काविळची लक्षणे, कारणे आणि घरगुती उपाय वाचा या लेखात

पाणी दूषित असेल, खाण्यापिण्याच्या सवयी बिघडल्या असतील तर पोटाचे आजार होण्याची शक्यता वाढते.

पोट दुखणं, उलटी, जुलाब होणं हे सामान्य आजार होऊ शकतात.

त्यापुढे जर काही त्रास होत असेल तर प्रकरण कावीळ होण्यापर्यंत जाऊ शकतं.

कावीळीसारखा आजार त्रासदायक कसा असतो आणि त्यावरचे घरगुती उपाय कोणते ते या लेखात जाणून घेऊ…

कावीळ म्हणजे काय??

प्रत्येक माणसाच्या शरीरात लिव्हरमधे बिलरुबिन (bilirubin) नावाचं एक द्रव्य तयार होत असतं.

त्याचं एक सामान्य प्रमाण ठरलेलं असतं. हे प्रमाण जर वाढलं आणि बिलरूबिन शरीरभर पसरायला लागलं तर डोळे, नखं, त्वचा पिवळसर दिसू लागते.

यालाच कावीळ होणं असं म्हणतात. वेळेवर उपचार करून बिलरूबिनचं प्रमाण नियंत्रित केलं नाही तर गंभीर परिणाम होऊ शकतात.

या आजाराचा परिणाम थेट लिव्हरवर होऊन लिव्हर कमकुवत होते.

अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घरगुती इलाज करूनही कावीळीतून पूर्णपणे तंदुरुस्त होता येतं.

कावीळ होण्याची कारणं…

बिलरुबिन नावाचं पिवळसर रंगाचं द्रव्य रक्तकोशिकांमधे (हिमोग्लोबिन) असतं. या कोशिका जेव्हा मृत होतात तेव्हा लिव्हरमधून गाळून बाजूला होतात. लिव्हरचं काम जर बिघडत असेल तर बिलरूबिनचं प्रमाण वाढायला लागतं. अतिरिक्त बिलरूबिन शरीराबाहेर पडत नाही. त्यामुळे त्वचा पिवळसर दिसू लागते. याव्यतिरिक्त कावीळ होण्याची आणखी काही कारणं आहेत…

१. हेपेटायटिस

२. अल्कोहोल संबंधित लिव्हरचे आजार

३. दूषित अन्नपाण्याचं सेवन

४. लिव्हरवर परिणाम करणारी औषधं

काविळीची लक्षणं :

१. त्वचा, नखं, डोळ्यांचा पांढरा असलेला भाग पिवळसर दिसायला लागतो.

२. पोट दुखणं, भूक न लागणं, अपचन होणं.

३. वजन कमी होणं, थकवा येणं

४. मूत्राचा रंग पिवळा होणं

५. ताप येणं

६. हातांवर खाज येणं.

कावीळ कोणाला होऊ शकते :

१. नवजात अर्भकापासून कोणत्याही वयाच्या व्यक्तीला कावीळ होऊ शकते.

२. नवजात अर्भकांमधे हिमोग्लोबिनचं प्रमाण जास्त असतं. या रक्तकोशिका जेव्हा आतड्यातून गाळून निघतात तेव्हा कावीळ होण्याची शक्यता वाढते.

३. काविळीची सुरूवात डोक्यापासून होते. मग चेहरा पिवळसर दिसायला लागतो.

मग छाती आणि पोटात कावीळ पसरते आणि शेवटी पायापर्यंत पसरते.

१४ दिवसांपेक्षा जास्त दिवस कावीळ असेल तर त्याचे गंभीर परिणाम होतात.

पंडुरोग आणि काविळीतला फरक :

१. पंडुरोग झाल्यावर रोगी पांढरट पिवळा दिसायला लागतो. कावीळ झाल्यावर मात्र डोळे, त्वचा, नखं हळदीसारखी पिवळी दिसायला लागतात.

२. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे पंडुरोग होतो. कावीळ झाल्यावर मात्र पित्ताशयातून निघालेलं पित्त रक्तात मिसळून शरीरभर पसरतं.

३. पंडुरोग झाल्यावर नेहमीसारखी भूक लागते. पण कावीळ झाल्यावर भूक लागत नाही.

काविळीमुळे होणारे इतर आजार :

१. फॅटी लिव्हर :

लिव्हरच्या भागात चरबी जास्त साठून राहिली तर त्याला फॅट लिव्हर म्हणतात.

चरबी वाढवणाऱ्या पदार्थांचं सेवन, व्यायामाचा अभाव, दारूचं व्यसन, ताणतणाव, स्थूलपणा, बरेच दिवस घ्यावी लागणारी औषधं यामुळे फॅट लिव्हरची समस्या होऊ शकते.

अपचन, पोटात डाव्या आणि मध्यभागी दुखणं, थकवा, अशक्तपणा, भूक मंदावणं, पोटाचा घेर वाढलेला दिसणं ही फॅट लिव्हरची लक्षणं आहेत.

२. सिरोसिस रोग :

चरबी वाढवणारा आहार, दारूचं सेवन यामुळे लिव्हरच्या शिरांमधे अडथळे निर्माण होतात. याला फायब्रोसिस म्हणतात.

यामुळे लिव्हरचा लवचिकपणा जाऊन ती ताठर होऊ लागते.

कावीळ जास्त झाली तर सिरोसिसचा धोका वाढतो. लिव्हर ट्रांसप्लांट हाच यावर उपाय होऊ शकतो.

पोटदुखी, रक्ताची उलटी, अंगावर सूज, शौचास रक्त पडणं, चक्कर येणं, पोटात पाणी होणं ही सिरोसिसची लक्षणं आहेत.

३. लिव्हर फेल्युअर :

एक्युट लिव्हर फेल्युअर : मलेरिया, टायफॉइड, हेपेटायटिस ए, बी, सी, डी, ई अशा काही आजारांचा लिव्हरवर परिणाम होतो.

सिरोसिसमुळेही लिव्हर निकामी होते. यालाच एक्युट लिव्हर फेल्युअर म्हणतात.

या आजारातून व्यक्ती बरी होण्याची शक्यता खूप कमी असते.

क्रोनिक लिव्हर फेल्युअर : बऱ्याच काळापासून लिव्हरसंबंधी आजार असल्यास त्याला क्रोनिक लिव्हर फेल्युअर म्हणतात.

लिव्हर ट्रांसप्लांट हाच या दोन्हीसाठी उपाय असू शकतो.

कावीळ झाली तर घरगुती उपचार :

१. ऊसाचा रस :

कावीळ झाली तर दिवसातून तीन चार वेळा ऊसाचा रस प्यावा.

गव्हाच्या समप्रमाणात पांढरा चुना घेऊन दोन्ही ऊसाच्या रसात मिसळून घेतल्यास कावीळ लवकर कमी होते.

२. हळद :

कावीळ झाल्यावर एक चमचा हळद अर्धा ग्लास पाण्यात मिसळून घ्यावी.

दिवसातून तीन वेळा असं पाणी प्यावं. त्यामुळे शरीरात वाढलेलं बिलरूबीन आणि विषारी घटक बाहेर पडायला मदत होते आणि रक्तशुद्धी होते.

३. संत्र :

पचनाच्या दृष्टीने संत्र उपयुक्त असतं. कावीळ झाल्यावर संत्र्याचा रस प्यायल्याने बिलरुबीन कमी होऊन लिव्हरचं काम सुधारतं.

४. टोमॅटो :

सकाळी अनुषापोटी टोमॅटोचा रस प्यायल्याने लिव्हरचं काम सुधारतं.

टोमॅटोचा रस काढतांना आधी टोमॅटो व्यवस्थित उकडून सोलून घ्यावे.

टोमॅटोचा गर घोटून तो रस प्यावा. कावीळ झाल्यावर काही दिवस असा रस घेतल्याने कावीळ कमी होते.

५. धने :

धने ७-८ तास भिजवून ते पाणी प्यावं. पोळी भाजी करतानाही असं पाणी वापरावं.

धन्याच्या पाण्यामुळे कावीळ नियंत्रणात येते.

६. ताक :

कावीळ झाल्यावर रोज सकाळ संध्याकाळ १-१ ग्लास ताक सैंधव मीठ घालून प्यावं.

७. दही :

कावीळ झाल्यावर बॅक्टेरिया इन्फेक्शन कमी होण्यासाठी दही जरूर खावं.

८. नारळपाणी :

कावीळ झाल्यावर नारळपाणी प्यायल्याने लिव्हरचं काम सुधारतं आणि पचन चांगलं होतं.

९. गुळवेल :

गुळवेलीचा रस मधात मिसळून रोज सकाळी घेतल्याने कावीळ कमी होते.

१०. पपई :

कावीळ झाल्यावर कच्च्या पपईची भाजी खावी. तसेच पिकलेली पपईसुद्धा जरूर खावी.

११. कांदा :

एका काचेच्या बरणीत कांद्याचे बारीक तुकडे लिंबाच्या रसात बुडवून ठेवावे.

चवीनुसार त्यात सैंधव मीठ आणि काळी मिरी पावडर घालावी. याचं रोज थोडसं सेवन केल्याने कावीळ कमी होते.

१२. मुळा :

मुळ्याचा पानांसह रस काढावा. त्यात थोडासा लिंबाचा रस आणि चवीप्रमाणे साखर घालावी.

हे एक कप मिश्रण रोज सकाळी अनुषापोटी घ्यावं.

तसेच रात्री झोपण्यापूर्वी घ्यावं. एका आठवड्यात कावीळ बरीच कमी होते.

१३. तुळस :

तुळस आणि पुनर्नवा समप्रमाणात घेऊन वाटून त्याचं सकाळ संध्याकाळ सेवन करावं.

१४. तुरटी :

तुरटी तव्यावर शेकून फुलवून किसून घ्यावी. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा तुरटी घालून रोज सकाळी हे पाणी प्यावं.

दोन तीन दिवस हे पाणी प्यायल्याने कावीळ कमी होते.

कावीळ झाल्यावर आहार विहार :

१. रोजचा आहार ताजा आणि शुद्ध असावा.

२. स्वयंपाक करताना, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे.

३. लिव्हरमधील टॉक्सिन जाऊन लिव्हरचं काम सुरळीत ठेवण्यासाठी पुरेसं आणि शुद्ध पाणी प्यावं.

४. लिंबाचं सरबत, संत्र्याचा रस जरूर प्यावा.

५. लिव्हरवर ताण पडू नये म्हणून दिवसभरात थोडं थोडं खावं.

६. थकवा येऊ नये यासाठी आराम करावा.

कावीळ झाल्यावर पथ्य :

१. बाहेरचं खाणं वर्ज्य करावं.

२. एकाच वेळी जास्त खाणं खाऊ नये.

३. तेलकट, मसालेदार आणि मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत.

४. डाळींचे पदार्थ खाऊ नयेत.

५. दारूचं सेवन वर्ज्य करावं.

६. लोणची पापडासारखे जास्त मिठाचे पदार्थ खाऊ नयेत.

७. चहा कॉफीचं सेवन टाळावं. त्यातील कॅफिनमुळे कावीळ लवकर कमी होत नाही.

८. तूप, लोणी वर्ज्य करावं. त्यामुळे चरबी वाढत नाही.

९. जंकफूड, फास्टफूड पूर्णपणे वर्ज्य करावं.

१०. पचायला जड असणारे मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत.

प्रत्येक व्यक्तीमध्ये वात, पित्त, कफ हे दोष संतुलित असतील तर आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होते.

यापैकी पित्त दोष प्रकुपित झाला तर कावीळ होऊ शकते. तरीही पुढील काही लक्षणं दिसली तर त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.

१. डोळे, त्वचा पिवळसर दिसू लागली.

२. मूत्राचा रंग पिवळा झाला.

३. वजन कमी होऊन लवकर थकवा येत असेल.

४. पोट दुखत असेल.

५. भूक मंदावली असेल.

६. ताप येत असेल.

काविळीसारख्या सामान्य वाटणाऱ्या पण गंभीर होऊ शकेल अशा आजाराची माहिती तुम्हालाही नक्कीच उपयोगी असेल.

Image Credit : Medical Labourtory Scientist

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय