औषधे घेताना काय काळजी घ्यावी?

औषध घेताना काय काळजी घ्यावी?

लेखन: चांगदेव गिते (एम.फार्मसी)

औषधे हे नेहमी डॉक्टर अन फार्मासिस्टच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजेत.

ज्या दुकानातून औषध घेणार आहात तिथे रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहे का नाही हे बघणं गरजेचं आहे.

आजही ग्रामीण, निम-शहरी भागात बऱ्याच प्रमाणात मेडिकल वर फार्मासिस्ट नसतात.

शहरी भागात ही काही मेडिकल स्टोर वर फार्मासिस्ट नसतात. अशा वेळी आपण त्यांना रजिस्टर्ड नंबर विचारू शकतो.

औषध घेताना कोणत्याही बाबी डॉक्टर, फार्मासिस्ट यांच्यापासून लपवू नयेत. जसे की इतर एखादा आजार, इतर कोणते औषध, प्रेग्नन्सी, ऍलर्जी वगैरे. कारण औषध हे इतर बऱ्याच गोष्टींवर परिणाम करू शकते.

औषधे हे सांगितलेल्या वेळेनुसार घेतले पाहिजेत कारण प्रत्येक औषधांची काम करण्याची एक पद्धत असते.

औषध हे नेहमी लहान मुलांपासून दूर ठेवावेत.

मनाने एकमेकांचे औषधे शेअर करू नयेत.

उदा. घरात वडिलांना खोकला असला तर तेच औषध मनाने मुलाला देऊ नये कारण औषधांच्या मात्रा, प्रकार ह्या लिंग, वय इतर गोष्टींनुसार बदलत असतात.

औषधे घेताना दारू, सिगारेट, गांजा असले कोणतेही व्यवसन करू नये कारण बरेच औषधं हे अल्कोहोल, निकोटिन बद्दल रिऍक्ट होऊन काही चुकीचे परिणाम करू शकतात.

औषध घेताना फार्मासिस्ट कडून बिल घ्यायला विसरू नये. व EXPIRY डेट तपासून घ्यावी.

फेरीवाले, किराणा दुकान, भोंदू बुवा-बाबा यांच्याकडून औषधे घेऊ नयेत.

गर्भारपणात औषधे हे अत्यंत काळजीपूर्वक व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत कारण त्याचा होणाऱ्या बाळावर परिणाम होऊ शकतो.

औषधांच्या ठेवायच्या जागा, तापमान विचारून घ्यावे कारण काही औषध जास्त तापमानात खराब होतात. त्यांना फ्रिजिंग ची गरज असते.

जास्त औषध घेतले तर लवकर बरे होऊ हा अनेकांचा गैरसमज आहे.

औषधे हे गोळ्या-बिस्कीट नाहीत त्यामुळे ते नेहमी काळजीपूर्वक घ्यावेत.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.