व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात.
त्वचेच्या बाबतीत हे अगदी लागू होते. काहींना तेलकट त्वचेचा त्रास होतो तर काहींची त्वचा कोरडी असते.
काहींना त्वचेवर फोड येतात, काहींच्या डोळ्या भोवती काळी वर्तुळे येतात.
पण सहसा त्वचेबद्दल असणारी एक नेहमीची तक्रार म्हणजे चेहऱ्यावर काळे डाग असणे.
कधी पिंपल्स येऊन गेल्यावर असे डाग राहतात तर कधी चेहऱ्यावर पिगमेंटेशन होऊन काळे डाग पडतात.
त्वचेच्या या सगळ्या समस्यांमुळे दिसण्यावर परिणाम होतो त्याचा परिणाम आत्मविश्वासावर होतो.
चेहऱ्यावर डाग असतील तर चार चौघात बुजल्यासारखे होते. कधी काही लोक अचानक प्रश्न विचारून अजून कानकोंड करतात.
चेहऱ्यावरचे हे डाग मेक-अप मुळे लपवता येतात हे खरे आहे. पण जर हे डागच नष्ट करायच्या काही सोप्या पद्धती असतील तर?
ते सुद्धा तुमच्या घरात नेहमी असणारा एक पदार्थ वापरून? खरेतर तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर असणारे अनेक घटक तुम्हाला स्वयंपाकघरात सापडतात, जसे की काकडी, टोमॅटो, दही.
या लेखात सुद्धा अशाच एका महत्वाच्या घटकाबद्दल सांगितले आहे, तो म्हणजे बटाटा.
बटाट्याचा वापर करून चेहऱ्यावरचे डाग घालवता येतात, पण त्याचा वापर कोणकोणत्या प्रकारे केला जाऊ शकतो, त्या बरोबर अजून कोणते घटक वापरता येतात ही सगळी माहिती या लेखातून तुम्हाला समजणार आहे.
चेहऱ्यावरचे काळे डाग कसे कमी करायला बटाट्याचा कसा उपयोग केला जाऊ शकतो?
या घरगुती उपायांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याचे कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत.
यामुळे त्वचेवर रॅश येणे, त्वचा कोरडी पडणे यासारखे त्रास होत नाही.
तुमची त्वचा खूप नाजूक असेल तर हे उपाय केल्यानंतर चेहऱ्याला नेहमीच्या वापरातील क्रीम लावावी.
या उपायांचा अजून एक फायदा म्हणजे हे करायला सुद्धा अतिशय सोपे आहेत. घरात असणाऱ्याच घटकांचा वापर यामध्ये सांगितला आहे.
या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला बटाट्याचा ताजा रस लागेल. बटाट्याचा रस काढायची प्रक्रिया सोपी आहे.
त्यासाठी बटाटा व्यवस्थित धुवून, त्याची साल काढून तो किसून घ्यावा. किसलेला बटाटा हाताने किंवा सुती कपड्यात घालून व्यवस्थित पिळून घेऊन रस काढून घ्यावा.
१. बटाटा व लिंबू रस
बटाट्याचा ताजा रस आणि लिंबाचा रस हे समप्रमाणात घ्यावे.
कापसाच्या बोळ्याने पूर्ण चेहऱ्यावर हा रस लाऊन पाच मिनिटांसाठी ठेवावा. पाच मिनिटांनी चेहरा धुवावा.
नियमितपणे हा उपाय केल्याने चेहऱ्यावरचे काळे डाग फिकट होऊन हळूहळू नाहीसे होतात. हा उपाय आठवड्यातून तीनदा करावा.
२. फेसपॅक
त्वचेच्या अनेक समस्यांसाठी घरगुती फेसपॅक तयार करता येतात. यामध्ये इतर कोणत्याही केमिकल्सचा वापर नसल्याने त्वचेसाठी ते अतिशय चांगले असतात.
अशा घरगुती फेसपॅकचा इतर कुठलाही विपरीत परिणाम सुद्धा होत नाही.
चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी सुद्धा असा एक सोपा फेसपॅक घरच्याघरी तयार करता येतो.
यासाठी मुलतानी मातीमध्ये बटाट्याचा रस घालून घट्ट पेस्ट करून घ्यावी. मुलतानी माती ही त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली असते.
हा फेसपॅक चेहऱ्यावर सगळीकडे व्यवस्थित लाऊन घ्यावा. चेहऱ्यावरचा पॅक पूर्ण सुकल्यावर चेहरा धुवावा.
आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे केल्याने चेहऱ्यावरचे डाग जाऊन त्वचा नितळ होते.
३. बटाटा व हळद
बटाट्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात तर हळदीमुळे त्वचा उजळते.
बटाट्याच्या ताज्या रसात एक चमचा हळद घालून कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर लाऊन ठेवावे.
पाच ते दहा मिनिटांनंतर चेहरा धुवावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने त्वचा नितळ व उजळ होते.
४. टोनर
बटाट्याचा रस वापरून नैसर्गिक टोनर तयार करता येतो.
चेहरा फेसवाॅश वापरून व्यवस्थित धुवून घेतल्यावर, बाहेर जाण्यापूर्वी हा टोनर चेहऱ्यावर हलक्या हाताने किंवा कापसाच्या बोळ्याने लाऊन ठेवता येतो.
यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचा पोत सुधारतो, चेहऱ्यावरचे डाग, फोड कमी होतात आणि त्वचा नितळ व्हायला मदत होते.
हा टोनर तयार करण्यासाठी एका मध्यम आकाराच्या बटाट्याचा रस काढून घ्यावा.
त्यामध्ये साधारण एक कप पाणी घालावे. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे.
ही बॉटल तुम्हाला बाहेर जाताना सुद्धा सहज बरोबर घेऊन जाता येईल.
यामध्ये रस फार दिवसांसाठी भरून ठेऊ नये. शक्यतो दर दो-तीन दिवसांनी ताजा रस काढावा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.