नवीन प्रॉपर्टी घेताना फसले जाल अशी भीती वाटते? मग हा लेख वाचा

नवीन प्रॉपर्टी घेताना फसले जाल अशी भीती वाटते

नवीन प्रॉपर्टी घेताना फसले जाल अशी भीती वाटते? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या व्यवहार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात 

घर, प्लॉट काहीही असो प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवणे ही एक मोठी गोष्ट आहे.

यासाठी बरीच रक्कम लागते त्यामुळे ती खर्च करताना सगळ्या गोष्टींची व्यवस्थित शहानिशा करणे गरजेचे आहे.

स्वतःचे घर ही आयुष्यातील स्वप्नवत घटना असते त्यामुळे ती सत्यात उतरवताना, अति उत्साहाच्या भरात काही गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकते.

काही गोष्टी नजरेतून सुटण्याची शक्यता असते.

पण ही एक आयुष्यभराची गुंतवणूक असते.

एकदा चूक झाली तर ती सुधारणे कठीण होते. आर्थिक व मानसिक नुकसान होते.

म्हणूनच प्रॉपर्टी संबंधी आर्थिक व्यवहार करताना काही गोष्टींचे भान ठेवले पाहिजे.

पैशांचा व्यवहार करण्याआधी आपण फसवले तर जात नाहीयोत ना? या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे. 

अशा वेळेला कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही हे समजत नाही.

पण जर तुम्हालाच काही गोष्टी माहीत असतील, तुम्ही जागरूक असाल तर तुम्हाला कोणावर अवलंबून असायची गरजच नाही.

तुम्हीच योग्य पद्धतीने विचार करून योग्य निर्णय घेऊ शकता. 

प्रॉपर्टीच्या व्यवहारात बऱ्याचदा दोन पेक्षा जास्त पार्टी असतात.

अशा वेळेला पेपरवर्क जास्त असते.

त्यामुळे गोंधळ उडू शकतो. काही लोक धूर्त असण्याची सुद्धा शक्यता असते.

कधी फसव्या लोकांशी गाठ पडू शकते.

त्यामुळे प्रॉपर्टी विषयी व्यवहार करताना काही गोष्टींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. 

हे व्यवहार करताना तुम्हाला या गोष्टींची माहिती हवी, तुम्ही फसवले जाऊ नये म्हणून काय खबरदारी बाळगायची, कोणत्या गोष्टींची शहानिशा करायची या गोष्टी या लेखात सांगितल्या आहेत. 

१. ओनरशिपची खात्री करून घ्या 

घर विक्री/खरेदी अजेंटमध्ये अजेंट मध्यस्थी करत असतात.

बऱ्याचदा काही व्यवहारात एका पेक्षा जास्त मध्यस्त सुद्धा असण्याची शक्यता असते.

अशा वेळेला तुम्ही व्यवहार नक्की कोणाशी करताय, घर कोणाच्या नावावर आहे, कागदपत्रे कोणाच्या नावावर आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

ज्या माणसाच्या नावावर घराची किंवा प्लॉटची ओनरशिप आहे त्याच माणसाशी तुमचा व्यवहार झाला पाहिजे, मध्यस्थांशी नाही. 

जर खऱ्या मालकाने पॉवर ऑफ अटर्नी, म्हणजे घरासंबंधी व्यवहार करायचे हक्क दुसऱ्या कोणावर सोपवले असतील तर तुम्ही ते पडताळून बघायला हवे.

त्या संबंधी कागदपत्रे मागून त्याची शहानिशा करायला हवी. यामुळे काही फ्राॅड होणार नाही. 

घर विकत घ्यायचा करार हा घर विकणारा, म्हणजेच

घराचा खरा मालक (ज्याच्या नावावर घराची कागदपत्रे आहेत ती व्यक्ती) आणि घर विकत घेणाऱ्या मधेच झाला पाहिजे. 

२. बँक अप्रूव्हलची खात्री करून घ्या 

तुम्हाला जी प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे तिच्या संबंधी काही फ्राॅड घडला आहे का?

कागदपत्रात काही अफरातफर केली असण्याची शक्यता आहे का?

हे जाणून घ्यायचा हा सोपा मार्ग आहे.

यासाठी बँक अप्रूव्हल करून घेता येते.

बँक अप्रूव्हल फक्त अशाच प्रॉपर्टीला मिळते ज्याचे सगळी कागदपत्रे कायदेशीर आहेत.

याची खात्री करूनच बँक अप्रूव्हल मिळतील. यामुळे घर विकत घेणाऱ्याला मदत होते.

गैरव्यवहार असलेली, अपूर्ण कागदपत्रे असलेली, कायदेशीर बाबी पूर्ण न झालेली प्रॉपर्टी बँकेकडून अप्रूव्ह होत नाही.

त्यामुळे तुम्ही सुद्धा नवीन प्रॉपर्टी घेताना बँक अप्रूव्हल नक्की करून घ्या. जे होम लोन घेताना केले जाते.

३. टायटल डीड बघून खात्री करून घ्या 

टायटल डीडमुळे तुम्हाला दोन गोष्टी समजतात.

एक म्हणजे तुम्हाला जी प्रॉपर्टी विकत घ्यायची आहे ती विक्रेत्याच्या नावावर आहे का?

हे रिसेल व डेव्हलपर दोघांच्या ही बाबतीत लागू पडते. 

तसेच यामुळे जो तुम्हाला प्रॉपर्टी विकतो आहे त्याच्याकडे ती प्रॉपर्टी विकण्याचे हक्क आहेत का?

हे सुद्धा तुम्हाला टायटल डीड वाचून समजते.

जेव्हा तुम्ही टायटल डीड बघायला मागाल तेव्हा तुमच्या हातात त्याची मूळ प्रतच येत आहे ना याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.

टायटल डीडच्या झेरोक्सवर किंवा मोबाईल मधल्या फोटोवर विश्वास न ठेवणे हेच इष्ट आहे.

जर तुम्ही विकत घेऊ पाहणाऱ्या प्रॉपर्टीचे टायटल नसेल तर शक्यतो असा व्यवहार टाळावा.

यामुळे पुढे जाऊन कायदेशीर गुंतागुंत होण्याची शक्यता असते. 

४. कम्प्लिशन सर्टिफिकेट तपासून बघा 

कम्प्लिशन सर्टिफिकेट हे त्या भागातील म्युनिसिपाल्टी कडून दिले जाते.

याचा अर्थ असा होतो की त्या इमारतीचे बांधकाम मान्यता दिल्या गेलेल्या प्लान प्रमाणेच झाले आहे व ती बिल्डींग राहण्यास योग्य आहे.

जर कोणत्या इमारतीला असे कम्प्लिशन सर्टिफिकेट दिले गेले नसेल, तर त्याचा अर्थ असा होतो की ते बांधकाम म्युनिसिपाल्टीच्या परवानगीशिवाय केले गेले आहे.

असे असल्यास त्या बांधकामाचा काही भाग किंवा पूर्ण बांधकाम सुद्धा  तोडण्याचा हक्क म्युनिसिपाल्टीकडे असतो.

५. लेआऊट व्यवस्थित तपासा 

कोणतेही व्यवहार करण्याआधी डेव्हलपरकडून किंवा रीसेलरकडून लेआऊटची प्रत घेतली पाहिजे.

डेव्हलपर सुपर बिल्ट अप एरिया, बिल्ट अप एरिया, कार्पेट एरिया असे शब्द वापरतात.

प्रॉपर्टीचे दर सुद्धा याच प्रमाणे ठरतात.

पण तुम्ही जेव्हा एखादे घर खरेदी करायला जाल तेव्हा केवळ बिल्डरच्या म्हणण्यावर, छापलेल्या जाहिरातींवर  विश्वास न ठेवता घराचा कार्पेट एरिया स्वतः मोजला पाहिजे.

हे पुढील वाद टाळण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.

तुम्ही मोजलेला कार्पेट एरियाच तुमच्या एग्रीमेंटवर नमूद होत आहे न याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. 

६. प्रॉपर्टी कायदेशीररीत्या ‘क्लीअर’ आहे का नाही ते तपासून बघा 

प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी सगळ्या बाबी तपासताना ही महत्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.

इंकंबन्सी सर्टिफिकेट तपासल्यावर हे समजते की ती प्रॉपर्टी कोणत्या कायदेशीर वादांमध्ये गुंतली आहे का?

किंवा त्या प्रॉपर्टी विषयी काही कायदेशीर तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत का?

जर तुम्ही विकत घेत असणारी प्रॉपर्टी एखाद्या सोसायटीचा भाग असेल तर सोसायटीकडून नो ओब्जेक्शन सर्टिफिकेट घेणे महत्वाचे आहे. 

७. ‘काॅस्ट ब्रेक अप’ साठी आग्रही व्हा 

एखाद्या प्रॉपर्टीची एक अख्खी मोठी किंमत सांगितली जाते.

म्हणजेच तुमची प्रॉपर्टी, त्या बरोबर येणाऱ्या ऍमेनीटीज, जास्तीची पार्किंगसाठी जागा इत्यादीची मिळून याची एकच रक्कम तुम्हाला सांगितली जाते.

पण खरेदी करण्यापूर्वी या सगळ्याची स्वतंत्र कॉस्ट जाणून घेणे हे केव्हाही हिताचे असते.

हे कॉस्ट ब्रेक अप एग्रीमेंटमध्ये सुद्धा नमूद करून घ्यावे.

यामुळे नंतर काही जास्तीचा खर्च करावा लागणार नाही. 

८. एग्रीमेंट व्यवस्थित करा 

बऱ्याचदा हे गंभीरपणे घेतले जात नाही.

बिल्डर किंवा सेलर एग्रीमेंट देतो आणि ते वरवर वाचून त्यावर सह्या केल्या जातात.

पण असे करणे बरोबर नाही. यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता असते.

वर नमूद केलेले सर्व मुद्दे एग्रीमेंटमध्ये लिहून घेण्यासाठी आग्रह करावा.

ते लिहून घेतलेत का नाही याची शहानिशा करावी.

पुढे वाद होऊ नयेत यासाठी सुद्धा हे गरजेचे असते.

जर ऍग्रिमेंट प्रमाणे व्यवहार झाला नाही तर तुम्हाला बिल्डरवर किंवा सेलरवर कायदेशीर कारवाई करता येते.

त्यामुळे ऍग्रिमेंट दोनदा, तीनदा तपासून घेण्यात, त्यात हवे ते बदल करून घेण्यात, करण्यात वेळ वाया जातो असे समजू नये. 

९. रजिस्ट्रेशन वेळेत करून घ्या 

एग्रीमेंट झाली, व्यवहार झाले की रजिस्ट्रेशला अजिबात वेळ घालवू नये.

प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन तुमच्या नावावर करून घेणे हे महत्वाचे असते.

हे करण्यात उशीर झाला किंवा केले नाही तर त्याच प्रॉपर्टी संबंधी दुसरे व्यवहार परस्पर होऊ शकतात. 

१०. कन्स्ट्रक्शन लिंक्ड प्लान 

बऱ्याचदा मोठी रक्कम सुरुवातीला भरल्यास काही बिल्डर भरघोस डिस्काऊंट देतात.

हे डिस्काऊंट आकर्षक वाटून तुम्ही अशी रक्कम भरण्याच्या आहारी पडू शकता.

पण तसे न करता कन्स्ट्रक्शन लिंक्ड प्लानचा आग्रह धरावा, म्हणजेच जसजसे बांधकाम होत जाईल तसेतसे पैसे भरत जायचे.

यामुळे प्रोजेक्ट डीले झाले तर पैसे अडकून पडत नाहीत तसेच फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

2 Responses

 1. स्वप्नील चौगले says:

  खूप छान माहिती दिली आहे . या मधून खूप शिकता आले.

  • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

   मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

   #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

   व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

   https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

   टेलिग्राम चॅनल👇

   https://t.me/manachetalksdotcom

   मनाचेTalks फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalks/

   मनाचेTalks हिंदी फेसबुक पेज:

   https://www.facebook.com/ManacheTalksHindi/

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!