त्वचेचे सौंदर्य आणि तारुण्य वाढवणारे १५ पदार्थ

ब्युटी टिप्स नितळ त्वचेसाठी खास टिप्स चेहरा गोरा होण्यासाठी घरगुती उपाय Tips for glowing skin in Marathi

आपल्या त्वचेचे आरोग्य आपण काय खातो ह्यावर अवलंबून असते.

भरपूर अँटिऑक्सिडण्ट्स असणारे पदार्थ, पौष्टिक आणि भरपूर प्रमाणात पाणी असणारे पदार्थ खाल्ल्यामुळे आपली त्वचा नितळ आणि तेजस्वी बनते.

त्वचेचा रंग कोणताही असला तरी स्वच्छ, नितळ, तेजस्वी आणि निरोगी त्वचा असणे जास्त महत्वाचे आहे.

बाजारात मिळणाऱ्या असंख्य क्रीम्स आणि लोशनचा वापर मात्र तात्कालिक असतो. कायमस्वरूपी त्वचा चांगली हवी असेल तर चांगले पौष्टिक खाणे आवश्यक आहे.

पूर्वापार चालत आलेल्या पद्धती त्वचेच्या आरोग्याच्या बाबतीत लाभदायक ठरतात.

त्वचेचे आरोग्य बिघडण्याची काही कारणे आहेत. त्वचा शरीराच्या वयापेक्षा म्हातारी बनते (अेजिंग) त्यामागे काही विशिष्ट कारणे असतात. ती कारणे कोणती ते पाहूया.

  • त्वचा अकाली म्हातारी होण्यासाठी हल्लीच्या तरुणांची बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे.
  • अतिप्रमाणात मद्यपान करणे
  • धूम्रपान करणे
  • निकृष्ट दर्जाचे अन्न सेवन करणे
  • व्यायामाचा अभाव
  • जंक फूड चा मुबलक वापर
  • अति ताण तणाव
  • प्रदूषण

त्वचेचे आरोग्य बिघडण्याची ही काही प्रमुख कारणे आहेत. परंतु त्यावर मात करणे शक्य आहे.

त्यासाठी हल्लीची आधुनिक क्रीम वापरण्यापेक्षा खालील दिलेले पदार्थ आहारात असू देणे हे केव्हाही जास्त सोपे, सुरक्षित आणि भरवश्याचे आहे.

१. पालक– दररोज पालक खाणे हे अत्यंत गुणकारी आहे. पालक खाण्यामुळे पचनशक्ति सुधारते, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते.

तसेच पालकात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स असतात ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ति वाढते.

पण सर्वात महत्वाचे म्हणजे पालकात विटामीन सी असते ज्यामुळे त्वचेतील कोलाजेनचे प्रमाण वाढते आणि आपली त्वचा नितळ आणि तेजस्वी होते.

२. अवाकाडो – अवाकाडो ज्यालाच भारतामध्ये ‘बटर फ्रूट’ असे म्हटले जाते ते प्रामुख्याने मधुमेहाचा इलाज आणि वजन कमी करण्यासाठी म्हणून खाल्ले जाते.

बटर फ्रूट मुळे रक्तदाब देखील नियमित होतो आणि पचनशक्ति देखील सुधारते.

पण सर्वात महत्वाचे म्हणजे अवाकाडो मध्ये भरपूर प्रमाणात विटामीन ‘ए’ असते ज्यामुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

त्यामुळे अवाकाडोचा जूस नियमित पिण्यामुळे आपले शरीर आपली त्वचा जास्त दिवस तरुण राहू शकते.

३. डाळिंब – डाळिंबामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटी ऑक्सिडंट्स असतात आणि विटामीन सी असते. त्यामुळे त्वचेचे कोलाजेन सांभाळले जाते, वाढवले जाते आणि त्वचा तरुण, निरोगी राहण्यास मदत होते.

४. सुकामेवा – सर्व प्रकारचा सुकामेवा खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात विटामीन ‘बी[ मिळते ज्यामुळे त्वचा निरोगी राहून त्वचेवर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते.

सुका मेव्यापैकी बदामामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन ‘ई’ असते ज्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहते. तसेच अक्रोड मध्ये असलेल्या ओमेगा ३ फॅटी असिड मुळे त्वचेला एक नैसर्गिक झळाळी मिळते.

५. ब्रोकोली – ब्रोकोली मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स असतात त्यामुळे आपली त्वचा जास्त दिवस तरुण राहण्यास मदत होते.

रोज एकावेळी तरी ब्रोकोली खाल्ल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येणे, पिंपल्स येणे आणि त्वचा काळवंडणे कमी होण्यास मदत होते.

६. पपई – पपई मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स, विटामीन आणि मिनरल असतात. पपईच्या नियमित सेवनाने आपली त्वचा जास्त लवचिक होते तसेच त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेघा कमी होण्यास मदत होते.

७. लाल रंगाची भोपळी मिरची – भोपळी मिरची एकूणच आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असते परंतु त्यातही लाल रंगाची भोपळी मिरची त्वचेसाठी जास्त गुणकारी असते.

तिच्यात असलेल्या गुणधर्मामुळे त्वचेचे टॅनींग कमी होते तसेच इतर प्रकारच्या टॉक्सिन पासून देखील त्वचेचे रक्षण होते.

८. वॉटरक्रेस – वॉटरक्रेस ही कोबी सारखी असणारी हिरवी भाजी देखील त्वचेसाठी खूप उपयुक्त असते.

त्यात असणारे विटामीन आणि मिनरल त्वचेचे आरोग्य सुधारतात. तसेच सुरकुत्या आणि रेषा कमी करतात.

९. ब्लु बेरीज – ब्लु बेरीज मध्ये देखील भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स आणि विटामीन असल्यामुळे त्वचेच्या आरोग्यासाठी ब्लु बेरीज फार उपयुक्त आहेत.

१०. रताळे – रताळ्यामध्ये बिटा कारोटीन नावाचे अत्यंत गुणकारी अँटिऑक्सिडण्ट्स असते. ह्यामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. तसेच त्वचा मृदु, मुलायम होते.

११. अननस – अननसा मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडण्ट्स, ब्रोमिलेन आणि विटामीन सी असते. त्यामुळे त्वचा मुलायम बनते तसेच कोणत्याही प्रकारच्या इन्फेक्शन पासून त्वचेचे रक्षण होते.

१२. डार्क चॉकलेट – डार्क चॉकलेट मुळे त्वचेचे ‘यू व्ही रेज’ पासून रक्षण होते, त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचा अधिक तरुण बनते.

१३. लिंबाचा रस- पाण्यातून लिंबाचा रस घेणे हे पिंपल्स आणि त्वचेच्या इतर समस्यांवरचे रामबाण औषध आहे. सकाळी कोमट पाण्यात लिंबुरस मिसळून ते प्यायल्यामुळे त्वचा तेजस्वी, डाग विरहित आणि चिरतरुण बनते.

१४. कलिंगड – कालिंगडात विटामीन ए , विटामीन बी ६ आणि विटामीन सी असते. त्यामुळे आपली त्वचा अधिक हेल्दी बनते.

१५. दही – दहया मध्ये असणारे चांगले बॅक्टेरिया हे आपल्या शरीराबरोबरच आपल्या त्वचेचेही आरोग्य सुधारतात. पिंपल्स येणे कमी होते. तसेच आधी आलेल्या पिंपल्स च्या खुणा कमी करण्यासाठी देखील ह्याचा उपयोग होतो.

तर हे आहेत असे १५ पदार्थ ज्यामुळे आपल्या त्वचेचे आरोग्य टिकून राहते. आपली त्वचा चिरतरुण होण्यास मदत होते. ह्या पदार्थांचे सेवन जरूर करा आणि सुंदर, चिरतरुण राहा.

स्वस्थ रहा आनंदी रहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.