जाणून घ्या ५ टिप्स बाईकच्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी

५ टिप्स बाईक च्या बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी गाडीच्या बॅटरीची माहिती

आज ह्या लेखात आपण जाणून घेऊया बाईकच्या बॅटरी चे आयुष्य वाढवणाऱ्या आणि टिकवणाऱ्या ५ टिप्स.

आपण उत्साहाने आपल्यासाठी बाईक ची खरेदी करतो. नवीन असताना तिच्याकडे नीट लक्षही देतो.

आपल्या बाईकची काळजी घेतो. परंतु नव्याची नवलाई संपली की आपले बाईककडे दुर्लक्ष होऊ लागते.

तिला नीट मेंटेन करणे आपल्याला जमेनासे होते आणि मग बाईकच्या एक एक तक्रारी सुरू होतात, दुरुस्तीसाठी खर्च निघू लागतात आणि आपण अगदी त्रस्त होऊन जातो.

ह्यातली प्रमुख तक्रार बरेचदा असते ती बाईकच्या बॅटरी बद्दल. खरंतर नीट मेंटेन केली तर बाईक ची बॅटरी कायमस्वरूपी टिकू शकते.

दुरुस्तीची काही गरज पडत नाही. परंतु त्यासाठी काही काळजी घेणे आवश्यक आहे.

मोठे कर्ज काढून मनाजोगती मोटरबाईक घेण्याआधी तिच्या बॅटरी बद्दलच्या मेंटेनन्स टिप्स माहीत असणे आवश्यक आहे. तरच आपण आपल्या बाईक चा मनमुराद आनंद घेऊ शकू.

मोटरबाईकच्या बॅटरीचे आयुष्य वाढवणाऱ्या ५ टिप्स खालीलप्रमाणे 

१. बॅटरीची टर्मिनल्स नेहेमी स्वच्छ ठेवा 

बॅटरी मध्ये असणारे इलेक्ट्रोलाइट बॅटरी मधून गळू शकते आणि त्यामुळे बॅटरीची टर्मिनल्स खराब होऊ शकतात.

ह्यामुळे बॅटरी च्या टोकांकडचा भाग गंजून तिथे स्पार्कींग होऊ शकते. तसेच गंजल्यामुळे बॅटरी कडून बाईक सुरू करण्यासाठी मिळणारी ऊर्जा कमी पडून बाईक सुरू/स्टार्ट न होण्यासारखे त्रास होऊ लागतात.

म्हणून बॅटरी चे आयुष्य वाढण्यासाठी बॅटरीची टोके (टर्मिनल्स) नेहेमी स्वच्छ ठेवा. तिथे गंज चढू देऊ नका.

२. बॅटरीच्या टर्मिनल्सपाशी असणारे स्क्रू घट्ट बंद ठेवा

जर बॅटरीची टोके उघडी असतील तर तेथे स्पार्किंग होण्याचा धोका असतो. आणि स्पार्किंग मुळे संपूर्ण बॅटरी खराब होण्याची शक्यता असते.

म्हणून बॅटरी ची टोके पूर्ण घट्ट बंद करा. तेथे कोणतेही लिकेज होऊ देऊ नका. तसेच बॅटरी च्या टर्मिनल्सना ग्रीस लावण्याची खबरदारी घ्या ज्यामुळे गंज चढणार नाही व बॅटरी खराब होणार नाही.

३. बॅटरीचा फ्यूज नियमित तपासा

बॅटरी चा फ्यूज ही अगदी साधी स्वस्त वस्तु असते परंतु त्यावर बॅटरी चे आयुष्य आणि टिकाउपणा अवलंबून असतो.

प्रत्येक सर्विसिंगच्या वेळी फ्यूज तपासून पाहणे आणि खराब झालेला किंवा जास्त वापरलेला फ्यूज बदलून टाकणे केव्हाही चांगले.

नवीन बॅटरी च्या तुलनेत नवीन फ्यूज ची किंमत अगदी नगण्य असते. परंतु त्यामुळे बॅटरी चे लाईफ वाढते आणि ती जास्त टिकते.

४. बॅटरीतील पाण्याची पातळी चेक करत रहा.

बाईक च्या बॅटरीमध्ये अतिशय शुद्ध असे डिस्टील वॉटर घातलेले असते. त्याची ठराविक पातळी मेंटेन करणे आवश्यक असते.

तसेच इतर कुठलेही पाणी त्यात भरले तर पाण्यातील अशुद्ध घटकांमुळे बॅटरी खराब होऊ शकते.

बॅटरीतील इलेक्ट्रोलाइट कायमस्वरूपी खराब होऊ शकते. म्हणून योग्य पाण्याने बॅटरीतील पाण्याची पातळी नियमित पणे तपासा आणि मेंटेन करत रहा.

५. बॅटरीतून गळती होऊ देऊ नका.

बॅटरीच्या मेंटेनन्स मधील ही सर्वात महत्वाची टीप आहे. बॅटरीतून इलेक्ट्रोलाइट किंवा डिस्टील वॉटरची गळती कधीही होऊ देऊ नका.

जर बॅटरी व्यवस्थित बसवली नसेल किंवा काही कारणाने त्यावर आघात झाला तर अशी गळती होऊ शकते.

गळती होत असल्याचे लक्षात आल्यावर ताबडतोब ती रोखण्यासाठी मेकॅनिक कडे बाईक घेऊन जा. अन्यथा बॅटरी खराब होऊन पूर्णपणे निरुपयोगी होऊ शकते.

ह्या टिप्स शिवाय एकूणच आपली बाईक चांगली ठेवण्यासाठी ती नेहेमी सावलीत आणि शेडखाली उभी करा.

बाईकचे आणि पर्यायाने तिच्या बॅटरीचे वारा, पाऊस, ऊन ह्यापासून संरक्षण करा. त्यामुळे बाईक चा रंग टिकून राहील.

ती गंजणार नाही. आणि जास्त दिवस टिकेल. तर अशा रीतीने आपल्या बाईकचे आणि बाईकच्या बॅटरीचे संरक्षण करा. आणि बाईक चालवण्याचा मनमुराद आनंद घ्या, अर्थातच हेलमेट घालायला विसरू नका. सुरक्षित प्रवास करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.