पेज थ्री कल्चर ……

अगदी लहानपणापासून आमचा असा समज आहे की, गॉगल ही वस्तु श्रीमंतासाठी आहे. किंवा ज्यांना चारचौघांत (चारचौघीत) आपली जरा जास्त छाप पाडायची आहे त्यांच्यासाठी असा काळा गॉगल असतो. गेल्याबाजार, यात्रेतून किंवा रस्त्याच्या कडेला लागलेल्या गाडीवरून असे गॉगल खरेदी करून ते मिरवणारे आपल्याला जागोजागी दिसायचे.
पुढे शिक्षणातून आम्हांला समजले की, आपल्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी खरोखरच अश्या गॉगलची गरज असते. तेव्हा दुसऱ्या कशासाठी नको पण यासाठी तरी एक गॉगल आपल्याकडे असावा अशी इच्छा अनेकांनी आपल्या मनी बाळगलेली असते. तर हे झाले सर्वसामान्य लोकांबद्दल, पण जे सिलिब्रेटी असतात ते या प्रकारात मोडत नाही.
त्यांचा जन्मच मुळी गॉगल घालून झाला असतो की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. आणि का नाही पडावा, ते गॉगल घालूनच जळी स्थळी आपल्याला नजरेस पडतात. अर्थात ते सिलिब्रेटी असल्याने बहुधा त्यांना आपले वेगळेपण (हिरोपणा) सिद्ध करायलाच हवा. असा आमचा समज होता, आहे. पण अंत्यविधिलाही हे सिलिब्रेटी काळा गॉगल घालून येतात तेव्हा मात्र आम्ही विचारात पडतो.
अशा प्रसंगातही काळया गॉगलची गरज यांना का लागावी? अंत्यविधी सारख्या प्रसंगातही यांना सिलिब्रेटी म्हणूनच मिरवायचे असते का? आपले भावनाशून्य डोळे दुसऱ्यांना दिसू नये म्हणून? सततच्या व्यसनामुळे डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं झाकण्यासाठी? सतत भावनाशून्य, व्यावहारिक जगात राहिल्याने रडू येत नसेल का? असे प्रश्न तर खूपच आहेत. उत्तर मात्र एखादा ‘सिलिब्रेटी’ च देऊ शकतो
वाचण्यासारखे आणखी काही…..
आमचा हरी
लग्न
वांग्याचं भरीत……… सांगा हं कसं झालं???

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा