माझी म्हातारी

माझी म्हातारी अजून
शेतात काम करतीय,
सडा सारवान अन्
चूल पण बघतीय…
हातात पडलेत खड्डे
अन् पायांना गेल्यात तडा
तरी अजून शेतात लावतेय मिरचीअन् कांदा…
पाक झिजलाय पाठीचा मणका
तरी बायकांसोबत खुरपायला जातीय,
तसाच एक हात कमरेवरती ठेऊन शेतात
काहीतरी गुणगुणतीय…
लहान होते नातवंडं तेंव्हा काखाला घेऊन गावात फिरलीय,
तीच नातवंडं आज आय टी त रमलीय,
म्हातारी अजून शेतात राबतीय…
तिला काय माहीत पिझ्झा बर्गर
तिच्यासमोर आहे फक्त चटणी भाकर,
म्हातारीने जपल्यात पोरांच्या आठवणी
त्या पत्र्याच्या पेटीत वह्या पुस्तके आणि पेनसिली…
दिवसभर कामं करून म्हातारी दमतीय
तरी कुणीतरी येणार म्हणून गाडीची वाट बघतीय,
पोरं आता गादीवर झोपतात बघून
हळूच गोधडी कुठेतरी लपवतीय…
कारण माझी म्हातारी अजून शेतात काम करतीय,
पोरं आलेत सुट्टीला म्हणून दुखणं लपवतीय
तरी जाता जाता गाडीत गहू ज्वारी टाकतीय…
मायेचा पदर पुसत पुसत निरोप देतीय
पुन्हा तिला भेटायला मिळेल कि नाही
याची खंत तेवढी वाटतीय…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा