आयुर्वेदाचे हे ५ नियम पाळले तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही

आजकाल धकाधकीच्या जीवनात लोक शारीरिक आणि मानसिकदृष्टया कमकुवत होत आहेत. याला बरीच करणे आहेत त्यामध्ये आपली जीवनशैली, वातावरणातले प्रदूषण, कामाचा ताण हि प्रमुख करणं म्हणता येतील.

जीवन सुखी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये प्राथमिक स्थरावर व्यायाम आणि सकस आहाराचा उल्लेख केला जातो.

पण ह्या प्राथमिक स्थराशिवाय असे बरेच नियम आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत ज्याचे पालन केल्याने रोजचे आयुष्य सुखी होईल.

तर आपण आता जाणून घेऊयात अशा काही नियमांविषयी.

1) दात आणि जिभेची सफाई करणे: ‘जिव्हा प्रक्षालन’ म्हणजे जीभ साफ करणे हा बर्‍याच काळापासून शिफारस केलेल्या आयुर्वेदिक दैनंदिन नियमांचा एक महत्त्वाचा भाग आहे.

याने अमा (जिभेवरील पंधरा थर) काढून टाकण्याबरोबरच, जीभ स्क्रॅपिंगमुळे सकाळचा तोंडातील घाण वासहि दूर होईल. रात्री झोपताना तुमची पचन क्रिया सक्रिय असते, अन्न पचन होते.

जर तुम्ही जास्त अरबट चरबट खाल्लेले असेल किंवा तुमचे अपचन झाले असेल तर तुमच्या जिभेवर अमा जमा होतो.

मित्रांनो, तुमची जीभ म्हणजे तुम्ही खाल्लेले अन्न तुम्हाला नीट पचले आहे का? तुमची प्रकृती नीट आहे का? हे सांगणारे मानक म्हणजे ‘युनिट’ आहे.

जेव्हा आपले पाचन मजबूत असते आणि आपण योग्य रित्त्या खात असता तेव्हा आपण सकाळी उठून पहाल एक निरोगी दिसणारी, लाल रंगाची जीभ आणि त्यावर अगदी थोडीशी अमा….

सकाळी सर्वात आधी आपली जीभ साफ केल्याने अमा (अशुद्धी) दूर होते, ज्यामुळे आपले तोंड ताजे आणि स्वच्छ होते.

आयुर्वेदाच्या प्रथम नियमांमध्ये दात आणि जीभ साफ करणे समाविष्ट आहे.

वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे रोज दात आणि जीभ साफ केल्याने विषाणू दूर होतात.

टंग क्लिनर ने जीभ साफ केल्याने जिभेवरचा जाड थर निघून जाईल आणि त्या थरामुळे होणारे नुकसान टाळता येईल.

दिवसातून ८-१० वेळा हि कृती केल्याने तुमचे दात आणि जिभेचं आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

दात घासण्यासाठी नरम टूथब्रशचा वापर करावा जेणे करून जीभ आणि हिरड्यांना त्रास होणार नाही.

टूथपेस्टमध्ये कडुनिंबाचा समावेश असावा जे आतील
तोंडाला अँटीफंगल, अँटीबॅक्टरील आणि अँटीवायरल करण्यास मदत करतो.

2) रोज कोमट पाणी आणि आल्याचा चहा घ्यावा:आजकालचे धकाधकीचे जगणे हे सर्वांच्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनले आहे.

आपण कितीही प्रयत्न केले तरीही प्रदूषण, रसायनांचा मारा झालेले त्रासदायक अन्न आणि आपली स्वतःची अव्यवस्थित आणि व्यस्त जीवनशैली यातून सुटका होत नाही.

या सगळ्यामुळे संक्रामक व्याधी, म्हणजे व्हायरल इन्फेक्शन होऊन प्रतिकार शक्तिही कमी असल्यास आजाराचा विळखा बसायला वेळ लागत नाही.

आयुर्वेदानुसार कोमट पाण्यामध्ये सूक्ष्मतेचे गुणधर्म आहेत जे शरीरात खोलवर प्रवेश करतात आणि शरीराच्या सूक्ष्म जलवाहिन्या
शुद्ध करतात. कोमट पाणी पिण्याचे इतर काही फायदे येथे आहेत.

सहसा लोक सकाळी उठल्यावर थंड पाणी पितात परंतु रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचन सुरळीत होते आणि रोगप्रतीकाकारक शक्ती वाढते आणि आल्याचा चहा घेतल्याने पोट भरलेले राहते. पोटात गॅस चा त्रास कमी करण्यास मदत होते.

3) शांततेने जेवण करा: बरेचदा लोक जेवण करताना बोलतात. पण तुम्हाला माहित आहे का, शांतपणे जेवल्याने तुम्हाला जेवणाचा आस्वाद घेता येतो आणि सतत जेवणाची इच्छा निर्माण होत नाही.

४) तेलाने मालिश करणे: अभयंगस्नान केल्याने त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते. यामुळे शरीराला पोषण मिळून रक्तप्रवाह चांगला होतो. त्वचा चमकदार आणि चिरतरुण राहायला मदत होते.

५) मोठ्याने हसा: मोठ्याने हसण्याचे बरेच फायदे आहेत. जेव्हा आपण हसता तेव्हा केवळ आपला मानसिक ताणच हलका होता नाही, तर मोठ्याने हसल्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे संचरण वाढते.

तुमचे हृदय, फुफ्फुस आणि स्नायू उत्तेजित होतात आणि तुमच्या मेंदूतून एन्डोरफीन हार्मोन रिलीज होतात. मोठ्याने हसल्यामुळे रक्ताभिसरण आणि स्नायूंना विश्रांती मिळते, यामुळे ताणतणावाची काही शारीरिक लक्षणे कमी होण्यास मदत होते. मोकळं हसण्यासाठी कोमिडी फिल्म बघा, जोक्स ऐका

आयुष्य जगण्याची प्रत्येकाची आपली वेगवेगळी तऱ्हा असते, पण आयुर्वेदात सांगितलेले हे काही नियम जगणं साधं, सुंदर आणि निरोगी करायला नक्की मदत करतील, पटतंय ना!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय