जाणून घ्या टाचदुखीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

जाणून घ्या टाचदुखीची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपाय

हल्ली च्या काळात काही दुखणी अगदी सर्रास आढळून येतात, टाचदुखी हे त्यातीलच एक दुखणे.

टाचा दुखणे आजकाल अगदी कॉमन झाले आहे. आपल्या आसपास कोणी ना कोणी ह्या समस्येने ग्रासलेले असतेच.

टाचा दुखतात म्हणजे टाचेचा खालचा भाग, कडा किंवा पाठीमागचा घोट्याजवळचा भाग दुखतो, तिथे वेदना होतात.

टाचा दुखण्याची अनेक कारणे आहेत, पण अगदी कॉमन कारण आहे ते म्हणजे आरामदायक चप्पल किंवा बूट न वापरणे.

तसेच संधिवात, इन्फेक्शन किंवा एखादी दुखापत झाली तरी ही टाचा दुखू शकतात.

टाच हा आपल्या शरीराचा असा महत्वाचा अवयव आहे ज्यावर आपण चालत असताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार तोलला जातो.

त्यामुळे जर टाचेत वेदना होत असतील तर काही पावले चालणे देखील मुश्किल होऊन जाते.

टाचदुखीची कारणे 
१. प्लांटर फसायटीस (plantar fasciitis)

प्लांटर फसायटीस हा टाचदुखीचा एक कॉमन प्रकार आहे.

प्लांटर फॅसिया नावाचा एक जाड टिशू पायाच्या तळव्यात असतो.

हा एका बाणासारखा असतो आणि तळव्याच्या गोल भागाला आधार देतो.

त्याला सूज येऊन वेदना होतात, ह्या आजारास प्लांटर फसायटीस असे म्हणतात.

सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल टेकवून उभं राहताना तीव्र वेदना होतात अशी ह्या आजारात प्रमुख तक्रार असते.

शिवाय दिवसभर टाच दुखत राहते.

प्लांटर फसायटीस अनेक कारणांमुळे होऊ शकतो, त्यापैकी काही खालीलप्रमाणे 

अ) वय– ४० ते ६० वर्षे वयाच्या व्यक्तींना हा त्रास जाणवतो, वयामुळे हा त्रास उद्भवतो. परंतु योग्य व आरामदायक चप्पल अथवा बूट न वापरण्यामुळे हल्ली हे वय कमी होत चालले आहे.

ड) तळव्याची रचना– काही लोकांमध्ये जन्मतःच पायाचा तळवा सपाट असतो किंवा जास्त गोलाकार असतो. अश्या लोकांना प्लांटर फसायटीस हा आजार होऊ शकतो कारण त्यांच्या तळव्याच्या रचनेमुळे चालताना त्यांच्या टाचांवर भार येतो.

इ) विशिष्ट प्रकारचे व्यायाम– खूप जास्त अंतर पळणे किंवा aerobics वगैरे सारख्या व्यायाम प्रकारांमुळे देखील टाचेवर ताण येऊन प्लांटर फसायटीस हा आजार होऊ शकतो. त्यामुळे कोणतेही व्यायाम प्रकार करताना काळजी घ्यावी.

२. काल्कानीयल बोन लिजन्स (Calcaneal Bone Lesions) 

टाचेच्या हाडाला (heel bone) calcaneus असे म्हणतात. त्या हाडाला झालेल्या दुखापतीमुळे जसे की फ्रॅक्चर, तिथल्या हाडाची वाढ ह्यामुळे टाचेत तीव्र वेदना होऊ शकतात.

३. काल्कानीयल बरसिटीस ( Calcaneal Bursitis ) 

टाचेच्या मागच्या भागात एक फ्लूइड नी भरलेली पिशवी असते. तिला bursa असे म्हणतात.

Bursa ला जर सूज आली तर टाचेच्या मागच्या भागात तीव्र वेदना होतात. अयोग्य आकाराचे चप्पल, बूट घालण्यामुळे असा त्रास होऊ शकतो. तसेच थंडीत ह्या त्रासाची तीव्रता वाढते.

४. दुखरे fat pad 

टाचेच्या सर्वात खालच्या भागात एक fat pad म्हणजेच चरबीचे आवरण असते ज्यामुळे जमिनीवर टाच टेकवल्यावर होणाऱ्या आघातांची तीव्रता कमी होते. जर काही कारणामुळे ह्या आवरणास सूज आली तर टाचेत तीव्र वेदना होतात.

५. हील spur (टाचेच्या हाडाची वाढ) 

हाडांजवळ कॅल्शियम साठून टाचेच्या हाडाची वाढ होते त्यास heel spur असे म्हणतात. त्यामुळे देखील टाच दुखी होऊ शकते.

६. इतर कारणे 

संधिवात, गाऊट, स्नायूंना दुखापत होणे ह्या कारणांमुळे देखील टाच दुखू शकते.

टाच दुखीवर चे घरगुती उपाय 

१. काँट्रास्ट बाथ– दोन बादल्या घेऊन एकात पायाला सोसवेल इतपत गरम आणि दुसऱ्या बादलीत गार पाणी घ्यावे. आधी गरम पाण्यात ३ मिनिटे पाय बुडवून मग लगेच गार पाण्यात एक मिनिट पाय बुडवावा.

असे दिवसातून दोनदा १५ मिनिटे करावे. ह्यामुळे टाच दुखी कमी होते.

२. बॉल मसाज– टेनिसचा बॉल घेऊन तो पायाच्या तळव्याखाली ठेवावा. नंतर टाचेकडून अंगठयापर्यंत तो बॉल पायाखाली दाब देऊन फिरवावा. ह्यामुळे तळव्यास आराम मिळून टाच दुखी कमी होते.

३. बाटली फिरवणे– एक पाण्याने भरलेली बाटली तळव्याखाली ठेवून त्यावर टाचेपासून अंगठयापर्यंत तळवा फिरवला की दुखऱ्या भागाला मसाज होऊन आराम मिळतो.

४. गरम पाण्यात पाय बुडवणे– पायाला सोसवेल इतपत गरम पाण्यात मीठ घालून त्यात पाय बुडवून बसल्यामुळे पायाला चांगला शेक मिळतो व टाच दुखी कमी होते.

५. फुट मसाज– तळपायाला मसाज केल्यामुळे देखील वेदना कमी होतात. मसाजसाठीचे तेल वापरुन पायावर दाब देऊन हळूहळू मसाज केल्यामुळे आराम मिळतो. चवड्यांवर उभे राहून चालण्यामुळे देखील फरक पडतो.

६. योग्य पादत्राणे वापरणे– उंच टाचांचे बूट किंवा चप्पल न वापरता सपाट, आरामदाई बूट वापरण्यामुळे टाच दुखणे कमी होते. तसेच पादत्राणे योग्य मापाची असणे आवश्यक आहे, खूप घट्ट किंवा खूप सैल पादत्राणे वापरू नयेत.

टाच दुखीवरील औषधोपचार 

१. औषधे– टाच दुखीवर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे घेतली जाऊ शकतात.

२. आराम– तीव्र स्वरूपाची टाच दुखी असताना विश्रांती घेणे आवश्यक आहे. अश्या वेळी कोणतेही व्यायाम प्रकार किंवा पायावर ताण येईल असे काही करू नये.

३. आहार– कॅल्शियम युक्त आहार असणे हे पायांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. तसेच सर्व प्रकारची vitamins आणि minerals आहारातून मिळतील ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.

विटामीन ‘डी’ च्या कमतरतेमुळे हाडांशी संबंधित आजार होतात. त्यामुळे त्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

४. फिजिओथेरेपी– टाचदुखी वर तज्ञांच्या सल्ल्याने विशिष्ट प्रकारचे व्यायाम केले असता आराम मिळतो. ह्यामध्ये पायाचे stretching तसेच स्नायूंचे बळकटीकरण समाविष्ट आहे.

फिजिओथेरेपी मुळे सर्व प्रकारच्या वेदानांवर आराम मिळतो.

तर अशा प्रकारे आपण आज टाच दुखीचे प्रकार, त्याची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय जाणून घेतले. त्याचा जरूर लाभ घ्या आणि टाचदुखीपासून मुक्ती मिळवा.

स्वस्थ रहा आनंदी रहा.

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. eknath Kachare says:

    Very nice

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!