या आरोग्यवर्धक पदार्थांचा पुरुषांनी आपल्या आहारात समावेश करावा 

या आरोग्यवर्धक पदार्थांचा पुरुषांनी आपल्या आहारात समावेश करावा 

पुरुषांना निरोगी राहण्यासाठी गरजेचे असणारे पदार्थ हे बायकांपेक्षा साहजिकच वेगळे असतात.

पुरुषांना बायकांच्या तुलनेत जास्त कॅलरीज देखील लागतात.

बायकांच्या तुलनेत पुरुषांचे वजन सुद्धा त्यांच्या उंचीनुसार जास्त असते.

ठराविक वयानंतर पुरुषांना व बायकांना होणारे आजार सुद्धा वेगवेगळे असतात.

या सगळ्याचा अर्थ एकच की बायकांचा आणि पुरुषांचा आहार, म्हणजेच आहारात असणारे पदार्थ व त्यांचे प्रमाण हे वेगवेगळे असायला हवे.

तुमच्या रोजच्या जेवणाच्या बाबतीत सुद्धा या मुद्द्यांचा तुम्ही गांभीर्याने विचार करायला हवा. 

बायकांच्या तुलनेत पुरुषांच्या शरीरातील मसल्सचे प्रमाण जास्त असते.

यामुळे प्रथिने जास्त प्रमाणात असणारे पदार्थ हे पुरुषांसाठी अत्यंत गरजेचे असतात.

खरेतर प्रथिने बायकांसाठी सुद्धा गरजेची असतातच पण शरीरात मसल्स जास्त असल्याने पुरुषांनी बायकांच्या तुलनेत जास्त प्रमाणात प्रथिने खायला हवी.

आहारात जास्त प्रोटीन्स घेत असल्याने पुरुषांना त्यांच्या आहारात इतरही काही घटकांचा समावेश करणे गरजेचे असते.

जेणेकरून या जास्तीच्या प्रोटीन्सचे पचन योग्य पद्धतीने होईल. 

निरोगी राहण्यासाठी व्यायामाबरोबरच योग्य आहाराचे सुद्धा महत्व आहे.

तब्येतीच्या दृष्टीने पुरुषांनी त्यांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

यामुळे पुरुषांना जास्तीच्या कॅलरी मिळतील. 

पुरुषांनी आहारात काय बदल करायचे, कोणत्या आरोग्यवर्धक पदार्थांचा समावेश करणे जरुरी आहे आणि का हेच या लेखात आपण बघणार आहोत. 

१. सुकामेवा  

बदामामध्ये प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात.

दिवसभरात साधारण ७ ते ८ बदाम पुरुषांनी खाल्ले पाहिजेत.

यामुळे त्यांना जरुरी असलेले प्रोटीन्स मिळतील.

सकाळी उठल्यावर किंवा मधल्या भुकेच्या वेळी बदाम खाल्ले जाऊ शकतात.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा बदाम उपयुक्त असतात.

पिस्ता सुद्धा मधल्या भुकेच्या वेळी खाण्यासाठी चांगला पर्याय आहे.

पिस्त्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात असतात.

त्याचबरोबर ह्रदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा पिस्ता चांगला असतो.

यामुळे शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी होते.

काजूमध्ये मॅग्नेशीयम जास्त प्रमाणात असतात. यामुळे शरीरातील मसल्स वाढायला मदत होते. 

२. रताळी 

रताळ्यात व्हिटामिन ‘ए’ जास्त प्रमाणात आढळतात.

व्हिटामिन ‘ए’ हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय गरजेचे असते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा व्हिटामिन ‘ए’ गरजेचे असते.

जेवणात बटाट्याच्या ऐवजी रताळ्याचा वापर केल्यास ते फायदेशीर ठरते. 

३. सूर्यफुलाच्या बिया 

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटामिन ‘ई’ जास्त प्रमाणात असतात.

व्हिटामिन ‘ई’ हे फ्री रॅडीकल्सपासून शरीराच्या इतर पेशींचे संरक्षण करतात.

यामुळे अनेक रोगांपासून सुद्धा संरक्षण मिळते.

भाजलेल्या सूर्यफुलाच्या बिया बाजारात उपलब्ध असतात.

संध्याकाळी चहाबरोबर बिस्कीट, चिवडा किंवा तत्सम पदार्थांऐवजी खाण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. 

४. कलिंगड 

पुरुषांसाठी कलिंगड खाण्याचे दोन महत्वाचे फायदे आहेत.

कलिंगडामध्ये पोटॅशीयम जास्त प्रमाणात आढळते.

शक्ती वाढवण्यासाठी, दिवसभर ताजेतवाने वाटावे यासाठी पोटॅशियम गरजेचे असते.

कलिंगडामध्ये लायकोपीन नावाचे द्रव्य असते.

कलिंगडाला लाल रंग हा लायकोपीन याच द्रव्यामुळे येतो.

प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करायला लायकोपीन उपयुक्त असते या दोन गुणांमुळे एरवी सुद्धा कलिंगड हे पुरुषांच्या आहारात असलेच पाहिजे.

पण  प्रोस्टेट कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी वयाच्या पन्नाशी नंतर पुरुषांनी कलिंगडाचा आहारात समावेश केलाच पाहिजे.

५. पनीर 

पनीरमध्ये केसीन आणि व्हे हे दोन्ही प्रोटीन जास्त प्रमाणात आढळतात.

शरीरातील मसल्ससाठी हे प्रोटीन गरजेचे असतात.

मसल्सची ताकद वाढवण्यासाठी पुरुषांनी आहारात नियमितपणे पनीरचा समावेश केला पाहिजे. 

६. ओलिव्ह ऑईल

ओलिव्ह ऑईलमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे गुड फॅट असते.

यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी व्हायला मदत होते.

याचमुळे ह्रदयाच्या आरोग्यासाठी ओलिव्ह ऑईल अतिशय चांगले असते.

ज्या पुरुषांना ह्र्दयविकार असतात, उच्च रक्तदाबाचा त्रास असतो त्या पुरुषांनी आवर्जून ओलिव्ह ऑईलचा समावेश त्यांच्या आहारात केला पाहिजे. 

७. पालक 

पालक ही बहुगुणी पालेभाजी आहे.

या भाजीत आयर्न हे खनिज जास्त प्रमाणात आढळते.

यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यासाठी मदत होते.

या भाजीत फायबर सुद्धा जास्त प्रमाणात आढळतात.

वजन कमी करण्यासाठी आहारात फायबरचे प्रमाण वाढवले पाहिजे.

फायबरमुळे पचनशक्ती सुद्धा सुधारते. पालक भाजीत व्हिटामिन ‘ए’ जास्त प्रमाणात आढळतात.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्हिटामिन ‘ए’ आवश्यक असते.

एकूण आरोग्याच्या दृष्टीने पालक अतिशय फायदेशीर असल्याने त्याचा समावेश आहारात नियमितपणे करावा. 

८. तांबडा भोपळा 

तांबड्या भोपळ्यामध्ये झिंक हे खनिज खूप जास्त प्रमाणात असते.

यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. झिंकमुळे हाडे मजबूत होतात.

पुरुषांचे वय वाढत जाते तसे हाडे कमकुवत होण्याची शक्यता असते.

त्यामुळे आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे ज्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारेल.

यासाठी तांबडा भोपळा चांगला पर्याय आहे. 

९. लसूण 

लसणात ऍलीसीन नावाचे द्रव्य असते.

हे एक ऍन्टीऑक्सिडंट आहे. यामुळे शरीरातील पेशी निरोगी राहण्यासाठी फायदा होऊन, विविध आजार रोखले जातात.

नियमितपणे लसूण खाल्ल्यास रोग प्रतिकारशक्ती सुधारते.

लसणाच्या नियमित सेवनाने पुरुषांमध्ये स्ट्रोकचा धोका सुद्धा कमी होते. 

१०. नारळ 

नारळ खाल्ल्याने शरीरातील गुड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.

ह्रदयाच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरते.

पुरुषांनी आहारात नियमितपणे खोबऱ्याचा समावेश करावा. 

११. ब्रोकोली 

ब्रोकोलीमध्ये व्हिटामिन ‘सी’ जास्त प्रमाणात आढळते. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटामिन ‘सी’ अतिशय गरजेचे असते.

ब्रोकोलीमध्ये फायबरचे प्रमाण सुद्धा जास्त असते.

वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ब्रोकोली उपयुक्त ठरते.

त्याचबरोबर पचनसंस्थेच्या तक्रारी सुद्धा ब्रोकोलीतील फायबरमुळे दूर होतात. 

१२. कडधान्ये 

पुरुषांच्या शरीरात मसल्सचे प्रमाण जास्त असल्याने त्यांना प्रोटीन्स जास्त प्रमाणात लागतात हे आपण बघितलेच आहे.

मोड आलेली कडधान्ये म्हणजे प्रोटीन्सचा महत्वाचा स्त्रोत.

आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा जेवणाबरोबर एक वाटी मोड आलेली कडधान्ये पुरुषांनी जरूर खावीत.

कडधान्याची उसळ किंवा वाफवून सॅलड करणे हे काही चांगले पर्याय आहेत. 

१३. काबुली चणे 

काबुली चणे, किंवा छोले यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतात.

यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते.

काबुली चण्यांमध्ये व्हिटामिन बी-6 जास्त प्रमाणात आढळते. 

१४. कोबी 

कोबीचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा असतो कि त्यामध्ये कोलेस्टेरॉल अजिबात नसते.

त्यामुळे ज्या पुरुषांना ह्र्दयविकार आहेत त्यांनी आवर्जून कोबीचा आहारात समावेश केला पाहिजे.

जेवणात सॅलड म्हणून कोबी खाणे हा एक चांगला पर्याय आहे.

यामुळे पोट सुद्धा भरते व अनावश्यक कॅलरी पोटात जात नाहीत.

कोबीमध्ये व्हिटामिन ‘सी’ जास्त प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. 

१५. सोयाबीन 

सोयाबीनमध्ये आयर्न व कॅल्शियम ही खनिजे जास्त प्रमाणात आढळतात.

सोयाबीनमुळे हाडांचे आरोग्य सुधारते.

त्याचबरोबर यामध्ये प्रोटीन्स सुद्धा जास्त प्रमाणात असतात.

सोया चंक्सची भाजी, सोयाबीन तेल आणि सोया मिल्क या गोष्टींचा आहारात समावेश केल्याने फायदा होते. 

आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी आहारात काय खावे हे माहीत हवे.

पण त्या बरोबर कोणते पदार्थ टाळावेत हे सुद्धा माहीत हवे.

पुरुषांना सहसा उच्च रक्तदाबाचा त्रास असतो.

त्यामुळे त्यांनी तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ टाळायला हवेत.

ज्या पदार्थांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढेल असे पदार्थ कमी प्रमाणात घ्यायला हवेत.

तसेच जास्त गोड, खूप प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असणाऱ्या पदार्थांमुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

वाढलेले वजन अनेक आजारांना सोबत घेऊन येते. म्हणूनच हे पदार्थ सुद्धा टाळायला हवेत. 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!