एकटेपणा मध्ये आनंदी राहणाऱ्या लोकांचे १२ अद्वितीय गुण

बदलत्या काळानुसार आपले सर्वांचे राहणीमान बदलत चालले आहे.

राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी, कपड्यांची फॅशन, मनोरंजनाची साधने हे सर्व बदलत चालले आहे.

त्याचप्रमाणे हल्लीच्या काळात पूर्वीप्रमाणे कुटुंब व्यवस्था न राहता एकटे राहणाऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे.

बरेच लोक नोकरी इत्यादीच्या निमित्ताने नाईलाजाने एकटे राहताना दिसतात पण काही लोक मात्र स्वखुशीने एकटेपणा स्वीकारून एकटे राहताना दिसतात.

कुटुंबात राहणे सहज शक्य असूनही ते खुशीने एकटे राहणे पसंत करतात. एकटे राहणे खरं तर सोपं नाही पण काही लोक ते सहज साध्य करू शकतात.

आज आपण जाणून घेऊया अशा आनंदाने एकट्या राहणाऱ्या लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये

1) एकटे राहू शकणाऱ्या लोकांमध्ये खूप आत्मविश्वास असतो, आयुष्या कडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन असतो.

2) असे लोक अत्यंत स्वाभिमानी, स्वावलंबी असे असतात, कोणतेही काम ते कोणाच्याही मदतीशिवाय लीलया पार पाडू शकतात.

3) अश्या लोकाना मित्रांची फारशी गरज भासत नाही, ते स्वतःच स्वतःचे चांगले मित्र असतात.

4) आनंदाने एकटे राहणारे लोक जग काय म्हणेल ह्याचा फारसा विचार करत नाहीत, ते स्वतःला योग्य वाटेल ते करतात. तसेच राहतात. आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेतात.

5) आपल्या हातून झालेल्या लहान मोठ्या चुकांचा फारसा बाऊ न करता ते या चुकांमधून शिकतात आणि स्वतः मध्ये सुधारणा करतात. त्यामुळे ते संवेदनशील असले तरी स्वभावाने खंबीर देखील असतात. स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतात.

6) असे लोक स्वतःकरता जगण्याचे काही नियम घालून घेतात व त्या नियमांचे कसोशीने पालन करतात.

7) कितीही आधुनिक विचारसरणी असली तरी असे लोक आपली नैतिक मूल्ये जपतात, प्रामाणिक पणे राहतात. स्वयंशिस्तीचे कठोर पालन करतात.

8) आर्थिक बाबींमध्ये असे लोक अर्थातच स्वयंपूर्ण असतात, ते ह्या बाबतीत कोणावरही अवलंबून न राहता कार्यरत असतात.

9) भावनिक दृष्ट्या कोणावरही अवलंबून असणे एकट्या राहणाऱ्या लोकांना आवडत नाही. ते भावनाप्रधान असले तरी कमकुवत मनाचे नसतात तर खंबीर राहून स्वतःची काळजी घेऊ शकतात.

10) एकटे राहणारे लोक अर्थातच स्पष्टवक्ते असतात, एकदा एखाद्या कामाची जबाबदारी घेतली की ते काम ते संपूर्णपणे पार पाडतात. काम अर्धवट सोडून जबाबदारी झटकणे ह्यांना मंजूर नसते.

11) जे काम आपल्याला जमणार नाही असे त्यांना वाटते ते काम हाती घेण्यास ते स्पष्ट नकार देतात. त्याकरता प्रसंगी वाईटपणा देखील स्वीकारतात. परंतु आपल्या तत्वाशी प्रतारणा करत नाहीत.

12) केवळ दुसऱ्याला खुश करण्याकरता ते कोणतीही गोष्ट करत नाहीत. स्वतःला पटेल, योग्य वाटेल तेच करतात. त्याप्रमाणेच वागतात. नेहेमी आनंदी राहतात.

तर अश्याप्रकारे कुणीही न लादता स्वखुशीने स्वीकारलेला एकटेपणा एंजॉय करत जे लोक राहतात त्यांना सलाम.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय