कुढत बसणाऱ्या मित्रास

जग ओळखेल ही तुजला
घाई त्याची मुळीच नाही
तुलाच ओळखण्यास मित्रा
खरेच विसरला असे …….!
वागणे नेहमीच असावे
काळ- पर्व असेल जसे
तरूण मनावर नको तुझ्या
वैराग्याचे पांघरून असे …….!
बहारीचा वसंत ऋतू तू
झटकून टाक ग्रीष्म हा
रसरशीत यौवन लाभता
शुष्क जगणे नको असे …।!
दोष का देशी नशिबास ?
कुढत बसने बरे नसे
मन आहे तुला तुझे एक
हेच तू विसरला असे …!
वाचण्यासारखे आणखी…
तु नेहमीच म्हणायचा, आपल्या प्रेमाचा गूलकंद कसा गं चाखायचा?
महीला दिन ना आज…
पेढे घ्या पेढे…..