फॅटी लिवरची कारणे, लक्षणे आणि घरगुती ऊपाय

लिवर हा आपल्या शरीराचा एक प्रमुख अवयव आहे. लिवर आपल्या शरीरात अन्न पचनापासून ते पित्तनिर्मिती पर्यंतचे कार्य करीत असते.

लिवर शरीराला संसर्गापासून वाचवणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे, शरीरातील विषारी पदार्थांचा निचरा करणे, चरबी कमी करणे आणि प्रोटीन तयार करणे इत्यादी कार्यात महत्वाची भूमिका बजावत असते.

अन्नाचे अतिरिक्त सेवन, मद्यपान करणे आणि चरबीयुक्त आहाराचे अतिरिक्त सेवन करणे ह्याने आपल्या लिवरची कार्यक्षमता कमी होते.

ते जास्त चरबी युक्त बनते. अशा लिवर ला फॅटी लिवर असे म्हणतात.

अशा अकार्यक्षम फॅटी लिवरवर आपण घरच्याघरी ईलाज करू शकतो.

एक साधारण समज असा आहे की, फॅटी लिवर हा आजार केवळ मद्यपान अथवा इतर मादक पदार्थांच्या सेवनानेच होतो आणि त्यावर घरी उपाय करणे अशक्य आहे.

सर्व प्रथम हे जाणून घेऊया की, फॅटी लिवर हा आजार केवळ मद्यपानानेच नव्हे तर आहाराच्या अयोग्य सवयींमुळे ऊदभवू शकतो.

महत्वाची गोष्ट म्हणजे फॅटी लिवर आजारवर तुम्ही घरच्याघरी ईलाज करू शकता.

फॅटी लिवर आजारावर घरगुती उपाय परिणामकारक ठरू शकतात.

घरगुती उपायाने लिवरचे ‘फॅटी लिवर’ ह्या आजाराने होणारे नुकसान काही प्रमाणात टळू शकते.

फॅटी लिवर म्हणजे काय
?

सर्व प्रथम फॅटी लिवर ह्या आजाराविषयी जाणून घेऊया.

लिवरच्या पेशींमध्ये अधिक प्रमाणात चरबी साठण्यास सुरवात होते.

लिवरमध्ये काही प्रमाणात चरबी असणे ही सामान्य गोष्ट आहे, परंतू लिवरमधील चरबीचे प्रमाण लिवरच्या वजनाच्या साधारणपणे दहा टक्याने वाढल्यास हा आजार ऊदभवतो.

अश्या परिस्थितीत, लिवरची काम करण्याची क्षमता कमी होते.

त्याचे कार्य बिघडते आणि विविध लक्षणे दिसू लागतात.

खरंतर लिवरवर परिणाम झाल्यानंतर बाह्य लक्षणे दिसून यायला बराच काळ जावा लागतो.

वयाच्या साधारण ४० नंतर हा आजार झाल्याचे दिसून येते.

आयुर्वेदात सांगीतल्याप्रमाणे पित्त दोष हे फॅटी लिवर चे प्रमुख कारण आहे.

शरीरात जास्त प्रमाणात पित्त तयार झाल्यामुळे दोष उत्पन्न होतो आणि लिवर चे कार्य बिघडण्यास सुरुवात होते.

फॅटी लिवर चे २ प्रकार आहेत.

१. अल्कोहोलिक फॅटी लिवर

नावाप्रमाणेच ह्या आजारामध्ये लिवर चे कार्य बिघडण्याचे मुख्य कारण म्हणजे अति मद्यपान.

खूप जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्यामुळे लिवरला सूज येते, लिवर वर चरबीचे थर साठत जातात आणि तिथे जखमा देखील होऊ शकतात.

२. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिवर

जास्त चरबीयुक्त भोजन करण्यामुळे आणि बैठ्या जीवनशैलीमुळे स्थूलता वाढते आणि डायबीटीस होण्याचा देखील धोका असतो.

आणि त्यामुळे लिवर ला सूज येऊ शकते.

अशा वेळी मद्यपान न करता सुद्धा फॅटी लिवर हा आजार होऊ शकतो.

फॅटी लिवर होण्याची प्रमुख कारणे

उपाय जाणून घेण्याआधी आपण फॅटी लिवर नक्की कशामुळे होते हे जाणून घेऊया.

खाली दिलेल्या कारणांमुळे प्रौढ तसेच काही वेळा लहान मुलांमध्ये देखील हा आजार झालेला दिसतो.

१. अतिमद्यपान

२. अनुवांशिकता

३. स्थूलता

४. फॅटी फूड आणि मसालेदार तेलकट फूड चे अतिसेवन

५. रक्तात चरबीचे प्रमाण जास्त असणे

६. मधुमेह( डायबीटीस)

७. स्टीरॉईडस किंवा एस्प्रिन असलेल्या औषधांचे दीर्घकाळ सेवन

८. पिण्याच्या पाण्यात जास्त प्रमाणात क्लोरिन असणे

९. वायरल कावीळ होणे

फॅटी लिवर होण्याची प्रमुख लक्षणे

फॅटी लिवर ची लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. त्यामुळे खरंतर उपचार करण्यास उशीर होऊ शकतो.

परंतु आपण त्यातल्या त्यात लक्ष ठेवून खाली दिलेली लक्षणे आढळल्यास लवकर उपचार करू शकतो.

१. पोटात उजव्या बाजूला वरच्या भागात वेदना होणे.

२. वजन लक्षणीय रित्या घटणे

३. अशक्तपणा अथवा थकवा जाणवणे

४. डोळे आणि त्वचा पिवळसर दिसणे

५. अपचन होणे, अन्नावरची वासना उडणे, वारंवार ऍसिडिटी होणे

६. पोटात सूज येणे

लहान मुलांमध्ये फॅटी लिवर असण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

परंतु जी मुले जन्मापासून स्थूल असतात अथवा नंतर जास्त प्रमाणात स्थूल होतात त्यांच्यामध्ये हा आजार दिसून येतो.

मुलांमध्ये फॅटी लिवर ची लक्षणे

१. वारंवार थकवा येणे

२. पोटदुखी

३. रक्ताच्या तपासणीत लिवर एनजाईम्स वाढलेले आढळणे.

फॅटी लिवर वरचे घरगुती उपाय

आयुर्वेदात रोगावर उपचार करताना फक्त औषधेच दिली जात नाहीत तर रुग्णाच्या दिनचर्येत आणि जीवनशैलीत तसेच आहारात देखील योग्य ते बदल केले जातात.

त्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. तर जाणून घेऊया फॅटी लिवर असताना काय आहार घ्यावा,

कोणती जीवन शैली स्वीकारावी.

१. आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश असावा.

२. फायबरयुक्त आहार घ्यावा. म्हणजे सालासह डाळी वापराव्यात, फळांचा रस न काढता चावून पूर्ण फळ खावे.

३. जास्त प्रमाणात मीठ, ट्रान्स फॅट, रिफाईनड तेल, साखर ह्यांचे सेवन करू नये.

४. मद्यपान अजिबात करू नये.

५. आहारात लसूण अवश्य असावा

६. ग्रीन टी प्यावा

७. जंक फूड अजिबात खाऊ नये.

८. पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये जास्त प्रमाणात खावीत.

९. मूग डाळ, मसूर डाळ ह्यांचा समावेश आहारात करावा. राजमा, छोले इत्यादीचे सेवन कमी करावे.

१०. तेल, तूप, लोणी, मेयोनीज कमी प्रमाणात खावे.

११. नियमित प्राणायाम करावा. तसेच रोज सकाळी फिरायला जावे.

लहान मुलांकरता उपाय

१. मुलांना जास्त गोड खाऊ देऊ नका.

२. फायबरयुक्त आहार द्या

३. नियमित व्यायामाची, मैदानी खेळ खेळण्याची सवय लावा.

आता जाणून घेऊया फॅटी लिवर वरचे घरगुती उपाय

१. आवळा पावडर

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात आणि विटामीन सी असते ज्यामुळे लिवर चे कार्य सुधारते.

म्हणून कच्चा आवळा किंवा आवळ्याची पावडर घेतली असता फायदा होतो.

२. ताक

दुपारच्या जेवणानंतर हिंग, जिरे, काळीमिरी आणि मीठ घातलेलं ताक पिणे हे फॅटी लिवर साठी उपयुक्त आहे.

ह्यामुळे अन्नाचे योग्य रीतीने पचन होऊन त्वचेचे आरोग्य सुधारते.

३. ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स असतात त्यामुळे फॅटी लिवर चे कार्य सुधारून त्यावर जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.

४. लिंबू, संत्रे

लिंबू, संत्रे अशा फळांमध्ये भरपूर प्रमाणात विटामीन ‘सी’ असते ज्यामुळे फॅटी लिवर बरे होण्यास मदत होते.

५. कारल्याचा रस, हळद, ऍपल सायडर विनिगर हे पदार्थ देखील फॅटी लिवर साठी उपयुक्त आहेत.

६. जांभूळ आणि टोमॅटो खाणे तसेच नारळाचे पाणी पिणे हे देखील फॅटी लिवर मध्ये उपयुक्त आहे.

तर हे आहेत फॅटी लिवर बरे करण्याचे घरगुती उपाय.

त्यांचा जरूर लाभ घ्या. परंतु त्रास वाढत असेल, बरे वाटत नसेल तर प्रत्यक्ष तज्ञ डॉक्टर किंवा वैद्य ह्यांचा सल्ला जरूर घ्या.

कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

स्वस्थ रहा आनंदी रहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय