लॉकडाऊनच्या काळात खर्च कमी करण्यासाठी ६ टिप्स

लेखात सांगितलेल्या या अगदी सोप्या सवयी जर तुम्ही लावून घेतल्यात तर तुम्हाला आपल्या जवळचा पैसा वाचवून वाढवायचा कसा? ते जमेल.

आणि आपली आर्थिक स्थिती बदलणे शक्य होईल. कारण नीट नियोजन करून पैसा वाचवणं हे पैसा कमवण्या इतकेच महत्त्वाचे आहे.

‘सवयी’ मग त्या चांगल्या असो वा वाईट आपल्या जीवनाला वळण देत असतात..

ज्या दिशेने आपण वाटचाल करतो ती करताना आपण अपयशी ठरतो कि भरभरून यश संपादन करतो. त्यावरून आपल्या सवयींचे मूल्यमापन आपण करू शकतो.

चांगल्या सवयी आपल्याला कायम एका उंचीवर नेऊन ठेवत असतात आणि वाईट सवयी आपल्याला खड्ड्यात घालायला तत्पर असतात. हा धडा आपण आयुष्यभर शिकत असतो.

लहानपणापासून आपल्याला ‘सवयी’ लावण्याचे काम आपले आई-वडील, शिक्षक, इतर मोठी माणसे करत असतात.

पण आयुष्याच्या एक वळणानंतर स्वतःला योग्य मार्गदर्शन करणे हे आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचे काम असते.

पैशांचेही असंच आहे. म्हणाले तर आपली कडकी असते नाही तर आपण श्रीमंतही असतो.

आपल्या पैश्यांच्या नियोजनामध्ये काय कमी पडतंय ते पाहणे महत्वाचे. पैसा कमवाल तितका लागतो आणि कमीही पडतो.

सध्या तर शंभरी पार करणारे पेट्रोल असो, नाहीतर सिलेंडरचे गगनाला भिडत जाणारे भाव असो… सांगा कसं जगायचं? हा प्रश्न सामान्य माणसाला नाही पडला तर नवलंच!!

पण काही सोप्प्या युक्त्या वापरल्या तर आपण भरपूर पैसा खर्च होण्यापासून वाचवू शकतो आणि त्याची सवय लावून घेऊ शकतो.

गृहिणींना तर घर खर्चातून काहीच उरत नाही ह्याची खंत कायम असते. त्यांनाही आम्ही शोधलेल्या टिप्स नक्कीच फायदेशीर ठरतील.

चला तर मग बघूया आपला पैसे काही मार्गाने खर्च होत असताना त्याला आळा घालण्यासाठी आपण ह्यातले काय काय केले आहे आणि अजून काय सवयी लावून घेऊ शकतो.

१. एक बजेट ठरवा: मोठमोठे देशाचे सरकार सुद्धा देशाचे बजेट ठरवते आणि त्या अनुषंगाने आपले काम पूर्ण करायचा प्रयत्न करते.

एवढेच काय तर मोठ्या कंपन्या सुद्धा आपापले बजेट बनवुनच आपले काम सांभाळतात. आपणही हे करू शकतो त्यासाठी आपण फार मोठे अर्थशास्त्री नसलो तरी दर महिन्याला कुठे पैसे वाचवता येतील हे आपण शोधून काढू शकतो.

दर वेळी आपण कुठे आणि किती पैसे उडवतो ह्याची नोंद आपल्याला करावी लागेल. साधारण महिन्याच्या खर्चाचा अंदाज काढून त्याचे बजेट ठरविण्यास सुरुवात करा. अमुक इतकेच पैसे दर महिन्याला खर्च करण्याचे ठरवा.

ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःच्या आयुष्याला एक पठडीत डांबून ठेवा. पण असे बजेट बनवल्याने तुमचे विनाकारण उडणारे पैसे तुमच्याकडे साठत जातील.

दर महिन्याला वाढतही जातील. आणि त्या साठलेल्या पैशातील काही भाग तुम्हाला तुमचे एखादे स्वप्न पूर्ण करताना कामी येईल.

क्रेडिट कार्डाचा वापर सुद्धा दमाने करा. कारण हेच काहींच्या दिवाळखोरीचे मुख्य कारण ठरले आहे.

हे करताना तुमचा पैसे फुकट वाया जाणारा ‘रस्ता’ तुम्हाला कळेल आणि त्याला बंदी घालता येईल. शेवटी सगळ्यांचंच स्वप्न असते की म्हातारपणासाठी काही पैसा गाठीला असला पाहिजे. मग ही बजेट बनवण्याची सवय तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल.

२. तुमच्या फायनान्शियल गोष्टी/नेटवर्क सोप्पे ठेवा: कित्येक स्कीम्स मुळे आपण ढीगभर क्रेडिट कार्ड्स घेतो, बँक अकौंटस सुरू करतो.

आरडी, फिक्स्ड डिपॉझिट वेगवेगळ्या संस्थेत चालू करतो. दर महिन्याला आपला स्वतःचाच खूप गोधळ उडतो.

त्यापेक्षा गरज नसलेली क्रेडीट कार्ड बंद करा त्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल.

बँकेची ढीगभर खाती बंद करा. आपलाच अडकलेला पैसा आपल्या कमी येईल. डेबिट कार्डची फी वाचेल.

आरडी, एफडी चा आढावा घेत चला. ह्यामुळे तुमचे फायनान्स नेटवर्क सोप्पे राहील.

३. सगळे ऑटोमेट करा: लाईट बिल, क्रेडिट कार्ड बिल, काही पोस्टपेड बिल्स ह्या गोष्टी शक्यतो ऑटोमेट करा.

कारण ही बिल्स वेळेत न भरली गेल्यास तुम्हाला दंड भरावा लागतो. आणि ह्या दंडा पायी तुमच्या कष्टाचा किती पैसा विनाकारण वाया जातो हे तुमच्या लक्षातही येत नाही.

मात्र ह्या गोष्टी ऑटोमेट केल्यास म्हणजे बँक खात्यातून वेळच्या वेळी भरले जाण्याचे ऑप्शन स्वीकारल्यास तुमचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो.

४. क्रेडिट कार्ड हुशारीने वापरा: क्रेडिट कार्ड वापरले म्हणजे आपण खड्यात जाणार. ह्या भीतीने कित्येक जण क्रेडीट कार्ड वापरतच नाहीत.

जर तुम्ही क्रेडिट कार्डाशिवाय आपले काम मॅनेज करू शकत असाल तर तुम्हाला साष्टांग नमस्कार.

पण हल्लीचे युग हे कॅशलेस युग आहे. आणि क्रेडिट कार्डचा वापर योग्य रीतीने करणारा माणूस सध्याच्या युगात हुशार ठरतो ह्याची तुम्ही खात्री ठेवा.

नकद पैसे वापरताना आपण भरपूर गोष्टींना मुकतो, जसे की कॅश बॅक, रिवार्ड पॉईंट्स, ऑफर्स वगैरे.

क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागू होतात.

जरी ह्या कार्डसाठी वार्षिक फी आपल्याकडून घेतली जात असेल किंवा क्रेडिट च्या बदल्यात आपल्याकडून व्याज घेतले जात असेल तरीही ह्याच्या वापराने मिळणारी कॅश बॅक, रिवार्ड कोईन्स आणि ऑफर्स ह्या मुळे आपण ती फी ची रक्कम रिकव्हर करू शकतो.

माझा याबाबतचा एक मस्त अनुभव सांगायचा तर ६५ हजारांचा लॉपटॉप क्रेडिट कार्ड, बँक आणि शोरूम अशा सर्व स्कीमचा वापर करून तो मी ५१ हजारात खरेदी केला आणि मुख्य म्हणजे खरेदी करते वेळी फक्त ६ हजार रुपये पाकिटातून काढले. अर्थात हि खरेदी दिवाळीच्या वेळी केली होती.

तर सांगायचं तात्पर्य एवढंच कि क्रेडिट कार्डचा वापर नीट केला तर चांगला फायदा पदरात पडून घेता येतो हे मात्र नक्की.

म्हणूनच ही कार्ड्स स्मार्टली वापरण्याची सवय चांगली आहे..!!

५. थोडी इन्व्हेस्टमेंट करा: शेअर मार्केट, म्युच्युअल फँड अशा शब्दांनीही कित्येकांना फेफरं भरतं..

कारणही तसेच आहे. सतत बाजार पडला, रुपया पडला, मंदी आली, कंपन्यांना टाळे लागले, कर्मचारी कपात होणार असे घाबरवून सोडणारे वाक्प्रचार आपण ऐकत राहतो आणि मग अशा कुठल्याही बेभरवशाच्या गोष्टीत पैसे गुंतवण्यापासून मागे हटतो..

हे जरी बे भरवशाचे मार्ग असले तरी बाजार सतत पडत नाही. तो सुधारला की आपला पैसा वधारला हे समजून घ्या. कुठे, कशी आणि किती गुंतवणूक करायची ह्याचे शास्त्र शिकून घ्या.

शेअर मार्केट, म्युच्युअल फन्ड्स हे लॉंग टर्म साठी वापरल्यास नक्कीच लाभ मिळतो असे अनुभवी लोकांचे परीक्षण आहे..

इथे अभ्यासपूर्वक पैसा गुंतवणे आणि योग्य त्या वेळी संयम राखणे हे महत्त्वाचे.

६. आपल्या जोडीदारासोबत खुलेपणाने पैशांबद्दल संवाद साधा: जोडीदारापासून आपल्या फायनान्शिअल गोष्टी लपवणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे.

कारण दोघेही पैसे कमावणारे असले किंवा एकच जण पैसे कामावणारा असला तरी घर, संसार चालवणे, म्हातारपणाची सोय करणे, मुलांचे शिक्षण आणि इतर खर्च ह्याची जबाबदारी दोघांवर असते.

त्यामुळे दोघांकडे किती पैसे आहेत, किती वाढले, किती खर्च झाले ह्या बाबत बोलणे योग्य ठरते.

त्याचबरोबर कुठे गुंतवणूक करावी, कोणत्या पद्धतीने पैसे खर्च करावे ह्या बाबतीत दोघात वारंवार चर्चा करणे अत्यंत गरजेचे असते.

एकमेकांच्या साहाय्याने कुठे पैसे वाचवता येतील आणि ते अजून कसे वाढवता येतील ह्याचा आढावा घ्या आणि त्या दिशेने पाऊल उचला.

ज्यांना ही सवय नसते ते कायम एकमेकांवर पैसे उडवल्याचा आरोप करतंच आयुष्य घालवतात आणि आयुष्यात काहीच मिळवत नाहीत.

त्यामुळे जोडीदार आणि फायनान्शिअल डिस्कशन हे अगदी गरजेचे आहे. ही सवय लावूनच घ्या..

ह्या काही सोप्प्या सवयी आपली आर्थिक स्थिती नक्कीच बदलून टाकतील. आणि आपली आर्थिक स्थिती हि आपल्या आनंदाच्या मार्गातला एक टप्पा आहे.

तिनका तिनका जोडल्यास आपण खूप मोठा पर्वत उभा करू शकतो. त्यासाठी हे छोटे छोटे उपाय नक्कीच कामी येतील.

मग वाट न बघता ह्या सवयी अंगिकारायच्या मागे लागा.. आणि तिजोरीतली छन छन वाढताना पहा..

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय