मेकअप करण्याची कला आता तुम्हालाही जमेल…

‘मी सुंदर दिसावं’ असं प्रत्येकालाच वाटतं. मग स्त्री असो किंवा पुरूष.

या इच्छेला वयाचंही बंधन नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना सुंदर दिसायला आवडतं.

त्यात वावगं काहीच नाही. काही जणांना सुंदर दिसणं ही दैवी देणगी लाभलेली असते.

हल्ली बाजारात मिळणारी वेगवेगळी सौंदर्य प्रसाधनं आणि आवड यामुळे सुंदर दिसण्याची सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होऊ शकते.

आपल्याला साजेशी सौंदर्य प्रसाधनं वापरून चांगला मेकअप करता येणं ही एक कला आहे. बाजारात एखादं प्रसाधन मिळतंय म्हणून ते वापरण्यापेक्षा ते आपल्याला शोभेल का हे नेमकं लक्षात आलं पाहिजे.

आपली उंची, रंग, बांधा, डोळे, नाक, चेहऱ्याची एकंदर ठेवण, केस या सगळ्याचा विचार करून कोणती प्रसाधनं कशी वापरावी हे समजलं पाहिजे.

नेमका कोणत्या कारणासाठी मेकअप करायचा आहे, ही बाबही महत्वाची ठरते. मेकअप करून आरशात पाहिल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढायला हवा.

म्हणून या लेखात आपण पाहणार आहोत की, टप्प्याटप्प्याने कोणती सौंदर्य प्रसाधन वापरून कसा मेकअप करावा, अनावश्यक वाटणारी कोणती प्रसाधनं टाळावीत जेणेकरून मेकअपमुळे आपलं सौंदर्य आणखी खुलेल.

A. त्वचेची पूर्वतयारी

मेकअप हा त्वचेवर केला जातो. त्यामुळे कोणताही मेकअप करण्यापूर्वी त्वचेची तयारी केली पाहिजे.

त्वचेवर असलेले व्रण, डाग, मुरूमं, पुटकुळ्या यामुळे मेकअप करायला अडथळे येतात.

चांगली प्रसाधनं वापरूनही चेहऱ्यावर मेकअपचे नुसतेच थर दिसतात.

यासाठी त्वचेला योग्य असणारी चांगली क्रिम, पावडर, लोशन वापरून त्वचा चांगली तयार करायला हवी.

महागडी प्रसाधनं वापरूनच त्वचा नीटनेटकी करता येते असं नाही तर वय आणि त्वचेचा विचार करून योग्य प्रसाधन वापरून त्वचेची पूर्वतयारी करता येते.

१. चेहऱ्याची स्वच्छता

चेहऱ्याची त्वचा स्वच्छ नसेल तर मेकअप अजिबात टिकत नाही.

त्यासाठी चांगला क्लिंझर वापरून आधी त्वचा स्वच्छ करावी.

जेल, क्रिम, ऑइल, जेल, क्ले, पावडर अशा वेगवेगळ्या स्वरूपात क्लिंझर मिळतात.

ते चेहऱ्यावर लावण्यासाठी खास कापड किंवा स्पंजही मिळतो.

क्लिंझिंगमुळे चेहऱ्यावरील मळ निघून जातो आणि त्वचा मुलायम, तजेलदार होते.

ओल्या चेहऱ्यावर क्लिंझर लावून चेहरा स्वच्छ धुवून मऊ कापडाने हलकेच पुसावा. त्यामुळे त्वचा मेकअपसाठी तयार होते.

२. स्क्रबिंग

चेहऱ्यावरील खरखरीतपणा जाण्यासाठी आठवड्यातून किमान तीन वेळा नियमितपणे स्क्रबिंग केलं पाहिजे.

चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. म्हणून योग्य असा स्क्रबर वापरावा.

ओल्या चेहऱ्यावर स्क्रबर लावून तो व्यवस्थित पसरवावा.

एकाच दिशेने मसाज करून स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन हलक्या हाताने चेहरा धुऊन घ्यावा.

३. त्वचेची आर्द्रता वाढवणे

एकदा चेहरा स्वच्छ धुऊन स्क्रबिंग करून झाल्यावर त्वचेची आर्द्रता टिकवली पाहिजे.

चेहरा स्वच्छ केल्यावर त्वचेची आर्द्रता पूर्ववत केली की मेकअपसाठी त्वचा चांगली तयार होते.

त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी चांगला मॉईश्चराइझर वापरावा.

कोरफडीचा अर्क असलेला मॉइश्चरायझर केव्हाही उत्तमच असतो.

B. चेहऱ्याचा मेकअप

डोळ्यांचा आणि ओठांचा मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याच्या इतर त्वचेचा मेकअप आधी केला पाहिजे.

तोच खरा मेकअपचा बेस असतो. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आणि शांतपणे हा टप्पा पूर्ण केला पाहिजे.

१. प्रायमर

चेहऱ्यावरील व्रण, सुरकुत्या, पिंपल्स झाकून मेकअपसाठी चांगला बेस तयार करायला प्रायमर वापरावा.

त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेचा रंगही एकसारखा दिसतो.

त्वचा तजेलदार होऊन मेकअप दीर्घकाळ टिकतो. कोरडी त्वचा असल्यास ग्लोईंग प्रायमर तर तेलकट त्वचा असल्यास मॅट फिनिश प्रायमर वापरावा.

नाक, कपाळ आणि आवश्यक ठिकाणी प्रायमर लावावा.

२.कलर करेक्टर

चेहऱ्यावर जर व्रण, सुरकुत्या, मुरूमं, वांग असेल तर रंगीत कन्सिलरचा वापर जरुर केला पाहिजे.

मेकअप केल्यावर जर असे डाग दिसून येणार असतील तर योग्य रंगसंगती वापरून असे डाग झाकता येतात.

लालसर डाग असतील तर हिरवा, पिवळसर डाग असतील तर जांभळा, करड्या रंगाचे डाग असतील तर नारिंगी अशा छटांचे कन्सिलर गरजेप्रमाणे वापरता येतात.

३. कन्सिलरचा वापर

कलर करेक्टर वापरल्यावर त्वचेच्या मूळ रंगापेक्षा थोडा हलक्या रंगाचा कन्सिलर लावावा.

कलर करेक्टर लावलेल्या ठिकाणी आणि जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी कन्सिलर लावावा.

४. फाउंडेशन

मेकअपचा बेस पक्का करण्यासाठी फाउंडेशनची गरज असते.

सध्या बाजारात फाउंडेशनचे वेगवेगळे प्रकार आणि पोत उपलब्ध आहेत.

मॅट फाउंडेशन, सिल्क फाउंडेशन, पावडर फाउंडेशन, स्टिक फाउंडेशन असे फाउंडेशनचे मुख्य प्रकार आहेत.

एखादा चांगला ब्रश आणि ब्युटी ब्लेंडरचा वापर करून फाउंडेशन व्यवस्थित लावता येईल.

५. ब्राँझर, ब्लश, हायलाइटर

चेहऱ्यावर चमक येऊन उठावदार दिसण्यासाठी ब्लश आणि ब्राँझरचा वापर करावा.

त्यावर एखादा हायलाइटर वापरला तर चेहरा आणखी चांगला दिसेल.

हसताना गालांवर जिथे उंचवटा येईल तिथे ब्लश लावावा.

बाकी ठिकाणी हायलाइटर आणि ब्राँझरचा योग्य वापर करावा.

हा सगळा बेस टिकण्यासाठी मेकअप सेटिंग स्प्रे जरूर वापरावा.

C. डोळ्यांचा मेकअप

चेहऱ्याचा बेस आणि मेकअप पूर्ण झाल्यावर डोळ्यांचा मेकअप सुरू करावा.

डोळ्यांचा मेकअप करण्याचेही काही टप्पे असतात. त्याप्रमाणे केल्यास मेकअप केल्यावर जास्त चांगला दिसतो.

१. आयब्रोज

हल्ली बारीक भुवयांपेक्षा जाड भुवया असण्याकडे जास्त कल आहे.

तसेच त्या भुवयांना चांगला आकार असला पाहिजे.

म्हणून आधी भुवयांना आकार देऊन विरळ असलेल्या ठिकाणी पेन्सिलने भुवया नीट भरून घ्याव्या आणि भुवयांना नीट आकार द्यावा. त्यामुळे चेहरा नीटनेटका दिसतो.

२. आयशॅडो

आयशॅडोची वेगवेगळी रंगसंगती वापरून डोळ्यांचा मेकअप करायला भरपूर वाव असतो.

कपड्यांच्या रंगाचा विचार करून आयशॅडोची हवी तशी रंगसंगती वापरता येते.

स्मोकी आय हा सध्याचा ट्रेंड आहे. त्यानुसार गडद आयशॅडो वापरता येतात.

संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी गडद आणि चमकदार आयशॅडो चांगल्या दिसतात.

साधासा मेकअप करायचा असल्यास हलक्या रंगाच्या मॅट आयशॅडो उत्तम ठरतात.

आयशॅडो लावायचेही टप्पे आहेत :

पापण्यांवर हवा असलेला रंग लावायचा, पापण्यांची घडी येईल त्या जागी गडद रंग लावायचा, पापणीच्या मध्यभागी हलका पण चमकदार रंग लावायचा.

३. आयलायनर

आयलायनर लावावा की नाही ते आपण ठरवू शकतो.

पण आयलायनर लावल्यामुळे डोळ्यांना उठावदारपणा येतो.

आय पेन्सिल वापरून डोळ्यांच्या पापण्यांच्या कडा गडद करता येतात.

या कडा हव्या तशा जाड बारीक करता येतात. त्यासाठी लिक्विड आयलायनर वापरला तरी चालतो.

४. मस्करा

डोळ्यांच्या मेकअपचा शेवटचा भाग म्हणजे मस्करा लावणे.

टपोरे डोळे दिसायचे असतील तर मस्करा जरूर लावावा.

डोळ्यांच्या पापण्या बारीक असतील तर त्या जागी थोडी पावडर लावून किंवा डोळ्यांचा प्रायमर लावून मस्करा लावावा.

D. ओठांचा मेकअप

ओठांचा मेकअप सुरू करण्यापूर्वी ओठ व्यवस्थित चोळून पुसून घ्यावे.

त्यावर व्हॅसलिन किंवा तेल लावून टिश्यू पेपरने पुसून घ्यावं.

मग एखादा लीप बाम नीट लावावा. लिपस्टिक लावायला आवडत नसेल तर एखादा रंगीत लिपबाम किंवा लिपग्लॉस लावावा.

ओठांचा साधासा मेकअप म्हणून इतकंही पुरेसं असतं.

१. लिपलायनर

ओठांचा मेकअप करताना आधी लिप पेन्सिलने लिपलाइन काढून घ्यावी.

त्यामुळे लिप कलर नेमका किती पसरवावा ते लक्षात येतं.

लिपस्टिकच्या रंगाची किंवा त्यापेक्षा हलक्या रंगाची लिप पेन्सिल वापरावी.

लिप लायनरमुळे ओठांचा जाड बारीकपणा किती असावा हे ठरवता येतं.

२. लिपस्टिक

लिपलायनरच्या आतल्या भागात लिपस्टिक व्यवस्थित पसरवावी.

मॅट, क्रिमी आणि ग्लॉसी अशा तीन प्रकारात लिपस्टिक मिळते.

त्यापैकी आपल्याला जी योग्य वाटेल ती आपण निवडू शकतो. त्यावर एखादा लिपग्लॉस लावल्यास ओठ चमकदार दिसतात.

E. मेकअप तयार करणं आणि उतरवणं

मेकअप करण्याइतकेच तो उतरवणे हेही महत्त्वाचे असते.

१. मेकअप उतरवणं

मेकअप चेहऱ्यावर तसाच ठेवून कधीही झोपू नये. आधी मेकअप नीट काढून, चेहरा स्वच्छ धुवून, एखादं नाइट क्रिम लावावं.

मेकअप झटपट उतरवण्यासाठी मेकअप रिमूविंग वाईप्स वापराव्या.

अशा प्रकारे मेकअप केल्यावर आणि उतरवल्यानंतर चेहरा ताजातवाना वाटेल यात शंका नाही.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय