तुमची गॅसची सबसिडी तुमच्या अकाऊंट मध्ये जमा होते का? चेक करा घरच्या घरी

जुलै 2020 पासून बंद झालेली गॅस सबसिडी आता काही लाभधारकांना देणे सरकारने सुरू केलेले आहे.

सध्या काही लाभधारकांना ही सबसीडी 79.26 रुपये तर काहींना रुपये 158.52.ते रुपये 237.78 प्रति सिलेंडर मिळणे सुरू झालेले आहे.

एलपीजी चा गॅस सिलेंडर आपल्यापैकी बहुतेक जण घरी स्वयंपाकासाठी वापरतात.

दरवर्षी प्रत्येक ग्राहकाला जास्तीत जास्त १२ सिलेंडर बूक करता येतात. सरकारने आणलेल्या नवीन पद्धतीप्रमाणे सिलेंडरची पूर्ण रक्कम ग्राहकाला द्यावी लागते आणि त्यानंतर सब्सिडि म्हणजेच सरकार कडून मिळणारी सूट हि ग्राहकाच्या बँक अकाऊंट मध्ये जमा होते.

उदाहरणार्थ, जर गॅस सिलेंडर ची किमत रु. ७७० असेल (लेख प्रसिद्ध होईपर्यंत किंमत वाढलेली असण्याची शक्यता आहे. कारण ती दिवसेंदिवस वाढतच आहे) आणि सब्सिडि नंतरची रक्कम रु. ५५०/- असेल तर ग्राहकाने सिलेंडर घेताना आधी रु. ७७०/- द्यायचे.

आणि नंतर सूट मिळालेले रु. २२० /- ग्राहकाच्या अकाऊंट मध्ये थेट जमा होणार.

करोंनापूर्व काळात ही व्यवस्था नीट पार पडत होती. परंतु आता मात्र ही सूट मिळणारी रक्कम अगदी कमी म्हणजे रु. ३० ते ३५ इतकीच आहे.

शिवाय बँक अकाऊंटची माहिती भरताना झालेल्या चुकीमुळे किंवा इतर काही त्रुटींमुळे ही रक्कम ग्राहकाच्या अकाऊंट मध्ये जमा होतेच असं नाही.

पण आता आपण आपली सबसिडीची रक्कम आपल्या अकाऊंट मध्ये जमा होते आहे ना हे घरच्या घरी चेक करू शकतो.

आपण इंटेरनेटच्या मदतीने घरीच फोन अथवा कम्प्युटर वर हे चेक करू शकतो.

कोणत्याही इंटरनेट ब्राऊजर वरुन www.mylpg.in ह्या साइट ला भेट द्या.

आणि खालील स्टेप्स follow करा

१. तुमचा एलपीजी ID तिथे दिलेल्या जागेत लिहा.

अ) जर तुम्हाला तुमचा एलपीजी ID माहीत नसेल तर तेथील ‘click here to know your lpg id‘ ह्या लिंक वर क्लिक करा.

एक पॉप अप विंडो येईल जिथे तुम्ही तुमच्या एलपीजी distributor चे नाव सिलेक्ट करा. उदाहरणार्थ भारत गॅस, एचपी गॅस, indane गॅस…

तुमची म्हणजेच कस्टमर ची डिटेल माहिती विचारली जाईल. ती योग्य प्रकारे भरा.

Consumer ID आणि distributor चे डिटेल्स तुमच्या गॅस बुकच्या मागे लिहिलेले असतील.

तेथून वाचून ते अचूक भरा. त्यानंतर एक captcha कोड येईल तो भरा. तुमचा लॉग इन ID तयार होईल. त्याची तुमच्याजवळ नोंद करून ठेवा.

२. जर तुम्ही mylpg.in ह्या पेज ला पहिल्यांदा भेट देत असाल तर

न्यू यूजर हे ऑप्शन सिलेक्ट करा.

आपला आधीच्या स्टेप मध्ये मिळालेला १७ अंकी एलपीजी ID तेथे लिहा. तुमचा रजिस्टरर्ड मोबाइल नंबर देखील तिथे लिहा.

एक OTP तुमच्या मोबाइल वर येईल तो लिहून proceed हे बटन दाबा.

नंतर तुमचा ई मेल ID देऊन ह्या नव्या अकाऊंट साठी पासवर्ड सेट करा.

मग तुमच्या ई मेल ID वर एक ऍक्टिव्हेशन लिंक येईल त्यावर क्लिक करा.

एलपीजी कंपनी चे पेज उघडेल जिथे तुमचे अकाऊंट ऍक्टिवेट झाले असल्याचे लिहिले असेल.

३. तुमच्या LPG कम्पनीचे पेज

तेथे तुम्हाला ‘click here to log in‘ असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करून तुमचा मोबाइल नंबर वापरुन अकाऊंट मध्ये लॉग इन करा.

तेथे तुम्हाला तुमचे अकाऊंट डिटेल्स, बँक अकाऊंट डिटेल्स आणि आधार कार्ड डिटेल्स दिसतील.

तसेच तुम्ही सब्सिडि मिळण्याकरीता अर्ज केला आहे का हे देखील कळेल.

४. त्या पेजवर डावीकडे सिलेंडर बूकिंग ची नोंद आणि सब्सिडि ट्रान्सफर केल्याची नोंद आढळून येईल.

५. तेथे तुम्ही तुम्हाला मिळालेली सब्सिडि तुमच्या अकाऊंट ला ट्रान्सफर झाली आहे ना हे चेक करून कन्फर्म करू शकता.
तर अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला मिळणाऱ्या सबसिडी ची नोंद ठेवू शकता आणि मिळाली आहे ना हे कन्फर्म करू शकता.

जर तुम्हाला सब्सिडि ची रक्कम मिळली नसेल तर तुम्ही तुमचे बँक अकाऊंट लिंक झाले आहे की नाही ते चेक करू शकता. लिंक झाले नसेल तर ते लिंक करू शकता.

आणि अकाऊंट लिंक होऊनही जर रक्कम मिळत नसेल तर तेथेच feedback मध्ये तक्रार नोंदवू शकता. सध्या काही महिन्यांपासून मात्र सबसिडी जमा होत नाही.

तर अशा प्रकारे आपण घरच्या घरी आपली गॅस सब्सिडि जमा होते आहे ना हे चेक करू शकतो. त्याचा जरूर लाभ घ्या.

वरील पद्धत वापरताना काही अडचण आली तर तुम्ही १८००२३३५५५ ह्या टोल फ्री नंबर वर फोन करून त्यांची मदत घेऊ शकता.

Manachetalksसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “तुमची गॅसची सबसिडी तुमच्या अकाऊंट मध्ये जमा होते का? चेक करा घरच्या घरी”

  1. LPG साठी दिलेली लिंक सिक्योर दाखवत नाही कृपया स्वताहा चेक करने

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय