रुटीनचा कंटाळा आलाय, या २५ आयडिया तुमचा कंटाळा घालवतील!!

हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांचेच आयुष्य खूप व्यस्त झाले आहे.

कामामुळे आलेला तोचतोचपणा आणि अगदी यांत्रिक आयुष्याचा सर्वांनाच कंटाळा येतो.

त्यामुळे मग हळूहळू नैराश्य येऊ लागते.

अशा वेळी गरज असते ती स्वतःच स्वतःला मदत करण्याची.

आपण स्वतः मध्ये बदल करून आपले कंटाळवाणे दिवस बदलून टाकून त्याचे उत्साही दिवसात रूपांतर करू शकतो.

आपल्या बिझी रुटीन मधून वेळ काढणं खरं तर प्रत्येकाला अवघड जातं पण स्वतःसाठी ही गोष्ट आपण करायलाच हवी.

चला तर मग आज आपण ह्या लेखात जाणून घेऊया की आपल्या कंटाळ्यावाण्या रुटीनवर आपल्याला कशी मात करता येईल.

२५ अशा आयडिया ज्याने कंटाळ्यावर मात करून उत्साही होता येईल

१. दररोज व्यायाम करा

दररोज कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम नक्की करा.

व्यायाम करण्यामुळे दिवसभर ताजेतवाने वाटते आणि शरीरात उत्साह देखील टिकून राहतो.

शिवाय आरोग्य उत्तम राखण्यास देखील मदत होते.

२. एकट्याने ट्रीपला जा

रुटीनचा कंटाळा आला असेल, कोणाशी संपर्क करावासा वाटत नसेल तर काही हरकत नाही.

वीक एंड ला एकट्याने एक सोलो ट्रीप करा.

मस्तपैकी जवळच्या कुठल्यातरी ठिकाणी २ दिवस फिरून या आणि पहा तुमचा मूड कसा बदललेला असेल.

३. निसर्गाचा आनंद घ्या

वीक एंडला घरात बसून राहण्यापेक्षा बाहेर पडा.

एखाद्या ट्रीपला गेल्यावर सुद्धा रिसॉर्ट मध्येच बसून न राहता बाहेर पडून तेथील निसर्गाचा आनंद घ्या.

समुद्र असणाऱ्या किंवा जंगल इत्यादि असणाऱ्या ठिकाणी जा आणि परत येताना भरपूर उत्साह घेऊन या.

४. दुपारी एखादी डुलकी काढा

दिवसभराच्या थकव्यावरचा रामबाण उपाय म्हणजे दुपारी २०, २५ मिनिटांची एखादी डुलकी काढणे.

ह्यामुळे कामाचा थकवा तर कमी होतोच पण पुढचे काम करण्यासाठी उत्साह देखील येतो.

५. दीर्घ श्वसन करण्याची सवय लावून घ्या

आपल्या शरीराला नियमित स्वरूपात भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी दीर्घ श्वसन करण्याची सवय लावून घ्या.

ह्यामुळे शरीरातील सर्व ऑर्गन्स ना ऑक्सिजन चा पुरवठा होऊन उत्साही वाटते.

६. एखादे पुस्तक वाचा

असे म्हणतात की पुस्तकासारखा दूसरा मित्र नाही.

तुमच्या व्यस्त रुटीन मधून वेळ काढून तुमच्या आवडीच्या विषयावरचे पुस्तक जरूर वाचा.

ह्यामुळे आपल्या विचारांना वेगळी, पॉझिटीव दिशा मिळते.

७. स्वयंपाक करा

कंटाळा आलेला असताना एखादा नवीन पदार्थ करणे हे देखील आपल्याला उत्साह देते.

स्वतःसाठी आणि इतरांसाठीही एखादा पदार्थ, बेकिंग इत्यादी जरूर करा.

८. मित्र मैत्रिणींना जेवायला बोलवा

तुमच्या मित्र मैत्रिणींना सुट्टीच्या दिवशी जेवायला बोलवा, ह्यामुळे तुमच्या रुटीन मध्ये बदल होऊन सर्वांच्या भेटी होतील आणि उत्साह वाढेल.

९. एखादा विनोदी सिनेमा पहा

कंटाळ्यावर मात करायला विनोदासारखा दूसरा उपाय नाही.

एखाद्या बोरिंग दुपारी विनोदी सिनेमा पहा, तुमचा कंटाळा गायब होऊन तुम्ही फ्रेश झालेले असाल.

१०. सोशल मिडियापासून १/२ दिवस दूर रहा

सतत सोशल मिडियावर राहून देखील आपला स्ट्रेस वाढतो त्यामुळे स्वतःला जाणीवपूर्वक काही काळासाठी सोशल मिडियापासून दूर करा.

११. उत्तम गाणी ऐका

मरगळ घालवण्यासाठी आपल्या आवडीची उत्तम गाणी ऐका. चांगल्या म्युझिक चा थेरपी सारखा उपयोग होतो.

१२. ध्यानधारणा करा

ध्यान करण्याचा, मेडिटेशन करण्याचा मनाच्या उत्तम आरोग्यासाठी खूप उपयोग होतो.

कंटाळ्यावर मात करण्यासाठी नियमित स्वरूपात ध्यान धारणा करा.

१३. आवडत्या व्यक्तीशी बोला

काही वेळा आपल्याला फक्त कोणाशीतरी मनातलं बोलण्याची गरज असते.

अशा वेळी आपल्या आवडत्या, आपल्याला कम्फर्ट वाटेल अशा व्यक्तीशी मनातलं जरूर बोला.

१४. दान करा

आपल्यापेक्षा वाईट परिस्थितीत असणाऱ्या लोकांसाठी काहीतरी जरूर करा.

त्यासाठी वस्तु, पैसे, पदार्थ अशा पद्धतीने दान करा. ह्यामुळे एक वेगळ्याच प्रकरचा आनंद आणि मनःशांती मिळते.

१५. आपली खोली आवरा

कंटाळा आलेला असताना आपली खोली आवरायला सुरुवात करा.

तुमचा कंटाळा पळून जाईल आणि रूम आवरून झाली की एक प्रकारचा उत्साह, नवेपणा वाटेल.

१६. स्वतःला काहीतरी भेट द्या

आपण नेहेमी इतरांसाठी काही ना काही भेटवस्तू खरेदी करत असतो.

पण जरा स्वतःसाठी देखील काहीतरी भेटवस्तू खरेदी करून पहा.

स्वतःचे लाड स्वतःच करा. ह्यामुळे तुम्हाला आनंदी आणि उत्साही वाटेल.

१७. शक्य असल्यास स्पा ला भेट द्या

एखाद्या उत्तम स्पा ला भेट देऊन ताजेतवाने व्हा.

बाहेर जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील स्पा अरेंज करू शकता.

१८. भरपूर पाणी प्या

बरेचदा आपल्याला तहान लागलेली असते, आपल्या शरीराला पाण्याची गरज असते परंतु आपल्या ते लक्षात येत नाही.

तर असे होऊ देऊ नका. आवर्जून भरपूर पाणी प्या आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवा.

१९. कॅमोमाइल चहा प्या

कॅमोमाइल चहा पिऊन पहा. हा विशिष्ठ प्रकारचा चहा आपल्या मरगळलेल्या मनाला आणि शरीराला ताजेतवाने करतो.

२०. आंघोळ करा

कंटाळा घालवण्याचा साधा सोपा उपाय म्हणजे आंघोळ करणे.

गार किंवा गरम पाण्याने आंघोळ करण्यामुळे आपल्याला स्वच्छ तर वाटतेच पण फ्रेश देखील वाटते. उत्साह वाढतो.

२१. व्हिटॅमिन ‘बी १२’ च्या गोळ्या घ्या

ब जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे बरेचदा थकवा येतो, अशा वेळी डॉक्टरी तपासणी करून ब जीवनसत्वाच्या विशेषतः बी १२ च्या गोळ्या घ्या, निश्चित फरक पडेल.

२२. एखादा पाळीव प्राणी घरी आणा

पाळीव प्राणी एक वेगळाच आनंद देतात, आपल्या जीवनात असणारी पोकळी ते भरून काढतात.

जर तुम्ही निराश, कंटाळलेले असाल तर एखादा प्राणी पाळा, त्याच्याशी खेळताना तुमचा कंटाळा पळून जाईल.

२३. बरेच दिवसात न भेटलेल्या व्यक्तीची भेट घ्या

अशा एखाद्या व्यक्तीशी जरूर संपर्क साधा जिला तुम्ही बरेच दिवसात भेटला नाही.

तुमचे शाळा कॉलेज मधील मित्रमैत्रिणी, जुन्या घराचे शेजारी किंवा आधीच्या नोकरीतील सहकारी हयापैकी कोणालाही फोन करा, भरपूर गप्पा मारा, जुन्या आठवणीत रमून गेल्यामुळे तुम्ही फ्रेश व्हाल.

२४. प्रिय व्यक्तीबरोबर बाहेर जा

आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर बाहेर जाण्याचा प्लान बनवा.

ह्यामुळे नेहेमीच्या रुटीनमध्ये बदल होऊन तुमचा उत्साह वाढेल.

२५. डायरी लिहा

तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी डायरीत लिहून काढा.

ह्यामुळे हे लिखाण पुनःपुन्हा वाचण्याचा आणि ते क्षण पुन्हा जगण्याचा आनंद घेता येईल.

तर ह्या आहेत कंटाळ्यावर मात करून आपले नीरस आयुष्य उत्साही बनवण्याच्या २५ आयडिया.

ह्यांचा उपयोग करून आनंदी आणि उत्साही व्हा, जीवनाचा पुरेपूर उपभोग घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “रुटीनचा कंटाळा आलाय, या २५ आयडिया तुमचा कंटाळा घालवतील!!”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय