मुलांच्या उंचीबद्दल पूर्ण माहिती करून घ्या या लेखात

मुलांच्या उंचीबद्दल पूर्ण माहिती

आपल्या मुलांची ऊंची हा पालकांच्या दृष्टीने अगदी संवेदनशील विषय असतो.

मूल जन्माला आल्यापासून ते मोठे होईपर्यंत मुलाची ऊंची, वजन योग्य पद्धतीने वाढत आहे ना हा पालकांचा अगदी काळजीचा विषय असतो.

सहसा सरासरी ऊंची आणि वजन वाढीचे तक्ते दिलेले असतात त्यावरून पालक मुलांची वाढ योग्य रीतीने होत आहे ना हे पाहू शकतात.

जर काही त्रुटि आढळली तर डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतात. परंतु ह्या तक्यात दिल्याप्रमाणे जर आपल्या मुलाची ऊंची/वजन वाढत नसेल तर काहीवेळा पालक काळजीत पडतात आणि खूप अस्वस्थ होतात.

म्हणून आज आपण मुलांच्या उंचीबाबतची काही तथ्य जाणून घेऊया.

१. वजन उंचीचा तक्ता

हा तक्ता सर्वसाधारण मुलांच्या वाढीचे (ऊंची/वजन) वयानुसार टप्पे दर्शवतो.
वय मुलगा मुलगी

जन्माच्या वेळी,  मुलाची उंची ४९.५ सेमी आणि वजन ३.३ किलोग्रॅम असावे तर मुलीची उंची ४९.२ सेमी आणि वजन ३.३ किलोग्रॅम असावे.

वय १ वर्ष असताना मुलाची उंची ७५.७ सेमी आणि वजन ९.६ किलोग्रॅम असावे तर मुलीची उंची ७४.१ सेमी आणि वजन ९.२ किलोग्रॅम असावे.

वय ५ वर्ष असताना मुलाची उंची १०९.२ सेमी आणि वजन १८.४ किलोग्रॅम असावे तर मुलीची उंची १०७.९ सेमी आणि वजन १७.९ किलोग्रॅम असावे.

वय १० वर्ष असताना मुलाची उंची १३८.४ सेमी आणि वजन ३२ किलोग्रॅम असावे तर मुलीची उंची १३८.४ सेमी आणि वजन ३१.९ किलोग्रॅम असावे.

हा तक्ता भारतातील ह्या वयोगटातील मुलांच्या सरासरी वाढीचा अभ्यास करून तयार केला आहे. ह्यावरून पालकांना साधारण अंदाज येऊ शकतो की त्यांचे मूल कसे वाढत आहे.

२. वाढीचे टप्पे 

मुले जेव्हा पौगंडावस्थेत प्रवेश करतात तेव्हा त्यांचे ग्रोथ हॉर्मोन्स वेगाने कार्यरत होतात आणि त्यामुळे वयाच्या ह्या टप्प्यात मुलांची वाढ वेगाने होते. मुलींची पौगंडावस्था वयाच्या १०/११ व्या वर्षी सुरू होते. तर मुलांमध्ये हे वय १५ ते १७ वर्षे असते

३. कमी ऊंची/ बुटकी शरीरयष्टी 

काही मुले वर दिलेल्या तक्त्याच्या प्रमाणात उंच होत नाहीत. त्यांची ऊंची सरासरी पेक्षा कमी असते. वाढीचा वेग कमी असतो.

मुलांच्या शरीरातील पिट्यूटरी ग्रंथी मधून स्त्रवणाऱ्या वाढीच्या हॉर्मोन वर मुलांची वाढ अवलंबून असते.

जर हा ग्रोथ हॉर्मोन कमी प्रमाणात निर्माण झाला तर मूल बुटके होते. सरासरी उंचीच्या ३ ते ५ पर्सेन्टाइल मध्ये असणारी मुले बुटकी समजली जातात.

४. वाढीला होणारा उशीर 

काही मुलांच्या बाबतीत ते योग्य रीतीने वाढत असतात पण गती कमी असते. म्हणजेच बरोबरीच्या मुलांच्या मानाने ही मुले बुटकी दिसतात परंतु त्यांची वाढ होतच नसते असे नाही. फक्त ती कमी गतीने होत असते. अशा प्रकारच्या वाढीला ‘ग्रोथ डिले’ असे म्हणतात. काही औषधांमुळे ही समस्या दूर करता येऊ शकते.

५. कुपोषण 

ऊंची न वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कुपोषण.

शरीराला वाढीला आवश्यक असणारी प्रथिने पुरेशा प्रमाणात न मिळण्यामुळे ऊंची वाढण्यावर परिणाम होतो.

कुपोषणाचे प्रमुख कारण गरीबी हे तर आहेच. पण काही वेळा पालकांचे आहाराविषयीचे अज्ञान आणि मुलांचे पोषक आहार न घेण्याबद्दलचे हट्ट देखील ह्यास कारणीभूत ठरतात.

६. विशिष्ठ आजार 

काही विशिष्ठ आजार हे शरीराची वाढ थांबवतात, तसेच हायपोथायरॉईडझम मुळे देखील मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. हॉर्मोन्सची कमतरता ह्यासाठी कारणीभूत ठरते.

७. उंच मुले 

काही मुले मात्र वयाच्या मानाने किंवा त्यांच्या वयाच्या इतर मुलांच्या मानाने लवकर उंच होतात. उंच दिसतात.

त्याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांच्या शरीरात ग्रोथ हॉर्मोन्स जास्त प्रमाणात तयार होतात. त्यामुळे अशी मुले वाढीचे टप्पे लवकर पार करतात.

त्यांच्या हाडांची लांबी जास्त असते. ती लवकर उंच होतात.

ह्यावरून आपल्याला हे समजते की माणसाची ऊंची ही आनुवंशिक जरी असली तरीही ऊंची वाढण्यासाठी ग्रोथ हॉर्मोन्स देखील महत्वाचे कार्य करतात.

त्यामुळे मुले लहान असतानाच त्यांच्या शरीरात ग्रोथ हॉर्मोन नीट तयार होत आहे ना, ते योग्य प्रकारे काम करत आहे ना हे पाहणे आवश्यक ठरते.

जर पालकांच्या असे लक्षात आले की आपले मूल वाढीच्या बाबतीत मागे पडत आहे तर बालरोगतज्ञांच्या मदतीने पालकांनी मुलाच्या ग्रोथ हॉर्मोन्स निर्मितीबद्दल जरूर तपासणी करून घ्यावी. आणि तज्ञांच्या सल्ल्याने पुढील उपाय करावेत.

१. ग्रोथ हॉर्मोन्स ची कमतरता भरुन काढता येते. ग्रोथ हॉर्मोन्स ची कमतरता सिंथेटीक ग्रोथ हॉर्मोन इंजेक्शन ने कमी करता येऊ शकते.

२. जितक्या लवकर ही कमतरता शोधून त्यावर उपाय केले जातील तितक्या लवकर मुलाची ऊंची वाढून ती नॉर्मल होईल.

३. ग्रोथ हॉर्मोन्स चे इंजेक्शन किंवा सप्लीमेन्ट घेतल्यामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच ह्या ट्रीटमेंटचे इतरही काहीही साइड इफेक्टस होत नाहीत हे सिद्ध झाले आहे.

तर ही आहे मुलांच्या ऊंची बद्दलची शास्त्रीय माहिती. हयाबद्दल नीटपणे जाणून घ्या. कोणत्याही बालकाची ऊंची हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक असते.

त्यामुळे आपल्या मुलांच्या ऊंची विषयी जागरूक रहा. काही शंका असेल तर तज्ञांचा सल्ला घ्या.

उंची वाढण्यासाठी प्रयत्न करताय? वाचा उंची वाढवण्यासाठी काही स्पेशल टिप्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वस्थ रहा. आनंदी रहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.