कॅन्सर पेशन्ट्स साठी आहार आणि दिनचर्या कशी असावी

कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. परंतु योग्य औषधांबरोबर योग्य ती दिनचर्या आणि सुयोग्य आहार घेतला तर कॅन्सर वर मात करता येऊ शकते.

कसे ते आपण आज पाहूया.

कॅन्सर पेशंटस साठी सुयोग्य आहार आणि दिनचर्या

१. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी, दातही न घासता १ ते २ ग्लास कोमट पाणी प्यावे.

२. दिवसभराचा आहाराचा तक्ता

आहार (शाकाहार)

नाश्ता (स. ८.०० वा)

पोहे/ उपमा/ इडली/ दलिया उपमा / ओट्स + अर्धा चमचा

हळद घातलेले ग्लासभर दूध + १ लहान डिश फळांचे तुकडे

दुपारचे जेवण (दु. १२.३० ते १.३०)

१ वाटी हिरव्या रंगाच्या भाज्या (पालेभाज्या किंवा कोबी, फ्लॉवर ई.) + १ वाटी डाळ + १, २ पोळ्या/फुलके + अर्धी वाटी भात

संध्याकाळी (संध्या.४.३०)

१ ग्लास दूध + हरिद्राखंड पाऊडर + हेल्थी बिस्किटे/ दलिया / खिचडी / भाज्यांचे सूप

रात्रीचे जेवण (रा. ७ ते ८ )

१ वाटी भाजी (हिरव्या भाज्या, पालेभाज्या ) + १ वाटी डाळ + १, २ फुलके

झोपताना (रा. १० वा.)

१ कप दूध + हळद + अश्वगंधा चूर्ण + शतावरी चूर्ण

काय खावे

१. धान्य – जुना तांदूळ, मका, बाजरी, गहू, ओट्स, बार्ली

२. डाळी – मूग, मसूर, तूर

३. फळे व भाज्या – दुधी भोपळा, कारले, परवल , शेवगा, लाल भोपळा, खजूर, कोबी, गाजर, फ्लॉवर, ब्रोकोली , मुळा , हिरव्या पालेभाज्या , लिंबू, द्राक्षे, पपई, टोमॅटो, रताळे, घेवडा, केळे , पेरू, सफरचंद ई

४. आले, लसूण, लिंबू, हळद ई .

जीवनशैली कशी असावी

नियमित प्राणायाम व ध्यान करावे. भस्रिका, कपालभाती, बाह्यप्राणायाम, अनुलोम विलोम, भ्रामरी, उज्जायि, उदगीथ, प्रणव जप ई. नियमित स्वरूपात करावे.

काय खाऊ नये (कुपथ्य)

१. धान्य– नवीन तांदूळ, मैदा

२. डाळी– हरभरा, उडीद, राजमा, वाटाणे , छोले

३. फळे व भाज्या– वांगी, फणस

४. इतर पदार्थ – तळलेले पदार्थ, दही, आंबट, तिखट, मसालेदार पदार्थ, कढी ई.

अजिबात खाऊ नये

१. तेलकट मसालेदार पदार्थ

२. मांसाहार

३. लोणचे

४. जास्त प्रमाणात मीठ

५. कोल्ड ड्रिंक्स

६. बेकरी उत्पादने

७. मद्यपान

८. फास्ट फूड

९. पॅक बंद पदार्थ

१०. जंक फूड

जीवनशैली

१. एकदम खूप न खाता थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे खाणे.

२. अतिरिक्त व्यायाम न करणे

३. भावनांचा उद्रेक न होऊ देणे

४. शांत राहणे.

५. तज्ञांच्या सल्ल्याने योगासने, ध्यान व प्राणायाम करणे.

ह्या गोष्टी दररोज करा

१. दररोज योगासने व ध्यान करा

२. रोज ताजे, गरम व हलके भोजन घ्या.

३. भोजन करताना वृत्ती आनंदी ठेवा.

४. एकदम खूप जास्त न खाता थोडे थोडे जास्त वेळा खा.

५. खूप कमी अथवा खूप जास्त भोजन करू नका.

६. आठवड्यातून एक दिवस उपास करा.

७. खाण्याच्या वेळा पाळा.

८. भोजनानंतर शतपावली करा.

९. हलका व्यायाम करा.

१०. लवकर झोपणे व लवकर उठणे अशी दिनचर्या ठेवा.

आपली दिनचर्या सुधारून, चांगला सुयोग्य आहार घेऊन आणि नियमित योगसाधना करून आपण कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला आटोक्यात ठेवू शकतो. औषधोपचारांबरोबर वरील दिनचर्येचे पालन करून स्वस्थ आणि आनंदी रहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “कॅन्सर पेशन्ट्स साठी आहार आणि दिनचर्या कशी असावी”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय