दमा – कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

दम्यावर आयुर्वेदिक उपचार

दमा हा आजार फुफ्फुसांशी निगडीत आहे.

ह्यामध्ये व्यक्तीची फुफ्फुसे कमजोर होऊन त्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो.

हा आजार श्वासनलिका ते फुफ्फुसे ह्या अवयवांवर प्रभाव पडतो.

दमा ह्या आजारात श्वास नलिकांना सूज येते आणि श्वसन मार्ग आकुंचन पावतो.

ह्याच श्वसन मार्गातून (ब्रॉनकायल ट्यूब) श्वास घेतला जात असतो.

त्याला सूज येऊन तो आकुंचन पावला की व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होतो.

दमा अस्थमा – कारणे लक्षणे आणि घरगुती उपाय

जेव्हा ही सूज खूप वाढते तेव्हा श्वासनलिका खूपच आकुंचन पावून श्वासाच्या त्रासाबरोबरच खोकला, घसा खवखवणे आणि छातीवर दडपण आल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसून येतात.

खोकल्यामुळे खूप मोठ्या ह्या रोगावर वरवरचे उपाय करून चालत नाही तर हा आजार समूळ नष्ट करण्यासाठी उपचार करावे लागतात.

नाहीतर तेवढ्यापुरते बरे वाटून पुन्हापुन्हा हा आजार उद्भवतो.

चला तर मग दमा समूळ बरा करण्यासाठी काय काय घरगुती उपाय करता येतात ते पाहूया.

त्याआधी पाहूया दमा म्हणजे नक्की काय आणि त्याचे प्रकार कोणते

आयुर्वेदात दम्याला तमक श्वास असे म्हटले आहे.

दमा वात आणि कफ प्रवृत्ती वाढली की होतो.

ह्यामध्ये श्वासनलिका आकुंचन पावून श्वास घेण्यास त्रास होणे तसेच श्वासाचा आवाज होणे आणि छातीवर दडपण येणे असे त्रास होतात.

प्रमाणात कफ होतो पण तो कफ पडून जाणे कठीण होऊन बसते.

२) सिजनल अस्थमा (Seasonal Asthma)

३) एलर्जिक अस्थमा (Allergic Asthma)

४) नॉन एलर्जिक अस्थमा (Non Allergic Asthma)

५) अकुपेशनल अस्थमा (Occupational Asthma)

दम्याची लक्षणे

श्वास घेताना त्रास होणे हे दम्याचे प्रमुख लक्षण आहे.

ह्याशिवाय खाली आणखी काही लक्षणे दिली आहेत जी जाणून घेऊन आपण त्यावर घरगुती उपायांनी मात करू शकतो.

१) वारंवार खोकला येणे

२) श्वास घेताना आवाज येणे

३) छातीवर दडपण येणे

४) दम लागणे

५) कफ होणे व तो मोकळा न होणे

६) घसा कोरडा पडणे

७) बेचैन वाटणे

दम्यावरील घरगुती उपाय

दम्याचा त्रास असणाऱ्या व्यक्तीने खालील गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे.

१) हिवाळा आणि पावसाळा ह्या ऋतूंमध्ये विशेष काळजी घेणे.

२) धुळीपासून स्वत:चे रक्षण करणे

३) घराबाहेर जाताना मास्क वापरणे

४) नवीन रंग, उदबत्ती, किटकनाशके ह्यांच्या वासापासून स्वतःला दूर ठेवणे

५) हिवाळ्यात धुक्यापासून स्वतःचे संरक्षण करणे

६) धूम्रपान करणाऱ्या व्यक्ति पासून दूर राहणे

आहारात खालील गोष्टींचा नक्की समावेश करा

१) गहू

२) जूने तांदूळ

३) अख्खे मूग व मुगाची डाळ

४) कुळीथ

५) जवस

६) हिरव्या पालेभाज्या

७) लसूण,आलं, काळीमिरी आणि हळद

८) मध

पालक आणि गाजराचा रस दम्याच्या रुग्णांना फार उपयोगी आहे.

तसेच कोमट पाण्याचे सेवन करणे आणि ढास लागत असल्यास मध घेणे गुणकारी ठरते.

दम्याच्या रुग्णांनी काही पथ्ये पाळणे देखील आवश्यक आहे.

आहारात मासे मुळीच घेऊ नका. तसेच शिळे अन्न आणि तळलेले पदार्थ टाळा .

गोड पदार्थ, दही टाळा तसेच फार गार पाणी पिऊ नका.

कोल्ड ड्रिंक्स, थंड पाणी तसेच इतर थंड पदार्थ आहारात घेऊ नका.

अंडी, मास व मासे यांचे कमीतकमी सेवन करा.

नियमित पणे प्राणायाम व सूर्यनमस्कार करण्याचा दम्याच्या रुग्णांना खूप उपयोग होतो.

तसेच योगासने करण्याचा ही खूप फायदा होतो. पण फार थकवणारे दम लागेल असे व्यायामप्रकार करू नयेत.

आता आपण दम्यावर गुणकारी असणारे आणि घरात सहज उपलब्ध असणारे पदार्थ पाहूया.

लसूण- 30 मिलि दुधात लसणाच्या 5 पाकळ्या घालून उकळून त्या दुधाचे रोज सेवन करणे अत्यंत गुणकारी आहे.

ह्या मुळे दमा समूळ नष्ट होण्यास मदत होते.

सुकं अंजीर- रात्री गरम पाण्यात भिजवून ठेवलेली सुकी अंजिरे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ली की छातीत साठलेला कफ सुटून मोकळा होऊन पडून जाण्यास मदत होते.

ओवा – ओवा घालून उकळलेल्या गरम पाण्याची वाफ घेणे अत्यंत गुणकारी आहे.

ह्यामुळे दमा कमी होण्यास मदत होते.

मेथी दाणे- चमचाभर मेथी दाणे ग्लासभर पाण्यात उकळून त्यात मध आणि आल्याचा रस घालून सकाळ संध्याकाळ सेवन करण्याने खूप फायदा होतो.

आलं- आलं हे दम्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आलं घातलेला चहा पिण्याने तरतरी तर येतेच शिवाय खोकला कमी होतो.

कारलं- एक चमचा कारल्याची पेस्ट मध आणि तुळशीच्या रसात मिसळून घ्यावी. ह्याचा खोकला व कफासाठी उपयोग होतो.

मोहरीचे तेल- मोहरीच्या तेलात कापूर मिसळून छाती व पाठीच्या कण्याला मालीश करण्याचा खूप उपयोग होतो.

कांदा – कच्चा कांदा खाल्ल्यामुळे दमा कमी होण्यास मदत होते. कांद्यातील सल्फर मुळे तो उपयुक्त ठरतो.

विटामीन सी- विटामीन सी युक्त आहार हा दम्याच्या रुग्णांना उपयोगी आहे. लिंबू, संत्रे, द्राक्षे ह्यांचे नियमित सेवन करावे.

हळद घातलेले दूध तर खोकला, ढास, दम ह्या सगळ्यावर अत्यंत गुणकारी आहे.

मध – नियमित स्वरूपात मधाचे सेवन करणे उपयोगी ठरू शकते.

आयुर्वेदात दम्यावर काही अत्यंत प्रभावी औषधे आहेत. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत

1) कण्टकारी अवलेह

2) वासावलेह

3) सितोपलादि चूर्ण

4) कनकासव

5) अगस्त्यहरीतकी अवलेह

6) च्यवनप्राश

हे झाले दम्यावरील घरगुती उपाय. पण कोणताही आजार जर घरगुती उपायांनी बरा होत नसेल तर लवकरात लवकर तज्ञ वैद्य किंवा डॉक्टर यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे जर वरील लक्षणे पाच दिवसांपेक्षा अधिक काळ जाणवत असतील तसेच घरगुती उपायांनी कमी होत नसतील तर ताबडतोब तज्ञांचा सल्ला घ्या. आणि दमा संपूर्णपणे बरा होईल अशी उपाययोजना करा.

स्वस्थ रहा आनंदी रहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!