स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करू पाहणाऱ्यांसाठी ६ टिप्स

karodpati bannyasathi kay krave swthacha vyavsay ksa surukrava

आपल्यापैकी बहुतेकांना ९ ते ५ असं वेळेचं बंधन असणारी आणि डोक्यावर बॉस नावाची टांगती तलवार आवडत नाही.

आणि याचमुळे कित्येक जणांचं स्वतःचा व्यवसाय करण्याचं आणि त्यात भरपूर नफा कमवून कोट्याधीश होण्याचं स्वप्न असतं.

तरीही पैसा हेच सगळं काही नसतं असं, आपल्या पारंपरिक मानसिकतेने आपल्याला कितीही ओरडून सांगितलं तरी, समोरचे कित्येक प्रश्न हे पैशाने सुटू शकतील याबद्दल कोणाचेही दुमत असणार नाही.

परंतु फक्त स्वप्न पाहून काही होत नाही. त्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात आणि तेही योग्य दिशेने.

आपल्या अवतीभवती दोन प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे श्रीमंत व्यावसायिकांच्या लाइफस्टाईलकडे आकर्षित होऊन तसे बनायची स्वप्नं पाहणारे आणि दुसरे खरंच तशी स्वप्नं पाहून ती पूर्ण होण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणारे.

आज आपण अशाच काही टिप्स बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यवसायात १०० टक्के यशस्वी होऊन पाहिलेल्या स्वप्नांच्या दिशेने उंच भरारी घेऊ शकाल.

१)  स्वप्न पहा, पण डोळसपणे!

सर्वप्रथम आपण कशासाठी हा व्यवसाय सुरु करतोय ह्याचा मनाशी नीट विचार करा.

आपण करत असलेली सुरुवात, आपली परिस्थिति, आजूबाजूची परिस्थिति, आपल्या व्यवसायात असलेली स्पर्धा ह्या सगळ्याचा अगदी सखोल अभ्यास करून मग पाऊल पुढे टाका.

आपण आपला व्यवसाय पुढे कोणकोणत्या टप्प्यांवर कसा वाढवत नेऊ शकू ह्याचा अभ्यास सूरवातीपासून करून ठेवा.

थोडक्यात काय तर पूर्ण होमवर्क करूनच ह्यात पूर्ण तयारीनिशी उतरा.

२. आपल्याला आवडेल अशाच व्यवसायाची निवड करा

कोणता व्यवसाय करायचा हे ठरवताना आपल्याला आवडेल अशाच कामाची व्यवसाय म्हणून निवड करा.

जर काम आवडीचे असेल तर माणूस ते जोमाने करतो.

marathi-prernadayi-vichar

अशा आवडीच्या कामाचा कधीही कंटाळा येत नाही.

काम आवडते असेल तर त्यात निरनिराळे प्रयोग करून पहायची उर्मी वाढते.

सहाजिकच यशस्वी होण्याची शक्यता देखील खूप वाढते.

त्यामुळे यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवडीच्या कामाची निवड करा.

जे करताय ते आवडून घेण्यापेक्षा आवडत्या कामात करियर करण्याची अष्टसूत्री! वाचण्यासाठी येथे क्लिक करा

३. समस्या येणारच, त्यावर मात कशी करायची ह्याचा विचार करा

व्यवसाय, उद्योग म्हणले की समस्या ह्या येणारच.

पण यशस्वी उद्योजक तोच ठरतो जो समस्यांचा बाऊ न करता त्यावरचे उपाय शोधू लागतो.

अनेक जण व्यवसायात येणाऱ्या समस्यांना घाबरून व्यवसाय बंद करून टाकतात.

परंतु असे न करता येणाऱ्या समस्यांचा आधीपासून विचार करून त्यावर काही ना काही तोडगा काढणे जास्त महत्वाचे आहे.

असे करणारे अर्थातच यशस्वी आणि भरपूर नफा कमवणारे उद्योजक ठरतात.

४. स्वतःमध्ये नेतृत्वगुण आणा 

व्यवसायात सतत स्वतःला सिद्ध करावे लागते. एकदा यशस्वी झाले की बास, असे करून चालत नाही.

सतत पुढच्या पायरीवर चढण्याचा विचार करावा लागतो.

हाताखालच्या लोकांना सतत चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे लागते.

त्यासाठी तुमच्यातील नेतृत्वगुण, निर्णय घेण्याची क्षमता, कामाचा झपाटा हे सगळे सतत वाढते असले पाहिजे.

त्यासाठी सतत कार्यरत रहा. स्वतःमध्ये सकारात्मक बदल करा.

इंग्रजीत ज्याला “बी ऑन यॉर टोज” म्हणतात तसे रहा. म्हणजे आपोआपच यशाचा मार्ग खुला राहील.

५. सतत व्यवसाय वृद्धीचा विचार करा

जे नावाजलेले यशस्वी उद्योजक आहेत ते नेहेमी आपला व्यवसाय कसा वाढवता येईल ह्याचा विचार करत असतात.

मिळालेल्या यशाने हुरळून न जाता सतत पुढचा आणखी काय करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे.

त्यामुळे आपल्या व्यवसायात सतत वाढ होऊन नफा तर वाढतोच पण इतरही लोकांना त्यापासून प्रेरणा मिळते.

६. नेहेमी सकारात्मक दृष्टिकोण ठेवा 

यशस्वी उद्योगपति किंवा व्यावसायिक व्हायचे असेल तर आधी मोठे विचार करण्याची सवय लावून घ्या.

एखादा कसलेला उद्योजक जसा विचार करेल तसा विचार करण्याची सवय हळूहळू आपल्या अंगी भिनवा. यासाठी आपल्या कामाची, व्यवसायाची सखोल माहिती मिळवा, चौफेर अभ्यास करा.

त्यासाठी कधी तुमच्या समोर येणाऱ्या समस्या किंवा व्यावसायिक नुकसान, तोटा ह्यांकडे देखील एक सुधारणेची संधि म्हणून बघायला शिका. त्यासाठी सतत प्रयत्न करा.

तर ह्या आहेत नवउद्योजकांसाठी काही टिप्स. ह्यांचा वापर करून आपण आपल्या व्यवसायात यशस्वी होऊन भरपूर नफा कमावण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.