उत्पन्न वाढवण्यासाठी हे चार साईड बिजनेस तुम्ही सुद्धा करू शकता

वाढत्या महागाईमुळे सगळेच बेजार झालेले आहेत.

अशा परिस्थितीत सरकारला दोष देणं आणि आपले खर्च कमी करणं यापेक्षा उत्पन्नाचे स्रोत वाढवून आपली आर्थिक बाजू भक्कम करण्याचा विचार केला तर!!

गेल्या २०-२५ वर्षात झपाट्याने झालेले बदल पाहता, उत्पन्नासाठी फक्त नोकरी किंवा साचेबद्ध व्यवसाय हे दोनच मार्ग राहिले नसून, तुमच्यातल्या गुणांना सुद्धा तुम्ही मोनिटाईझ करू शकता.

म्हणजेच तुमच्यातले गुण हेरून त्याचा योग्य उपयोग करून उत्पन्नाचे स्रोत तुम्ही निर्माण करू शकता.

तुम्ही जर तुमचे स्किल्स वाढवून परदेशातुन काम मिळवू शकत असाल, तर तुम्ही डॉलरच्या रुपात उत्पन्न मिळवू शकाल.

हे काही शक्य नाही म्हणून पुढचा लेख वाचणे सोडू नका, कारण थोड्या प्रयत्नात हे शक्य आहे बरंका!!

फक्त हे करताना तुमच्या नियोक्त्यांचे (म्हणजे तुम्ही काम करता त्या कम्पनीचे) साईड बिजनेस च्या बाबतीतले नियम माहीत करून घ्या.

बऱ्याच कम्पन्यांमध्ये साईड बिजनेस करता येणार नाही असे नियम असतात.

शिवाय टॅक्स च्या बाबतीतही हा विचार आधी करणं गरजेचं आहे.

पण मित्रांनो इच्छा असेल तर मार्ग हा दिसतोच, बरोबर ना!

चला तर मग असे कोणते साईड बिजनेस करता येतील ते आता बघू.

१) सोशल मीडिया मॅनेजर:

हल्ली सगळेच सोशल मीडियाचा वापर करतात. तिथे म्हणजेच इन्स्टाग्राम, फेसबुक, लिन्कड इन, ट्विटरवर जर तुम्हाला भरपूर फॉलोअर्स असतील तर इन्फ्लुएन्सर म्हणून तुम्ही काम मिळवू शकता.

यावर आपल्याला प्रश्न पडेल की आपण कुठे सेलिब्रिटी आहोत की कम्पन्या इन्फ्लुएन्सर म्हणून आपली निवड का करतील?

पण मित्रांनो आणि मैत्रीणींनो ही सुरुवात तुम्ही अगदी छोट्या लेव्हल वरून सुद्धा करू शकता.

जसं, तुमच्यामध्ये जर चांगले वक्तृत्व गुण असतील तर तुमच्या भागातल्या हॉटेल रेस्टॉरंट साठी तुम्ही काम करू शकता.

याशिवाय साड्यांची दुकानं, फॅशन, कॉस्मेटिक, लाइफस्टाइल, फूड ब्रॅण्ड यांची कामे सुद्धा तुम्ही मिळवू शकता.

जर तुमचे इन्स्टाग्रामवर २०००० फॉलोअर्सवर असतील तर एखादा ब्रँड तुम्हाला एका पोस्ट चे रु. ५०००००/- सुद्धा देऊ शकतो.

ब्रँड नसून छोट्या दुकानांचे काम मिळाले तर त्यानुसार मागणी तुम्ही करू शकता.

२) ऑनलाइन ट्युशन:

यामध्ये स्काईप, झूम, गुगल मिट या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन ट्युशन घेऊ शकता.

अमेरिका, ब्रिटन पासून श्रीलंका किंवा अगदी आपल्या देशात सुद्धा हे काम तुम्हाला मिळू शकते.

खरे वाटत नसेल तर खाली दिलेला फोटो बघा.

ऑनलाइन ट्युशन

तुम्ही शिक्षक असाल किंवा शिक्षक नसलात तरी, विषय शिकवण्यात जर तुमची पकड असेल तर हे काम तुम्ही घेऊ शकता.

बरेच उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी सुद्धा आपल्या शिक्षणाबरोबर हे काम मिळवू शकतात. एवढंच नाही तर मिळवतात सुद्धा

इंटरनेटवर या प्रकारची कामे तुम्हाला मिळू शकता. किंवा Fiverr या वेबसाईटवर सुध्दा तुम्हाला कामे मिळवता येऊ शकतील.

आधीपासून ठरल्या प्रमाणे आठवड्यात 8 ते 12 तास किंवा त्यापेक्षा कमी किंवा जास्त वेळ या कामासाठी तुम्ही देऊ शकता.

यासाठी तासाला ५०० ते ७०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त ही तुम्ही मिळवू शकता.

विदेशी विद्यार्थी तासाला १० डॉलर अशी किंवा त्याही पेक्षा जास्त रक्कम देऊ शकतात.

अशा ट्युशनची गणित, फिजिक्स, कम्प्युटर सायन्स या विषयांसाठी जास्त मागणी आहे.

३) व्हिजिटिंग फॅकल्टी/गेस्ट लेक्चरर:

जर तुम्ही एखाद्या विषयातले एक्सपर्ट असाल तर हे काम तुम्ही घेऊ शकता.

मॅनेजमेंट, इंजिनिअरिंगच्या संस्थांमध्ये गेस्ट लेक्चरर चे काम तुम्ही मिळवू शकता.

यामध्ये संस्थेच्या नियमानुसार प्रत्येक लेक्चरसाठी ७०० ते १५०० रुपये मानधन तुम्हाला मिळू शकते.

४) कंटेंट रायटिंग:

जर तुम्हाला चांगले लिखाण करता येत असेल, लिखाणात आणि विषय चांगला समजावून सांगण्यात जर तुमची पकड असेल तर हे काम तुम्ही चांगले करू शकता.

वेगवेगळ्या वेबसाईट किंवा कम्पन्या तुमचे ग्राहक असू शकता.

यामध्ये तुमची लिखाणातली पकड किती आहे? उत्तम लिखाण तुम्ही वेळेवर देऊ शकता का? यानुसार तुम्ही उत्पन्न मिळवू शकता.

मित्रांनो, उत्पन्नाचे स्रोत वाढवणारे हे चार उपाय नक्कीच तुम्हाला या महागाईच्या काळात तुमची आर्थिक घडी नीट बसवायला मदत करतील.

इतर सर्व व्यवसायांप्रमाणेच यातही तुम्ही आपल्या ग्राहकांना किती चांगले काम देऊ शकता, यावर तुमची आणि तुमच्या कामाची पुढची प्रगती अवलंबून आहे.

कारण शेवटी कुठलेही काम सुरू केले तरी ते योग्य सेवा देऊन टिकवणे हे शेवटी तुम्हालाच करावे लागेल.

ही माहिती आपल्या मित्र परिवाराला उपयुक्त ठरेल असे वाटत असल्यास शेअर करण्याच्या पर्यायातून लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “उत्पन्न वाढवण्यासाठी हे चार साईड बिजनेस तुम्ही सुद्धा करू शकता”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय