार आहे.

ही गोष्ट आहे स्नेहल पटेलची.

स्नेहल हे सुरत, गुजरात मधील एक मेकॅनीकल इंजीनीअर आहेत.

त्यांना निसर्गाच्या जवळ त्यांचे घर हवे असे फार पहिल्यापासून वाटायचे.

गेली८ वर्षे ते त्यांचे हे स्वप्न जगत आहेत.

त्यांचे घर फक्त निसर्गाच्या सानिध्यातच नाही तर निसर्गाला पूरक असे आहे.

त्यांच्या घरात केल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा निसर्गाला फायदा होतो.

घरातील प्रत्येक गोष्ट त्यांनी पर्यावरणाचा विचार करून केली आहे.

पर्यावरणाचा अशा प्रकारे, संवेदनशील मनाने उपयोग केल्यामुळेच त्यांनी गेली ८ वर्षे विजेचे बिल भरले नाही.

कारण ते भरायला त्यांच्या घरात मुळात वीज येतच नाही!

असे कसे शक्य आहे हाच विचार करताय ना?

स्नेहल यांनी आपल्या घरात सौर उर्जेचा आणि पवन उर्जेचा वापर केलेला आहे.

पाण्यासाठी रेन वाॅटर हार्वेस्टिंगची सोय केलेली आहे.

यामुळे त्यांच्या विजेच्या व पाणीपुरवठा दोन्हीच्या गरजा पूर्ण होतात.

इतकेच नव्हे तर त्यांच्या घरातील ग्रे वाॅटर, म्हणजे बाथरूममध्ये किंवा कपडे धुवायला वापरले जाणारे पाण्याचे शुद्धीकरण होऊन ते पाणी बागेत लावलेल्या फळझाडांसाठी, भाज्यांसाठी वापरले जाते.

या घराबद्दल, त्यातील या वेगळेपणाबद्दल बोलताना स्नेहल सांगतात की त्यांच्या निसर्ग प्रेमाची पाळंमुळं त्यांच्या बालपणात रोवलेली आहेत.

लहानपणी ते त्यांच्या वडिलांबरोबर गुजरातच्या जंगलात फिरायला जायचे.

तेव्हापासूनच त्यांची निसर्गाशी जवळीक झाली.

पण जेव्हा १९८३ साली ते मणिपाल विद्यापीठातून इनजीनीअरींगची डिग्री घेऊन सुरतेत परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सुरत बदलत चालले आहे.

हळूहळू शहरातील झाडे कमी होत आहेत.

हा बदल जाणवायचे अजून एक कारण म्हणजे मणिपालचा परिसर अतिशय हिरवागार व सुंदर होता.

ते सांगतात की त्यांना सुरतेत सुद्धा असाच हिरवागार निसर्ग बघायची इच्छा होती.

हीच कल्पना डोक्यात ठेऊन त्यांनी १९८४ मध्ये दोन जणांना सोबत घेऊन नेचर क्लब ही संस्था सुरतेत सुरु केली.

आज नेचर क्लब हे एक रजिस्टर्ड NGO असून त्यात २,००० सदस्य आहेत.

घराचे स्वप्न कसे साकार झाले या बद्दल बोलताना स्नेहल सांगतात की त्यांनी १९९६ मध्ये ४ एकरच्या जमिनीची खरेदी केली होती.

त्याच सुमारास त्यांनी तिथे वेगवेगळी झाडे लावायला सुरुवात केली. तेव्हाच त्यांनी ठरवले होते, की एक दिवस या जागेत राहायला यायचेच!

त्यांनी त्यांच्या या घराचे नियोजन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की इतकी वर्ष ते जे काम करत होते, ज्यासाठी काम करत होते तेच आता त्यांना प्रत्यक्षात करायचे होते.

म्हणजेच आता थेअरी प्रॅक्टीकलमध्ये करायची होती.

या त्यांच्या कामात त्यांना उत्तम साथ लाभली ती आर्किटेक्ट फाल्गुनी देसाई यांची.

त्या सांगतात की स्नेहल यांनी त्यांना घरात काय हवे आहे याची सुमारे ३० मुद्यांची मोठी यादीच त्यांना दिली होती.

त्या सांगतात की स्नेहल यांना आपल्याला काय हवे आहे याची पूर्णपणे कल्पना होती.

त्याबद्दल सगळ्या बारकाव्यांसहीत माहिती सुद्धा स्नेहलनी पुरवली होती.

त्यांच्या सगळ्या गरजा पर्यावरणाला पूरक होत्या.

त्यांचे पर्यावरणाबद्दलचे प्रेम वेळोवेळी दिसून येत असल्याचे सुद्धा फाल्गुनी सांगतात.

स्नेहल यांचे १२,००० स्क्वेअर फीटचे, ३ बेडरूम असलेले दुमजली घर ५०००० स्क्वेअर फिट परिसरात बांधले आहे.

हे बांधकाम पूर्ण व्हायला ३ वर्ष लागली. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल त्यांच्या या जागेत, घराच्या आजूबाजूला थोडीथोडकी नव्हे तर चक्क ७०० झाडे आहेत!

या घरात स्नेहल त्यांच्या परिवारासोबत गेली ८ वर्ष राहत आहेत.

