सेलफोन अधिक काळ सुस्थितीत राहण्यासाठी त्याची काळजी कशी घ्यावी

स्टे कनेक्टेड, कर लो दुनिया मुठ्ठीमें म्हणत आपण सेलफोन हातात घेतला खरा पण आता सेलफोननेच जगाला मुठीत ठेवलय म्हणायला हरकत नाही.

एकमेकांशी सहज संपर्क साधला जाईल, वेगवेगळी माहिती हाताशी ठेवायला भलीमोठी कागदपत्र सांभाळण्यापेक्षा एक स्मार्टफोन सोयीचा असतो.

आठवणीत रहावे असे प्रसंग स्मार्टफोन मुळे फोटो घेऊन टिपता येतात.

कुठेही गेलं तरी सहज नेता येईल असा हा फोन.

त्याच्या छोट्या आकारामुळे खिशात, पर्समधे सहज ठेवता येतो.

आता तर काय वर्क फ्रॉम होम आणि learn फ्रॉम होम मुळे आबालवृद्ध बराचवेळ फोनलाच जोडलेले असतात.

हा फोन एका रोबोसारखीच मदत करत असला तरी ते शेवटी एक मशीनच आहे.

त्याच्या मेमरीला मर्यादा आहेत, त्याची इलेक्ट्रॉनिक बॅटरी सांभाळावी लागते, पाणी, वीज, आग पेट्रोल, डिझेल यापासून फोन सांभाळून ठेवावा लागतो.

अशा काही गोष्टी जमल्या तर आपला सेलफोन आपल्याला दीर्घकाळ मदत करेल यात शंका नाही.

तर या लेखात आपण जाणून घेऊ सेलफोनची योग्य काळजी कशी घ्यायची ते…..

१. योग्य फोनची निवड कशी करावी :

हल्ली फोन घेणं ही एक चांगली आर्थिक गुंतवणूक आहे असं म्हणायला हरकत नाही.

आपण काय काम करतो, कोणकोणत्या कामासाठी फोन उपयोगी ठरेल, कोणत्या फोनचे फीचर्स चांगले आहेत, फोनचा आकार कसा आहे, रंग कसा आहे, कॅमेरा, मेमरी, याशिवाय टीव्ही, कॉम्प्युटर यांना जोडता येण्यासारखा आहे का, जो फोन आपण घेणार त्याचा ब्रॅंड, मॉडेल चांगल्या प्रतीचे आहे का अशा काही गोष्टी पडताळून पहाव्या लागतात.

तरच आपण योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याचं समाधान मिळतं.

नाहीतर कमी दर्जाचा फोन हातात पडल्यावर वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेल्यासारखे वाटते.

२. फोनची योग्य काळजी कशी घ्यावी :

एकदा चांगल्या प्रतीचा फोन हातात घेतल्यावर त्याची योग्य काळजी घेणं ही आपली जबाबदारी असते.

ती जबाबदारी नेमकी कशी पार पाडायची ते पाहुया…

A. फोन सुरक्षित राहण्यासाठी त्याला स्क्रीन प्रोटेक्टर लावणं आणि ठेवण्यासाठी एखादी चांगली केस वापरावी.

त्यामुळे फोन हातातून निसटून पडला तरी त्याला तडे जात नाहीत.

फोनच्या स्क्रीन वर ओरखडे येत नाहीत. फोन पडला तरी इंटर्नल डॅमेजची शक्यता कमी होते.

B. फोन जेव्हा वापरात नसेल तेव्हा एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवावा.

टेबल, शेल्फ, चार्जिंग पॉईंट जवळ असेल अशी एखादी जागा आणि महत्वाच्या वेळेला लगेच सापडेल अशी जागा निवडावी.

फोनसाठी एखादा स्टॅंड घ्यावा. फोन वापरात नसताना पर्समध्ये किंवा ड्रॉवरमध्ये ठेवू नये.

चार्जिंग करत असताना कपाट, ड्रॉवर अशा बंद ठिकाणी ठेवू नये.

फोन ज्या ब्रॅंडचा असेल शक्यतो त्याच ब्रॅंडच्या ऍक्सेसरीज आणि चार्जर वापरावा.

तेच त्या फोनसाठी योग्य असत. कमी दर्जाच्या ऍक्सेसरीजमुळे फोन लवकर खराब होण्याची शक्यता असते.

C. फोन नेहमी कोरड्या जागी ठेवावा. डायनिंग टेबल, किचन, बाथरूम, स्विमिंग पूल अशा ठिकाणी फोन ठेवू नये.

फोनचा पाण्याशी संपर्क येऊ देऊ नये. पाऊस पडत असलेल्या ठिकाणी फोनचा वापर टाळावा.

D. फोनचा पृष्ठभाग नेहमी स्वच्छ ठेवावा. त्यासाठी कोरडा टिश्यू पेपर, स्वच्छ सुती कापड वापरावे.

पण इतर कोणतही रसायन, पाणी यांचा वापर करू नये.

E. वेळच्यावेळी फोन चार्ज करावा. फोनचा वापर किती आणि कसा होतो यावर फोनची बॅटरी कितीवेळा चार्ज करावी लागेल ते ठरवाव लागतं.

जास्त वेळ फोनवर बोललं जात असेल, व्हिडिओ बघणं, चॅटिंग करणं, गेम्स खेळणं यामुळे फोनचं चार्जिंग लवकर कमी होतं.

फोनचा वापर कमी होत असेल तर २४ तासापेक्षा जास्त काळ बॅटरीच चार्जिंग टिकून राहतं.

त्यामुळे योग्य वेळी बॅटरीचं चार्जिंग करणं सोयीच असत.

सर्वसाधारणपणे ४०% ते ८०% यादरम्यान बॅटरीचं चार्जिंग असाव.

F. एखाद्या समारंभात, वर्गात, मिटींगमध्ये असताना फोन सायलेंट मोडवर ठेवावा.

जेणेकरून इतरांना आपल्या फोनचा त्रास होणार नाही.

जमल्यास फोन स्विच ऑफ करून ठेवावा.

फोन व्हायब्रेशन मोडला असल्यास टेबलवरून जमिनीवर पडण्याची शक्यता असते.

ज्यामुळे हमखास फोन खराब होऊ शकतो. त्यापेक्षा फोन फ्लाईट मोडवर ठेवल्यास सुरक्षित राहतो आणि आपणही डिस्टर्ब होत नाही.

३. फोनची चोरी होण्यापासून सावधगिरी कशी बाळगावी:

आपला फोन जितका चांगल्या दर्जाचा असेल तसा तो जास्त सांभाळून ठेवावा लागतो.

चांगल्या दर्जाचा फोन हे चोरांचसुद्धा आकर्षण असत.

असा फोन गहाळ झाला तर आपलं आर्थिक नुकसान तर होतच शिवाय महत्त्वाचे दस्तावेज गहाळ होण्याची शक्यता असते.

सध्या आर्थिक व्यवहार सुद्धा फोनच्या माध्यमातून होत असल्याने बॅंक अकाउंट तपशील चोरांच्या हाती लागण्याची शक्यता असते.

फोनचा चोरीपासून कसा बचाव करता येईल ते पाहुया..

A. फोन शक्यतो स्वतःजवळ ठेवा. इतरांना दिला तरी लगेच आपल्याला मिळेल ते पहा.

फोन हातोहात लंपास होणार नाही याची काळजी घ्या.

B. आधुनिक थेफ्ट शटडाऊन सॉफ्टवेअर वापरणं केव्हाही उत्तमच.

हल्लीच्या चांगल्या ब्रॅंडच्या फोनमध्ये चोरी झाल्यास फोन शटडाऊन करण्याच्या सॉफ्टवेअरची सोय असते.

त्यामुळे चोरी झालेला फोन परत मिळवता येऊ शकतो.

अशा काही गोष्टी जमल्या तर नक्कीच आपण आपला फोन सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकवून ठेवू शकतो.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय