लॉकडाऊनमध्ये ह्या टिप्स वापरुन करा आर्थिक नियोजन

लॉकडाऊनमध्ये ह्या टिप्स वापरुन करा आर्थिक नियोजन लॉकडाऊनसाठी आर्थिक नियोजन

सध्याचा काळ हा सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत अस्थिर काळ बनला आहे. कोविड रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारला लॉकडाऊन करणे भाग पडत आहे आणि त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर होणार आहे.

नोकरदार व्यक्ति असो अथवा व्यावसायिक सर्वांनाच ह्या लॉकडाऊनची झळ पोहोचणार आहे आणि व्यवसायात मंदी किंवा नोकरीत पगार कपात सुद्धा सहन करावी लागण्याची शक्यता आहे.

परंतु ह्यामुळे निराश न होता उलट आपण सर्वांनी हा लॉकडाऊनचा काळ आपला आर्थिक आढावा घेण्यासाठी वापरला तर….

इतर वेळी आर्थिक नियोजन करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही.

ते आर्थिक नियोजन आपण आत्ता करू शकतोच की! वेळ पण चांगला जाईल आणि एक महत्त्वाचे काम पण होईल.

आज आपण पाहूया की या काळात आपल्याला आपला आर्थिक आढावा घेऊन नियोजन कसे करता येईल.

ह्या आहेत काही टिप्स.

१. सर्वप्रथम तुमच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्या 

सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तुमच्या जवळ असणाऱ्या रकमेचा आणि तुम्हाला दर महिन्याला मिळत असणाऱ्या उत्पन्नाचा आढावा घ्या.

तुमच्याजवळ नक्की किती रक्कम शिल्लक आहे हे तपासा.

तसेच तुमचा दरमहा होणारा घरखर्च, भरावी लागणारी बिले तसेच कुटुंबातील कोणालाही काही आजारपण आले तर होऊ शकणारा खर्च ह्या सगळ्याची मांडणी करा.

तितके पैसे तुमच्याजवळ आहेत किंवा नियमितपणे तुम्हाला मिळणार आहेत ह्याची खात्री करून घ्या.

तुम्ही करत असलेल्या बचतीचा योग्य परतावा तुम्हाला मिळत आहे ना ह्याची देखील खात्री करून घ्या.

जर तुम्हाला असे आढळले की तुमची आर्थिक स्थिति नाजुक झाली आहे तर खर्च कमी कसे करता येतील ह्याचा विचार करा.

२. खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा

पुढची स्टेप म्हणजे तुमच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे महिन्याच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करा.

महिन्याचे आणि त्यानुसार संपूर्ण वर्षाचे अंदाजपत्रक तयार करून त्याप्रमाणेच खर्च होतोय ह्याची वेळोवेळी खात्री करून घ्या. अवास्तव खर्च टाळा.

३. तुमच्यावर असेलली देणी किंवा कर्जे वेळेत फेडा 

लॉकडाऊनमुळे जरी उत्पन्न कमी झाले असले तरी अनेक लोकांचे गृहकर्ज किंवा इतर कुठल्याही कर्जाचे हप्ते चालू असतात.

सध्याच्या काळात हप्ते भरण्याचा प्रयत्न करा, जर तुम्हाला हप्ते भरण्यात अडचण येत असेल तर तसे तुम्हाला कर्ज देणाऱ्या बँकेला कळवून बँकेकडून मुदत मागून घ्या.

परंतु कोणत्याही परिस्थितीत तुमचे नाव हप्ते थकवणाऱ्यांच्या यादीत येऊ देऊ नका.

कारण त्यामुळे तुमची मार्केटमधील पत कमी होते.

तुम्हाला मिळणाऱ्या क्रेडिट रकमेवर आणि पुढे मिळू शकणाऱ्या कर्जावर ह्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

४. असलेले पैसे योग्य ठिकाणी गुंतवा

भविष्याची तरतूद आपण सगळेच करत असतो. त्यामुळे जवळ असणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम शिल्लक टाकणे हे अत्यंत आवश्यक आहे.

परंतु जास्त परतावा मिळेल ह्या आशेने जोखीम असणाऱ्या ठिकाणी पैसे गुंतवू नका.

तुमचे पैसे सुरक्षित राहून योग्य प्रमाणात परतावा मिळेल अशा ठिकाणीच ते गुंतवा.

गुंतवणूक करताना गुंतवणुकीचा कालावधी, मिळणारा परतावा आणि भरावा लागणारा कर ह्या सर्वांचा विचार अवश्य करा.

आम्हाला सध्या बऱ्याच लोकांचे मेसेजेस येत आहेत की, तुम्ही स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंगची माहिती देणारा ग्रुप, या पेजसाठी तयार करा.

हा लॉकडाऊन आणि यापासून येणारे संकट, किती दिवस चालेल याबद्दल आता लोकांमध्ये चलबिचल सूरु झालेली आहे. त्यामुळे उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधण्याकडे लोकांचा कल आहे, आणि ते बरोबरच आहे…

अशा वेळी स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्याची सुरुवात करणाऱ्या लोकांनी काही गोष्टींची नीट काळजी घेतली पाहिजे. जरी लॉकडाऊन मध्ये खाली गेलेल्या भावात स्टॉक्स खरेदी करणे ही एक संधी असणार आहे, (जशी मागच्या लॉकडाऊनमध्ये होती, आणि त्या शेअर्सने पुढे चांगला परतावा दिला)

तरीही स्टॉक मार्केटमध्ये नवीन शिरणारा माणूस पेनी स्टॉक्स मध्ये पैसे गुंतवण्याची चूक बरेचदा करतो, ती चूक न करता चांगले परफॉर्मन्स देणाऱ्या कम्पन्यांचे स्टॉक्स डीप मध्ये म्हणजे खालच्या भावात खरेदी करत जा.

५. योग्य तो जीवन विमा, आरोग्य विमा घ्या 

विमा निवडताना हे लक्षात ठेवले पाहिजे की विम्याचा प्रमुख उद्देश हा काही अघटित घडले तर कुटुंबीयांना मदत मिळावी हा असतो.

त्यामुळे योग्य तो जीवन विमा आणि सर्व कुटुंबाला कव्हर करेल असा चांगला आरोग्य विमा जरूर घ्या.

काही विमा कंपन्या विम्याची रक्कम गुंतवून त्यावर परतावा देण्याचा दावा करतात. (ULIP)

परंतु अशा स्कीम्सचा नीट अभ्यास करून मगच त्यांची निवड करावी.

मुख्यत्वे पुढे येऊ शकणाऱ्या आजारपणाचा खर्च भागवता येईल असा आरोग्य विमा हवा.

६. इमर्जन्सीसाठी काही रक्कम नेहेमी हाताशी ठेवा 

सध्याच्या काळात इमर्जन्सिचा अर्थ आपल्याला वेगळा सांगायला नको.

अचानक नोकरी जाणे असो किंवा अचानक उद्भवणारे आजारपण असो, अशी वेळ कोणावरही येऊ शकते.

अशा वेळी आपला किमान खर्च भागू शकेल इतकी रक्कम आपल्याकडे नेहेमी तयार असावी.

तशी रक्कम सुरुवातीपासून बाजूला काढून वेगळी सेव्ह करून ठेवावी म्हणजे अचानक उद्भवलेल्या संकटात आपल्यावर कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही.

सहसा ही रक्कम आपल्या दरमहा होणाऱ्या खर्चाच्या तिप्पट असावी असे तज्ञ सांगतात.

तसेच ही रक्कम अशा ठिकाणी ठेवावी की जिथून ती लगेच काढून वापरता येईल उदा. बँकेतील फिक्स्ड डिपॉजिट, लॉक इन पिरीयड असणाऱ्या योजनांमध्ये अशी रक्कम गुंतवू नये.

तसेच फार जोखीम असणाऱ्या योजनेत देखील ही रक्कम गुंतवू नये.

तर ह्या टिप्स वापरुन आपण सध्याच्या पॅनडेमीक आणि लॉकडाऊनच्या काळात आपले आर्थिक नियोजन करू शकतो.

उत्पन्न कमी झाले असले तरी त्यातूनही बचत करून आपले भविष्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.

तर मित्रमैत्रिणीनो सध्याच्या परिस्थितीत हवालदिल होऊ नका. आपला जीव आणि जवळ असणारा पैसा सुरक्षित ठेवा. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. Poonam Nikhil Avasarkar says:

    फार महत्वाचे मुद्दे मांडले आहेत आपण यात..एक request ahe kharch kami karne it’s okk..but ज्याच्याकडे काहीच saving nasel tyasathi kay upay ahe…..ani dusra म्हणजे medicine var honara kharch sadhya kharch आवक्याबाहेर जात आहे..त्यामुळे मी तरी पर्यायी निवड generic medicines chi keli ahe…apan Generic medicines ani he normal costly medicine var ek prakash टाकणारा लेख सादर करावा ही विनंती….लिखाण थोडे मराठी आणि इंग्लिश झाले त्यासाठी क्षमस्व

  2. moupeby says:

    What are medical practices going to do cialis generic reviews

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!