या घराचे अजूनही काही खास फीचर्स आहेत, जसे की घरात बांधकामात वापरलेले लाकूड हे पूर्णपणे अपसायकल केले आहे. यामुळे घर नैसर्गिकरीत्या थंड राहायला मदत होते.

स्नेहलनी घरात ७.५ KW कपॅसिटीचा सोलर पॅनेल बसवून घेतला आहे. यामुळे त्यांच्या परिवाराच्या विजेच्या गरजा पूर्णपणे पूर्ण होतात व त्यांना वीज घेण्याची गरजच पडत नाही.

त्यांनी सोलर पॅनेल अशा रीतीने बसवले आहेत की त्यावर जास्तीतजास्त ऊन पडते. स्नेहल सांगतात की पावसाळ्यात ऊन कमी होते तेव्हा थोडा त्रास होऊ शकतो पण स्नेहलनी या समस्येवर सुद्धा तोडगा काढला आहे.

पावसाळ्यात ऊन कमी येऊन वीज निर्माण व्हायला आडथळा नको म्हणून त्यांनी विंड जनरेटर बसवला आहे.

पवन उर्जेचा वापर होऊन वीज निर्माण केली जाते.

या घराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथला पाणी पुरवठा.

रेन वाॅटर हार्वेस्टिंगच्या माध्यमाने या घराचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटतो.

घराच्या टेरेसवर एक टँक बसवला आहे ज्यामध्ये पावसाचे पाणी साठवले जाते.

हे पाणी फिल्टर होण्यासाठी त्यामध्ये कापडी फिल्टर सुद्धा बसवला आहे.

हे पाणी घरात वापरण्यासाठी असते.

टेरेसवरचा टँक भरला की जास्तीचे पाणी जमिनीखालच्या स्टोरेज टँकमध्ये साठवले जाते.

या स्टोरेज टँकची क्षमता २ लाख लिटर इतकी आहे!

या स्टोरेज टँकमध्ये येण्याआधी पाणी पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने, वाळू, कोळसे वापरून फिल्टर केले जाते.

हा स्टोरेज टँक सुद्धा भरला तर जास्तीचे पाणी सोडायला एक तलाव सुद्धा बांधला आहे.

पण या ही पेक्षा कौतुकास्पद आहे हे पाण्याचा परत वापर करण्याची त्यांची पद्धत.

घरातल्या बाथरूम मधले पाणी, ज्याला ग्रे वाॅटर म्हणतात हे फिल्टर करून झाडांना देण्यासाठी वापरले जाते.

वापरलेल्या पाण्याबद्दलच अजून एक चकित करणारी गोष्ट म्हणजे वाॅशिंग मशीनमधून बाहेर आलेले पाणी मशीनच्या खालच्या भागात लावलेल्या एका टाकीत साठवले जाते आणि घरातील टाॅयलेटमध्ये फ्लश करण्यासाठी याच मशीनमधल्या पाण्याचा वापर केला जातो.

आहे की नाही खरेच आश्चर्यकारक गोष्ट?

तुम्हाला माहीती आहे का आपल्या घरात रोज कितीतरी लिटर ग्रे वाॅटर बाहेर पडत असते.

या सगळ्या पाण्याला वेस्ट वाॅटरच म्हटले जाते.

पण सांडपाणी आणि ग्रे वाॅटरमध्ये फरक आहे. या ग्रे वाॅटरचे जर रीसायकलिंग केले तर आपल्या पाण्याचा वापर कितीतरी पटीने कमी होईल..

मित्रांनो, स्नेहल पटेलांची ही गोष्ट वाचून तुम्ही चकित झाला असाल.

एखाद्या व्यक्तीचे निसर्गाच्या प्रती किती प्रेम असू शकते आणि त्यासाठी ते किती कष्ट घेऊ शकतात हे वाचून आश्चर्य नाही वाटले तरच नवल आहे.

तुम्ही सुद्धा बऱ्याचदा म्हणत असाल की पर्यावरणासाठी काहीतरी केले पाहिजे, पर्यावरणाचा होणारा नाश बघून तुम्ही सुद्धा हळहळत असालच, हो ना?

स्नेहल पटेलांनी हे घर बांधून पर्यावरणाला मोठे देणेच दिले आहे असे म्हणायला हरकत नाही.

आपल्या सगळ्यांना हे जमणे शक्य असेलच असे नाही,

पण त्यांच्या या गोष्टीतून प्रेरणा घेऊन आपण आपल्याला जमेल ते प्रयत्न करून आपल्याला जमेल त्यापेक्षा थोडे जास्त कष्ट घेऊन आपल्या परीने त्यांच्या या कार्याला हातभार लाऊ शकतो…

आणि आपल्याला येणारे भरमसाठ बिलं कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “पूर्ण बंगल्याचे ८ वर्ष लाइट बिल न भरणे या कुटुंबाने कसे शक्य केले, वाचा”

  1. वा स्नेहलताई. आपली मेहनत, चिकाटी जिद्द आणि अभ्यासूवृत्ती यांना सलाम. ज्यांना शक्य आहे त्यांनी यांतील थोडे जरी अंमलात आणले तर अनागोंदीपासून देशाची सुटका होईल. कोट्यावधी डाॕलर्सही वाचतील देशाचे. वसुंधराही प्रसन्न हसेल.

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय