समृद्धीसाठीचे अफर्मेशन: पैशास पत्र….

Money Happyness

प्रिय पैसा,

प्रत्येक माणुस तुला मिळवण्यासाठी सकाळपासुन रात्रीपर्यंत धडपडत असतो…

तुझं नाव काढलं की काही लोकं घाबरतात,

अचानक काहीतरी आठवुन त्यांना तुझ्या बाबतीत चिंता वाटायला लागते…

काही लोकं तुला सगळ्या प्रश्नांचं मुळ मानतात,

पण तु तर माझा जिवलग मित्र आहेस.

लहानपणी आम्ही कविता म्हणायचो, ये रे पावसा, तुला देतो पैसा…

पाऊस तर खुपदा आला, आम्ही कधी पावसाला पैसा दिलाच नाही…. आम्ही वचन मोडलं…

कारण लहानपणापासुनच आम्हाला तु खुप खुप प्रिय आहेस……

माहितीये, लहानपणी बाबांजवळ नोटांची बंडलं पाहुन त्यांचा खुप हेवा वाटायचा….

वाटायचं, आपण कधी मोठे होणार आणि अशा नोटा आपल्या खिशात कधी येणार?…

त्या कडक नोटांचं आकर्षण तेव्हाही होतं.

तु तेव्हाही हवा होतास आणि आजही तु हवाहवासा आहेस.

कधी कोणी जर विचारलं की कशाला हवा पैसा?

तर मी सांगेन, स्वप्ने पुर्ण करायला हवं पैसा……

माझा ठाम विश्वास आहे, तुझ्या मार्फत जगातली सगळी नसली, तरी बरीचशी सुखं मिळवता येतात,

बघ ना!…. साधं गाडीत पेट्रोल घालण्यासाठी तुच लागतोस,

तब्येत खराब झाली की डॉक्टरांकडे एन्ट्री मिळण्यासाठीही तु लागतोस,

चांगले आकर्षक कपडे आणि सुंदर व्यक्तिमत्वासाठी तुझं माझ्यापाशी असणं मदतीचं ठरतं…

चवदार अन्न, शुद्ध आणि स्वच्छ मुबलक पाणी, ताजी आणि थंड हवा घेण्यासाठी तुच तर मदत करतोस,

सुंदर बंगला, मोठी अलिशान गाडी, शानदार बाईक, स्टायलिश महागडी घड्याळं, ही माझ्या सार्‍या इच्छा आयुष्यात तुझ्या भरभरुन

येण्यानेच तर पुर्ण झाल्या आहेत, होणार आहेत,

आपल्या प्रिय व्यक्तिला सोबत घेवुन जगातल्या सर्व निसर्गरम्य ठिकाणं फिरण्यासाठी पैसाच तर लागतो,

माझ्याकडे भरपुर आणि मुबलक प्रमाणात पैसा आहे ही भावनाच खुप सुखकारक आणि आनंददायक आहे…

शांत, प्रसन्न आणि खेळकर जीवन मिळण्यासाठी आणि असण्यासाठी आवश्यक आहेस रे तु!…….

लोकांच्या जीवनातलं दैन्य घालवण्यासाठीही, सुखसमृद्धी असण्यासाठीही हवा असतोस तु!,,

आणि तीव्रपणे एखाद्याला मदत करण्याची, मनापासुन काहीतरी देण्याची इच्छा होते, तेव्हाही तुच आवश्यक आहेस…

तु भक्कमपणे पाठीशी असलास ना, की मी मोठमोठ्या संकंटांना सहज सामोरे जावु शकतो, चुटकीसरशी त्यांचा चुराडा करु शकतो,

माझ्या मनात लपुन बसलेली भिती, नुसत्या तुझ्या आस्तित्वाने छुमंतर होते रे!…

तु भरपुर प्रमाणात असलास की नात्यांमधला गोडवा वाढतो!…

माझे मनसोक्त छंद जोपासण्यासाठी, स्वतःला हरवुन देण्याचं स्वातंत्रही, तुच प्रदान करतोस!…

ये, भरभरुन आमच्या आयुष्यात ये आणि आमचं आयुष्य समृद्ध बनवं….

कारण आपल्या वेदांमध्येही, श्री सुक्ता मध्ये लक्ष्मीला आवाहन केलं आहेच की,….

हे लक्ष्मी ये, भरपुर प्रमाणात ये!…..

मागल्या दाराने नको!….. हत्तीवर बसुन वाजत गाजत ये,……

धन्यवाद!….कारण की तु माझ्यापाशी भरपुर प्रमाणात आहेस आणि तुझा अखंड ओघ सुरुच आहे…..

धन्यवाद!…. कारण मी पैसा खेचुन घेणारा चुंबक आहे……

 

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप किंवा टेलिग्राम वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप / टेलिग्राम मेसेज करा.

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!