कोडं आयुष्याचं सोडवूनच बघ!!

जन्माला आलाच आहेस,
तर थोडं जगुन बघ,
असलचं कोणतं दुःख तर,
त्याकडेही एकदा हसुन बघ,
चिमुटभर दुःखाने कोसळु नकोस,
जुनी खरकटी विसळु नकोस,
यशाची चव निरखुन बघ,
आलचं अपयश तर पचवुन बघ,
सोपचं असतं, घरटं बांधणं,
थोडी मेहनत करुनच बघ,
मांडलाच एकदा डाव, तर,
आता आनंदाने खेळुन बघ,
आयुष्याचं हे कोडं,
एकदा एवढं सोडवुनच बघ…….!
वाचण्यासारखे आणखी काही…..
आकर्षणाचा सिद्धांत साध्य करणारा व्हिजनबोर्डलॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मी!…
मानवी जीवनाचा कल्पतरु – जीवनातला आकर्षणाचा नियम
आकर्षणाचा सिद्धांत

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा