दाट व लांबसडक केसांसाठी या औषधींचा वापर नक्की करून बघा 

दाट व लांबसडक केसांसाठी या औषधींचा वापर नक्की करून बघा

पुरुष आणि स्त्रियांचा एक कॉमन प्रॉब्लेम म्हणजे केस गळती!

केस विरळ होणे, केसांची वाढ थांबणे आणि पुरुषांना होणारा मोठा त्रास म्हणजे हळूहळू टक्कल पडत जाणे.

केसांचे आरोग्य सुधारावे, केस लांब व्हावेत किंवा निदान गळून विरळ तरी होऊ नयेत अशी प्रत्येकाची इच्छा असते, तुमची ही असेल.

बायकांना लांब, दाट केसांची जास्त हौस असते. निरोगी केसांसाठी बाजारात अनेक शाम्पू, कंडिशनर, हेयर पॅक उपलब्ध आहेत.

याकरता ब्युटी पार्लरमध्ये वेगवेगळ्या ट्रीटमेंट देखील असतात. या सगळ्याचा फायदा होत असेल.

पण या अशा गोष्टींमध्ये इतरही केमिकल वापरलेले असतात. याचा आपल्या स्काल्पवर परिणाम होण्याची शक्यता असते.

काहींना अशा उत्पादनांची एलर्जी येण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणूनच या सगळ्यापेक्षा आपल्या पारंपारिक आयुर्वेदिक औषधी जास्त परिणामकारक असतात.

या औषधी वर्षानुवर्षे वापरात आहेत. केसांच्या आरोग्यासाठी तर या चांगल्या असतातच शिवाय यांच्या वापराने कुठलेही इतर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसते.

या आयुर्वेदिक औषधींचा फक्त फायदाच होणार असतो, फक्त याचा वापर करताना थोडा पेशंस ठेवावा लागतो.

याचे उपयोग करताना त्यात सातत्य लागते. या दोन्ही गोष्टी तुम्ही नीट केल्यात तर या औषधींचा तुमच्या केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी नक्की फायदा होईल. याच्या नियमित वापराने तुमचे केस लांब व दाट होतील. 

मग जाणून घ्यायच्या आहेत ना या औषधी? 

१. आवळा 

आवळ्यात व्हिटामिन ‘सी’ खूप जास्त प्रमाणात असते.

यामध्ये ऍन्टीऑक्सिडन्ट सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे कोलॅजन या प्रोटीनची निर्मिती होते.

हे प्रोटीन केसांची वाढ होण्याची गती वाढवते. थोडक्यात केसांच्या वाढीसाठी या प्रोटीनची गरज असते. 

आवळ्याची पावडर आयुर्वेदिक औषधींच्या दुकानात उपलब्ध असते. ही पावडर खोबरेल तेलात मिसळून केसांना, केसांच्या मुळांना व्यवस्थित मसाज करावा.

आठवड्यातून एक दोन वेळा असे केल्याने केसांची वाढ सुधारते. 

ही पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट सुद्धा तयार करता येते. या पेस्टचा हेयर मास्क करून केसांना अर्ध्या तासासाठी लाऊन ठेवावा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवून घ्यावेत. 

यामुळे केस साॅफ्ट आणि सिल्की व्हायला सुद्धा मदत होते तसेच कोंडा सुद्धा नाहीसा होतो. 

२. शिकेकाई 

शिकेकाई केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. यामुळे केसांची वाढ सुधारते.

शिकेकाईचे फायदे व उपयोग जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील लिंकवर क्लिक करू शकता. 

सॉफ्ट-सिल्की केसांशिवाय, नियमितपणे शिकेकाई वापरण्याचे फायदे

लांबसडक, सॉफ्ट आणि सिल्की केसांसाठी शिकेकाईचा वापर कसा करावा

३. रिठा 

केसांची वाढ सुधरवण्यासाठी रिठा हा एक उत्तम पर्याय आहे.

रिठाच्या नियमित वापराने केस गळती थांबते.

जुन्या काळात रिठाच्या फळापासून साबण तयार करण्याची पद्धत होती. यामुळे केसांमधील धूळ निघून जाऊन केस स्वच्छ व्हायला सुद्धा मदत होते.

रिठा उकळत्या पाण्यात रात्रभर बुडवून ठेवावीत. सकाळी ते पाणी गाळून केस धुण्यासाठी वापरावे.

यामुळे केसांची मुळांना आवश्यक ते पोषण मिळेल व केसांचे आरोग्य सुधारेल. 

४. मेंदी 

मेंदी हा एक नैसर्गिक हेयर कंडीशनर आहे.

मेंदीचा वापर सहसा केस रंगवण्यासाठी केला जातो पण त्याचबरोबर त्याचा उपयोग केसांच्या वाढीसाठी सुद्धा केला जातो.

मेंदीमुळे केस दाट होतात. मेंदी स्काल्पवरचे अतिरिक्त तेल घालवण्यास फायदेशीर असते.

यामुळे स्काल्पची इन्फेक्शन्स होत नाहीत. यासाठी मेंदीची पाने वाळवून त्याची पावडर करून घ्यावी.

तयार पावडर सुद्धा बाजारात उपलब्ध असते. ही पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट करून घ्यावी.

ही पेस्ट केसांना लाऊन काही तास ठेवावी व नंतर थंड पाण्याने केस धुवून घ्यावेत. महिन्यातून एकदा हा उपाय करावा. 

५. मेथी 

स्काल्पला रक्तपुरवठा व्यवस्थित व्हावा यासाठी मेथीचा उपयोग केला जातो.

केसगळती थांबवून केसांची वाढ व्हावी, केस दाट व्हावेत यासाठी मेथीचा वापर दोन-तीन प्रकारे केला जातो.

मेथीच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात. सकाळी ते पाणी शिकेकाई, आवळा व रिठा या पावडरमध्ये मिसळून केस धुण्यासाठी वापरावे.

नियमितपणे वापर केल्यास केसांची वाढ सुधारते. रात्रभर भिजलेल्या मेथी बिया सकाळी मिक्सरला वाटून घेऊन त्याची पेस्ट करावी.

ही पेस्ट केसांना २० मिनिटांसाठी लाऊन ठेवावी. हवे असल्यास या पेस्टमध्ये दही सुद्धा वापरता येते.

केसांच्या आरोग्यासाठी दही फायदेशीर असते. 

६. ब्राह्मी 

ब्राह्मीचा वापर केस गळती कमी होण्यासाठी केला जातो. बाजारात मिळणाऱ्या बऱ्याच तेलांमध्ये ब्राह्मी वापरली जाते ती याचसाठी.

यामुळे केस दाट व आरोग्यपूर्ण व्हायला मदत होते. ब्राह्मीची पावडर पाण्यात मिसळून त्याची पेस्ट करून घ्यावी.

ही पेस्ट केसांना व स्काल्पला एक तासभर लाऊन ठेवावी. नंतर पाण्याने केस धुवून घ्यावेत. 

ब्राह्मी तेलाने केसांना व डोक्याला व्यवस्थित मसाज केल्याने सुद्धा केस गळती कमी व्हायला मदत होते.

तेलाच्या मसाजमुळे स्ट्रेस कमी होतो. स्ट्रेस हे केस गळण्यासाठी महत्वाचे कारण आहे. ब्राह्मी तेलाच्या डोक्याला होणारा रक्तपुरवठा सुद्धा वाढतो व केस दाट होतात. 

७. कडुलिंब 

केसांची वाढ होण्यासाठी, केस गळती थांबवण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे. यामुळे केस मजबूत व्हायला सुद्धा मदत होते व त्यामुळे केस दाट होतात.

यामुळे स्काल्पला पोषण मिळते, कोंड्याचा त्रास असल्यास तो सुद्धा कमी होतो.

केसांचे एकूण आरोग्य सुधारल्यामुळे ते घनदाट होतात. कडुलिंबाच्या पाल्याची पेस्ट करून ती केसांना अर्ध्या तासासाठी लाऊन ठेवावी.

नंतर केस नेहमीप्रमाणे धुवून घ्यावेत. 

८. भृंगराज 

भारतात भृंगराज वर्षानुवषे वापरले जाते. यामुळे केस निरोगी होतात, त्यांची वाढ होते.

भृंगराज तेलाचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे स्ट्रेस कमी होतो.

यामुळे स्ट्रेसशी संबंधित असलेली केस गळती कमी होते. भृंगराज पानांची पावडर तुम्ही तुमच्या तेलात मिसळून ठेऊ शकता.

लांब व दाट केसांसाठी या तेलाचा नियमित वापर करावा. तुमच्याकडे ताजी भृंगराजाची पाने असतील तर ती वाटून त्याची पेस्ट केसांना १५ ते २० मिनिटे लाऊन ठेवावी न नंतर केस धुवून घ्यावेत. 

९. जवस 

जवसामध्ये खूप प्रमाणात फॅटी ऍसीड असतात.

केसांच्या वाढीसाठी हे अत्यंत गरजेचे असतात.

जवसामध्ये ऍन्टीऑक्सिडन्ट सुद्धा जास्त प्रमाणात असतात. जवस पाण्यात घालून उकळावेत.

उकळल्यावर पाणी साधारण जेल सारखे होईल.

हे जेल केसांना व्यवस्थित लाऊन ठेवावे व थोड्यावेळाने धुवून घ्यावे.

यामुळे केसांना हवे असलेले पोषण मिळून केस गळणे कमी होते व केस वाढण्यास मदत होते. 

१०. झेंडू 

झेंडूमध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि ऍन्टीऑक्सिडन्ट जास्त प्रमाणात असतात.

यामुळे कोलॅजन या प्रोटीनची निर्मिती होते. केसांच्या वाढीसाठी हे प्रोटीन गरजेचे असते.

यामध्ये असणाऱ्या व्हिटामिनमुळे केसांचे आरोग्य सुधारून ते दाट व्हायला सुद्धा मदत होते.

झेंडूची फुले वाळवून, त्याची पूड करून ती तुम्ही वापरत असलेल्या खोबरेल तेलात मिक्स करून ठेवावी.

लांब व दाट केसांसाठी या तेलाचा नियमितपणे वापर करावा. 

११. जेष्ठमध 

घशाच्या त्रासासाठी जेष्ठमधाचा वापर केला जातो, पण दाट व लांबसडक केसांसाठी सुद्धा तो वापरला जातो.

यामुळे केसांना हवे असलेले पोषण मिळते व ते दाट व्हायला मदत होतात.

जेष्ठमधामुळे केसात इन्फेक्शन असेल तर ते सुद्धा निघून जाते.

जेष्ठमध पावडर एक चमचा घेऊन साधारण ३ कप पाण्यात मिसळावी. तासाभरासाठी हे मिश्रण उकळून घ्यावे.

नंतर गाळून केसांना लावावे. नियमित वापर केल्याने केसांचे आरोग्य सुधारते. 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!