पी पी ई किट, मास्क, फेसशिल्ड आणि शुभमंगल…. सावधान!!

‘देव तारी त्याला कोण मारी’ खरीच आहे ही म्हण….

कोरोनाच्या पहिल्या लाटेतून जग अजून सावरत होतं तोवर दुसरी लाट काय आली आणि पुन्हा सारं जग स्तब्ध झालं.

कोरोनाचा विळखाच इतका घट्ट होतोय की आपण ठरवावं एक आणि भलतच काहीतरी अनपेक्षित घडावं.

मध्यंतरी लस बाजारात आली आणि सगळ्यांच्याच आशा दुणावल्या. असं वाटणं स्वाभाविक आहे म्हणा….

लस फक्त बाजारात आली आहे, ती आपल्याला मिळायला अजून वेळ लागणार आहे याचं भानच कित्येकांना राहिलं नाही.

सॅनिटायझर, मास्क वापरणं काही लोकांनी हळूहळू कमी केलं. सोशल डिस्टंसिंगचा तर फज्जाच उडाला. ‘माझा फिटनेस एकदम चांगला आहे, मला काही कोरोना वगैरे होणार नाही’ असाच सगळ्यांचा अविर्भाव.

म्हणतात ना अति तिथे माती. कोरोनाने पुन्हा एकदा आपला डाव साधला. होत्याचं नव्हतं करायला सुरुवात केली.

पुन्हा लॉकडाउन, कित्येकांच्या नोकरीवर गदा, कित्येकांच्या रोजंदारीचा प्रश्न, घरगुती साधासा पण महत्वाचा कुठला कार्यक्रम करायचा तर कडक निर्बंध पाळायचे.

त्यातच या लाटेची तीव्रता एवढी की बघता बघता पेशंट दुप्पट-तिप्पट झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी साधनंच कमी पडली आणि सारी व्यवस्था कोलमडली.

बातम्यात दिसणारे कोरोनाग्रस्त आणि मृत्युचे आकडे तर घाबरवतातच. अंत्यसंस्काराला जागा नाही म्हणून बाजूला पडलेले शवांचे खच मन विषण्ण करतात.

सगळीकडेच असा अंधार असताना काहींची सकारात्मक दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र अजून टिकून आहे.

खरंतर अशीच माणसं आजूबाजूच्या माणसांनाही प्रेरणा देण्याचं काम करतात. ही प्रेरणा फक्त शब्दांनी नाही तर स्वतःच्या कृतीतून देतात.

तेव्हा कुठे असा आशावाद निर्माण होतोय की थोडा संयम ठेवला, थोडे नियम पाळले तर आपण नक्कीच या परिस्थितीतून बाहेर पडू.

कोणी आर्थिक मदत केली, कोणी आपल्या इमारती दिल्या, कोणी अन्न पुरवठा केला. अशी नाना रुपातील मदत.

अशातच एक अजबगजब घटना घडली ती मध्य प्रदेशातील एका छोट्या गावात. अचानक वाढलेला कोरोना, कडक लॉकडाऊन लागलेलं.

पण त्याआधीच एका घरी शुभमंगल ठरलेलं. तरीही सरकारनं परवानगी दिली की २५ माणसं घेऊन कार्य उरका. थोडक्यातच लग्न व्हायचं म्हणून तयारी सुरू झाली.

बघता बघता झालं असं की नवरा मुलगा कोरोनाबाधीत झाला. हॉस्पिटलमधे भरती करावं लागलं.

लग्नाची तारीख समोर उभी ठाकलेली आणि नवरा मुलगा घरात नाही. त्याच्या तब्येतीच्या काळजीनं सगळ्यांच्या जीवाला घोर लागलेला.

काय करावं कोणाला काही सुचेना. अशात बिचाऱ्या नवरी मुलीची आणि तिच्या घरच्यांची काय अवस्था झाली असेल ते वेगळं सांगायला नको.

पण वधू वराची आणि त्यांच्या घरच्यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती. काहीही झालं तरी ठरलेल्या मुहूर्तावर लग्न व्हायचच होतं.

सगळ्यांनीच अचाट प्रयत्न सुरू केले. शासकीय अधिकारी, डॉक्टर, आजूबाजूचे लोक सगळ्यांना विश्वासात घेतलं. सर्वतोपरी काळजी घेऊ, कोणालाही त्रास होऊ देणार नाही याची हमी दिली.

मग काय नवरी मुलगी मेंदी काढून, चुडा भरून, हळद लावून तयार झाली. ठरवलेल्या नियमानुसार नवरा मुलगा आला.

त्याच्याबरोबर वऱ्हाडी कोण तर अधिकारी आणि डॉक्टरांचा फौजफाटा.

पी पी ई किट, मास्क, फेसशिल्ड अशा वेगळ्याच आभूषणांनी वधूवर सजले. सोशल डिस्टंसिंग पाळत सप्तपदी झाली. वधूच्या गळ्यात ठरल्या मुहूर्तावर मंगळसूत्र घातलं. अशाप्रकारे ठरलेलं लग्न निर्विघ्न पार पडलं.

ना कुठला डामडौल, ना पैशाची उधळपट्टी, ना रुसवेफुगवे पण नात्यांची वीण मात्र घट्ट झाली. इच्छाशक्ती, दृढ विश्वास, सहकार्य या पलीकडे अजून काय हवं असतं नातं टिकवायला.

परिस्थिती कितीही कठीण असो आत्मविश्वास, जबाबदारीचं भान, सहकार्य भावना ही असलीच पाहिजे. माणूसकी म्हणजे काय ते याहून वेगळं तरी काय सांगणार…

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय