स्वप्न बघायला कारण शोधा! म्हणजे ते पूर्ण होईल

काही वेळा अपयश येईल का ह्या भीतीने आपण कोणतेही मोठे काम हाती घेत नाही.

काही मोठी स्वप्न बघतच नाही, ती स्वप्न पूर्ण होतील ह्या दृष्टीने काही प्रयत्न करत नाही. परंतु असे करू नका.

मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्य दाखवा, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा.

जर आपण मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर आपण नक्कीच एक आनंदी आणि परिपूर्ण आयुष्य जगू शकतो.

आज ह्या लेखात आपण जाणून घेऊया मोठी स्वप्ने पाहण्याची ७ कारणे. कारण कुठलीही गोष्ट करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी त्यासाठी काहीतरी कारण समोर असेल, तर ती कारणं माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत.

१. परिपूर्ण जीवन – आपले आयुष्य हे आपल्याला मिळालेले एक वरदान आहे. आपल्या ह्या आयुष्यात सर्वानी आपल्याला जे करावेसे वाटते ते जरूर करावे.

आपल्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न जरूर करावे. आयुष्याच्या शेवटी काही करायचे राहून गेले अशी खंत वाटता कामा नये.

कारण हे आयुष्य पुन्हा जगण्याची संधी आपल्याला मिळणार नाहीये. त्यामुळे आहे त्या आयुष्यातच स्वतःला जोखा, आपल्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा आणि आपली स्वप्ने जरूर पूर्ण करा. इतरांपूढे आदर्श निर्माण करा.

२. इतराना प्रोत्साहित करा – आपण जेव्हा एखाद्या यशस्वी व्यक्तीची जीवन कहाणी ऐकतो तेव्हा आपण अगदी भारावून जातो. त्यांच्याप्रमाणे आपणही काही करून दाखवावे असे आपल्याला वाटू लागते.

अश्याच प्रकारे जर आपण स्वतः काहीतरी मोठे काम केले, तसे करण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले तर आपणही इतरांसाठी आदर्श होऊ शकतो.

इतरांना आपल्यामुळे प्रोत्साहन मिळून काहीतरी करून दाखवण्याची उर्मी मिळू शकते. म्हणून मोठी स्वप्ने पहा व ती पूर्ण करा.

३. भरपूर कमाई करा – मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करताना जरी आपण जोखीम पत्करत असलो तरी ती स्वप्ने पूर्ण झाली की मिळणारे लाभ देखील मोठे असतात.

उदाहरणार्थ एखादी नोकरी पत्करून दर महिन्याला ठराविक पगार मिळू शकतो परंतु तेच जर एखाद्याने स्वतःचा काही व्यवसाय सुरू केला तर सुरुवातीला खूप कष्ट करावे लागतील पण जम बसल्यावर मात्र मिळणारा पैसा आणि पत प्रतिष्ठा खूप मोठी असेल.

म्हणून जर जोखीम पत्करून मोठी कामे केली तर त्याचे फायदेही खूप आहेत.

४. कम्फर्ट झोन च्या बाहेर पडा – आपल्या सवयीची नेहेमीची कामे करणे कीती सोपे असते ना! परंतु अशा प्रकारे आरामात कामे करण्यामुळे आपली मोठी स्वप्ने बघण्याची क्षमता मात्र कमी होत जाते.

त्यामुळे तुमचा कम्फर्ट झोन सोडा, त्यातून बाहेर पडून काहीतरी मोठे काम करा.

असे करण्यामुळे आपल्या मेंदूला चालना मिळते, काम करण्याची उर्मी मिळते आणि आपण सतत कार्यरत राहू शकतो.

उत्साही आनंदी राहून सतत नवीन काहीतरी करण्याचे बळ मिळते.

५. इतरांना मदत करा – जर आपण मोठे स्वप्न पाहून काही मोठे काम करायचे ठरवले तर आपण त्या कामात इतरांना देखील सामावून घेऊ शकतो. काही आपल्यासारख्या लोकांना आपण रोजगार देऊ शकतो.

तसेच त्यांनाही मोठी स्वप्ने पाहण्याचे vision देऊ शकतो. विचार करा की तुम्ही एखादी मोठी इंडस्ट्री उभी केली आहे, कोणत्यातरी वस्तूचे उत्पादन सुरू केले आहे किंवा खूप शिकून डॉक्टर होऊन स्वतःचे हॉस्पिटल काढले आहे.

अश्या वेळी तुम्ही कितीतरी लोकांना काम करण्याची संधि देऊ शकता. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करू शकता.

६. भितीवर मात – पाडगावकरांनी म्हटलच आहे की ‘सांगा कसं जगायचं? कुढत कुढत की गाणं म्हणत,’ आपण आपले जीवन एक तर पुढे काय होईल, माझे कसे होईल ह्या भीतीच्या छायेत कुढत घाबरत घालवू शकतो किंवा मग आनंदाने, आत्मविश्वासाने त्या भितीवर मात करत मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करू शकतो.

आपल्याला आयुष्याच्या वाटणाऱ्या भितीवर मात करायची असेल तर स्वतःच्या मनाशी निर्धार करून काहीतरी मोठे काम करून दाखवण्यासाठी जरूर प्रयत्न करावे.

ह्यामुळे आपला तर फायदा होतोच पण आपण समाजाचे ही कल्याण करू शकतो. इतरांच्या उपयोगी पडू शकतो.

७. स्वतःचे नशीब स्वतः घडवा – आपण आयुष्यात काहीही प्रयत्न न करता कुढत राहून नशिबाला दोष देत बसणे योग्य नाही. त्यापेक्षा नशिबावर आपल्या प्रयत्नांनी मात करून स्वतःचे आयुष्य आपल्या मर्जिने जगा. स्वतःचे नशीब घडवा.

आपण आयुष्यात काय करायचे आहे हे स्वतः ठरवा व त्याप्रमाणे वागून यशस्वी होऊन दाखवा.

तर अश्या प्रकारे आपले आयुष्य हे आपल्याला मिळालेले वरदान आहे त्याचा पूर्णपणे उपभोग घ्या. मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करा. समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व बना.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “स्वप्न बघायला कारण शोधा! म्हणजे ते पूर्ण होईल”

  1. कुठलीही गोष्ट करण्याची प्रेरणा मिळण्यासाठी मोठी स्वप्ने पाहण्याची ७ कारणे 1.परिपूर्ण जीवन, २. इतराना प्रोत्साहित करा. ३. भरपूर कमाई करा. ४. कम्फर्ट झोन च्या बाहेर पडा. ५. इतरांना मदत करा. ६. भितीवर मात. व ७. स्वतःचे नशीब स्वतः घडवा ती खुप महत्वाचे व उपयुक्त आहेत.
    धन्यवाद.

    Reply
  2. THIS IS MOST IMPORTANT MOTIVATIONAL THOUGHTS FOR SELF CONFINDANCE,POSTIVE THOUGHTS
    THANKS TO MANCCHETALKS TEAM

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय