श्वसनक्रिया सुधारण्यासाठी फुफ्फुसांचे आरोग्य कसे राखावे वाचा या लेखात

श्वसनक्रिया सुधारण्यासाठी फुफ्फुसांचे आरोग्य कसे राखावे कोरोना काळात संक्रमणापासून वाचण्यासाठी

आपली श्वसनक्रिया सुधारणारे, भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स असणारे पदार्थ कोणते ते आपण आज पाहूया.

आपले संपूर्ण शरीर आपल्या श्वासोछ्वासावर चालते. जितकी श्वास घेण्याची प्रक्रिया चांगली तितके शरीराला मिळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण चांगले.

आणि त्या मिळणाऱ्या ऑक्सिजनवर आपले सगळे अवयव कार्यरत असतात. त्यामुळे श्वसनक्रिया उत्तम प्रकारे होत असणे हे शारीरिक दृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी आवश्यक आहे.

श्वसनक्रिया उत्तम होण्यासाठी आपली फुफ्फुसे उत्तम काम करत असली पाहिजेत. या कोरोना काळात संक्रमणापासून वाचण्यासाठी आणि कोविड होऊन पुढचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढवणे गरजेचे आहे.

त्यांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झालेले असू नये. फुफ्फुसांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आणि त्यांना कोणतेही इन्फेक्शन होऊ नये म्हणून भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स असणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत.

त्यामुळे आपल्या शरीराचे श्वसन सुधारते आणि शरीरातील ऑक्सिजनचे सर्क्युलेशन देखील सुधारते.

चला तर मग भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स असणारे पदार्थ कोणते ते आपण पाहूया

१. ग्रीन टी 

एक कप ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स असतात जे आपली श्वसनक्रिया सुधारण्याचे काम करतात.

आपली फुफ्फुसे स्वच्छ करून त्यांचे कार्य सुधारण्याचे मोठे काम अँटिऑक्सिडण्ट्स करतात. कुठल्याही प्रकारची एलर्जि असेल तरीही ग्रीन टी उपयोगी पडतो. आणि गरम पाण्यात ग्रीन टी घेतल्यामुळे घसा देखील मोकळा होऊन श्वसन सुधारते.

२. ढोबळी मिरची / सिमला मिरची 

विटामीन ‘सी’ हा सर्व आजरांशी लढायला मदत करणारा अँटिऑक्सिडण्ट्सचा स्त्रोत आहे हे तर आपण जाणतोच.

पण सिमला मिरची मध्ये मोठ्या प्रमाणात विटामीन ‘सी’ आहे हे मात्र फार कोणाला माहीत नसते. सिमला मिरची खाण्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स मिळतात जे आपल्या फुफ्फुसांना संसर्ग होण्यापासून रोखतात.

तसेच त्यांचे कार्य सुधारण्यास मदत करतात. तसेच ‘क्रोनिक पल्मोनरी डिसीज’ न होण्यास देखील मदत होते.

३. संत्रे 

विटामीन ‘सी’ चा संत्र्याइतका दूसरा सहज उपलब्ध असणारा चांगला स्त्रोत नाही.

दिवसभरात एक संत्रे खाणे हे सहज शक्य असून त्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स मिळतात.

संत्रे नुसते खाता येते किंवा स्मूदी च्या स्वरूपात इतर आणखी पदार्थ जसे की पुदिना, काकडी इत्यादि मिसळून देखील घेता येते.

४. बेरी 

‘ब्लु बेरी’ आणि ‘अकाई बेरी’ ही परदेशी पण आपल्याकडे हल्ली सहजपणे मिळणारी फळे देखील उत्तम प्रकारचे अँटिऑक्सिडण्ट्स शरीराला देतात.

ही फळे अत्यंत पौष्टिक असल्यामुळे त्याचे इतरही फायदे आहेत.

ही फळे देखील स्मूदी करून किंवा सॅलड म्हणून खाता येतात. तसेच दहयाबरोबर देखील छान लागतात. पोषणाबरोबर स्वाद देखील मिळतो.

५. ब्रोकोली 

ही देखील अशी एक परदेशी भाजी आहे जी आता आपल्या देशात सगळीकडे सहजपणे मिळू लागली आहे. ह्या भाजीचे सेवन करण्यामुळे देखील आपली श्वसन क्रिया सुधारते.

विटामीन ‘सी’ भरपूर प्रमाणात असणारी ब्रोकोली फुफ्फुसांसाठी अत्यंत गुणकारी आहे. ह्याने कॅन्सरला देखील प्रतिबंध होऊ शकतो.

६. लाल मिरची 

लाल मिरचीचा प्रमुख घटक हा ‘कॅपसासिन’ असतो. त्यामुळे ही मिरची तिखट असते. फुफ्फुसांच्या म्युकस मेंबरेनचे संरक्षण करण्याचे काम ह्या मिरचीच्या सेवनाने होते.

अप्पर आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅकचे संरक्षण ह्यामुळे होते. लाल मिरचीचा वापर आपण आपल्या रोजच्या जेवणात सहजपणे करू शकतो ज्यामुळे आपल्याला असे अनेक फायदे होतात.

७. आलं 

आलं नियमित सेवन करण्यामुळे आपल्या शरीराची शुद्धता म्हणजेच डिटोक्सिफिकेशन होते.

फुफ्फुसांमध्ये जर काही संसर्ग असेल तर तो दूर होण्यास मदत होते. तसेच शरीराचे रक्ताभिसरण देखील सुधारते ज्यामुळे श्वासावाटे घेतलेला ऑक्सिजन शरीरभर पसरण्यास मदत होते.

८. लसूण 

लसणामध्ये शरीरातील अशुद्ध पदार्थ म्हणजेच टॉक्सिन्स आणि इतर कॅन्सर होऊ शकणारे पदार्थ बाहेर टाकण्याची शक्ति असते.

त्यामुळे लसूण नियमित सेवन करण्यामुळे आपले शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

टॉक्सिन्स कमी झाल्यामुळे आपल्या शरीराचे कार्य सुधारते आणि श्वसन क्रिया देखील सुधारते. लसूण आपल्या रोजच्या जेवणात वापरण्यास अत्यंत सोपा आणि जेवण रुचकर बनवणारा आहे.

९. हळद 

हळद ही भारतीय जेवणाचा प्रमुख घटक आहे. हळद मुलतःच रोगप्रतिकारक गुणधर्म असणारी असते.

हळदीच्या नियमित सेवनाने इतर फायद्यांबरोबरच छातीतील कफ कमी होण्यास मदत होते. तसेच रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत होते.

गरम दुधातून हळद घेणे हे छातीच्या विकारांवर अत्यंत गुणकारी आहे.

तर आज आपण असे ९ खाद्यपदार्थ पाहिले जे आपल्या शरीरातील अशुद्धी दूर करतात आणि आपल्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढून तो सर्व अवयवांना नीट पुरवला जाईल ह्यासाठी मदत करतात.

आपली श्वसन क्रिया सुधारतात. ह्या पदार्थांचे नियमित सेवन करून ह्या फायद्यांचा लाभ घ्या.

स्वस्थ रहा. आनंदी रहा.

रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढवण्याचे हमखास उपाय वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!