अनियमित मासिक पाळीवरचे ७ घरगुती उपाय

मासिक पाळी हे स्त्रियांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग आहे. ते स्त्रीला मिळालेलं एक वरदान आहे.

मासिक पाळी येत असल्यानेच स्त्रीला मातृत्वाची प्राप्ती होते.

तसेच नियमितरीत्या योग्य पध्दतीने मासिक पाळी आली की स्त्रीचे आरोग्य देखील चांगले राहते.

परंतु हल्लीच्या धकाधकीच्या युगात बदललेल्या जीवनशैली मुळे आणि इतरही अनेक कारणांमुळे अनेक स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होत आहे.

नियमितपणे दर २८ ते ३० दिवसांनी पाळी न येता कधी ती खूप लांबते तर कधी लगेच येऊन खूप त्रास होतो. काही स्त्रियांना पाळी दरम्यान अतीव वेदना होतात.

अति रक्तस्त्राव, पोट दुखणे असेही त्रास होतात.

परंतु आपल्याकडे ह्या विषयावर बोलणे हे सहसा टाळले जाते.

त्यामुळे स्त्रीयांच्या आरोग्याशी निगडीत असलेला हा इतका महत्वाचा विषय बाजूला पडतो.

काही वेळा लहान मुलींना पाळी येऊ लागते तरीही त्याबद्दल काही महित नसते इतका हा विषय दुर्लक्षित ठेवला जातो.

आज आपण ह्या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊया आणि पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासावरची घरगुती औषधे जाणून घेऊया.

प्रथम आपण मासिक पाळी म्हणजे नक्की काय हे

थोडक्यात जाणून घेऊया.

मासिक पाळी म्हणजे नक्की काय

वयात आलेल्या प्रत्येक स्त्रीच्या गर्भाशयाच्या आतल्या भागाला पेशी आणि रक्ताचे एक अस्तर असते.

हे अस्तर ती स्त्री गरोदर झाली असता गर्भाच्या पोषण आणि संरक्षणाकरता वापरले जाते.

परंतु जर ती स्त्री गरोदर नसेल तर ते अस्तर गर्भाशयातून योनिमार्गाद्वारे बाहेर टाकले जाते.

आणि नवीन अस्तर तयार होते. ही प्रोसेस दर महिन्याला घडते.

त्यामुळे गरोदर नसलेल्या प्रत्येक स्त्रीला प्रत्येक महिन्याला योनिमार्गातून असा रक्तस्त्राव होतो.

त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात .

मासिक पाळीची सुरुवात किशोरावस्थेतील ९ ते १५ वर्षे वयाच्या मुलींमध्ये दिसून येते.

आणि साधारणपणे वयाच्या ४५ ते ५५ वर्षांपर्यंत स्त्रियांना पाळी येते. त्यांनंतर पाळी येणे बंद होते.

आता आपण मासिक पाळी अनियमित होते म्हणजे काय ते जाणून घेऊया.

अनियमित मासिक पाळी म्हणजे काय

गर्भधारणा झाली नाही की गर्भाच्या पोषणाकरता असणारे अस्तर शरीराबाहेर टाकले जाते.

ही क्रिया साधरणपणे दर २८ ते ३० दिवसांनी होते. तशी ती होत राहिली की पाळी नियमित आहे असे समजावे.

परंतु गर्भधारणा नसतानाही दर २८ ते ३० दिवसांनी येण्याऐवजी खूप जास्त दिवस पाळी आलीच नाही किंवा एकदा पाळी आल्यावर पुन्हा लगेच आली तर त्यास अनियमित मासिक पाळी असे म्हणतात.

मुलींना पाळी येण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात आणि स्त्रियाना पाळी जाण्याच्या काळात (मेनोपॉज) अनियमित पाळी येऊ शकते, परंतु त्याव्यतिरक्त च्या मधल्या काळात म्हणजेच वय साधारण १६ ते ४५ वर्षे ह्या दरम्यान मासिक पाळी नियमित येणे आवश्यक आहे (अपवाद फक्त गर्भधारणा झालेल्या काळाचा). अन्यथा त्यावर उपाय करणे आवश्यक आहे.

मासिक पाळी अनियमित होण्याची अनेक कारणे आहेत. स्थूलता, अनिमिया, हॉर्मोन्सचे असंतुलन, लिवरचे आजार, क्षयरोग, अनियमित जीवनशैली, व्यायामाचा अभाव, गर्भपात अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमित होऊ शकते.

तसेच खूप जास्त व्यायाम करणे, धूम्रपान, मद्यपान करणे, चहा, कॉफीचे अतिसेवन, ताण तणाव आणि थकवा असणे ही देखील पाळी अनियमित होण्याची कारणे असू शकतात.

तसेच विशिष्ठ प्रकारची औषधे आणि गर्भनियोजक गोळ्या देखील काही वेळा ह्या त्रासासाठी कारणीभूत असू शकतात.

ह्या त्रासावर अनेक औषधे तर आहेतच पण अनेक प्रभावी घरगुती उपाय पण आहेत.

कोणते ते आपण आज जाणून घेऊया.

अनियमित मासिक पाळी नियमित करण्याकरता आयुर्वेदात अनेक घरगुती उपाय सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे…

१. कच्ची पपई

कच्ची पपई पाळीचा रक्तस्त्राव नियमित करण्याकरता उपयोगी पडते कारण पपईमुळे गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात.

पाळी अनियमित असेल तर काही महिने रोज कच्च्या पपईचा रस प्यावा.

निश्चित फरक पडतो. परंतु हा रस पाळी सुरू असताना घेऊ नये, इतर दिवशी घ्यावा.

२. हळद

हळद अनेक प्रकारे गुणकारी आहे हे आपण सर्व जाणतोच.

हळद हॉर्मोन्स चे संतुलन नियमित करते तसेच पाळी दरम्यान होणारा रक्तस्त्राव नियमित करते.

पाव चमचा हळद दुधातून अथवा मधातून घेण्याचा खूप उपयोग होतो. पाळी नियमित होईपर्यंत हा उपाय सलग करावा.

३. कोरफड

वॉर्निंग – हा उपाय पाळी सुरू असताना करण्याचा नाही. इतर दिवशी करावा.

ताजा कोरफाडीचा गर एक चमचा मध मिसळून रोज रिकाम्यापोटी घ्यावा.

निश्चित फरक पडतो. पाळी नियमित होण्यास मदत होते.

४. योग आणि मेडिटेशन

स्ट्रेस हे आपल्या शरीरातील हॉर्मोन्स चे संतुलन बिघडण्याचे प्रमुख कारण आहे.

स्ट्रेस कमी करण्यासाठी नियमित स्वरूपात योगासने आणि मेडिटेशन करण्याचा खूप उपयोग होतो.

स्ट्रेस कमी झाला की हॉर्मोन्स चे संतुलन व्यवस्थित होते तसेच योगासनांमुळे स्थूलता देखील येत नाही.

त्यामुळे पाळी नियमित होण्यास मदत होते.

५. आलं

१ चमचा ताज्या आल्याचा कीस पाण्यात ५ मिनिटे उकळावा आणि थोडी साखर घालून ते पाणी दिवसातून ३ वेळा प्यावे.

हा उपाय मासिक पाळी नियमित करण्यासाठी आणि पाळी दरम्यान रक्तस्त्राव नीट होण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.

६. जिरे

चमचाभर जिरे पाण्यात रात्रभर भिजवून ठेवावे आणि सकाळी रिकाम्यापोटी ते पाणी जिऱ्यासकट प्यावे. ह्यामुळे पाळी नियमित होण्यास मदत होते.

७. दालचीनी

दालचीनी हा मसाल्याचा सुगंधी पदार्थ तर आहेच शिवाय तो पाळीचे त्रास घालवण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

एक चमचा दालचीनीची पूड ग्लासभर कोमट दुधात घालून घेतली असता पाळी नियमित होण्यास मदत होते तसेच पाळी दरम्यान जो पोटदुखीचा त्रास होतो तो कमी करण्यास देखील मदत होते.

तर हे आहेत अनियमित पाळी नियमित करण्याचे काही घरगुती प्रभावी उपाय.

जर तुमची पाळी नियमित नसेल तर हे उपाय नक्की करून पहा.

फायदा नक्कीच होईल. अर्थात ह्या उपायांनी फरक पडला नाही तर फार जास्त वेळ न घालवता स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांची भेट नक्की घ्या आणि पुढील उपचार करून घ्या.

स्वस्थ रहा, आनंदी रहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “अनियमित मासिक पाळीवरचे ७ घरगुती उपाय”

  1. लेख खूप आवडला अशीच माहीती देत जावा

    Reply
    • नमस्कार! मनाचेTalks मध्ये आपले मनस्वी स्वागत. हे फेसबुक पेज 𝑴𝒐𝒕𝒊𝒗𝒂𝒕𝒊𝒐𝒏 𝒇𝒐𝒓 𝑮𝒐𝒐𝒅 𝑳𝒊𝒇𝒆 ❤️ या 𝑷𝒂𝒔𝒔𝒊𝒐𝒏 साठी आहे.

      मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून ‘Add मनाचेTalks to Favourites’ यावर क्लिक करा…

      #मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇

      व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇

      https://chat.whatsapp.com/I6p7m8Cruee4otE6qRWJoE

      टेलिग्राम चॅनल👇

      https://t.me/manachetalksdotcom

      Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय