२०१३ साली कोरोनाव्हायरसची भविष्यवाणी झाली होती, हे खरं आहे का?

जर कोणी तुम्हाला सांगितलं, की २०१३ मध्येच कोणीतरी कोरोनाव्हायरसची भविष्यवाणी केलेली होती, तर तुमचा विश्वास बसेल का?

असे भविष्य करणारा नस्रोदेमस सर्वांनाच माहीत आहे, एखादं युद्ध असो किंवा एखादी चर्चेत राहिलेली घटना असो, नस्रोदेमसची भविष्यवाणी कुठेतरी बातम्यांमध्ये येतेच…

पण हा पटठ्या कोरोनाव्हायरस येऊन वर्ष उलटून गेलं, पण अशा भविष्यवाणीने अजूनपर्यंत डोकं वर काढलं नव्हतं…

पण हल्ली ट्विटरवर असंच कोरोना व्हायरसचं भविष्य सांगणारं, एक २०१३ चं ट्विट धुमाकूळ घालतंय…

या ट्विटला आतापर्यंत लाखो लोकांनी रिट्विट केलंय, आणि १८ हजारापेक्षा जास्त लोकांचे यावर कमेंट्स आहेत.

यावर काही लोकांनी कमेंट केलंय की, ‘जर कोणाला मार्को दिसला तर विचारा की, हे असे केव्हा पर्यंत चालू राहील’ काही लोकांनी मार्कोची तुलना नेस्रोडेमस बरोबर सुद्धा केली.

२०२० पासून हे ट्विट व्हायरल व्हायला लागलं. आणि त्याचे मिम्स सुध्दा बनायला लागले.

मग हे ट्विट म्हणजे खरंच मार्कोने २०१३ मध्ये सांगितलेलं भविष्य आहे का?….

तर हे असं अजिबात नाही, म्हणजे निदान मार्को हा भविष्यवेत्ता असण्याची शक्यता तरी दिसत नाही.

कोरोनव्हायरस हा एकसदृश दिसणाऱ्या RNA व्हायरसेसचा समूह आहे. कोविड-19 हा त्यातूनच होणारा आजार आहे. पण कोविड -19 च्या आधीसुद्धा कोरोना व्हायरस पासून SARS आणि MERS हे आजार जगाच्या काही भागात साथीसारखे पसरले होते.

2003 साली SARS म्हणजे Severe acute respiratory syndrome आणि 2013 साली MERS म्हणजे Middle East respiratory syndrome हे आजार पसरले होते.

आणि याच MERS बद्दल मार्को अकोर्ट्स त्यांच्या ३ जून २०१३ च्या ट्विटमध्ये लिहीत आहेत असा अंदाज काढता येतो.

मार्कोला या ट्विट बद्दल काही विचारले जाऊ शकत नाही, कारण त्यांचं हे ट्विटर अकाउंट सध्या ऍक्टिव्ह नाही.

त्यांचं शेवटचं ट्विट ११ डिसेंम्बर २०१६ चं आहे.

८ डिसेंबर २०१६ च्या एका ट्विट मध्ये मार्को असंही म्हणतात की, ‘Dude I need a break from life’

असो तर मार्कने हे त्यांचं २०१३ चं ट्विट पाहिलं तर, ते ६ वर्षांनंतर इतकं व्हायरल झालेलं पाहून त्यांना सुद्धा आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही..

आणि महत्त्वाचं म्हणजे यात सर्वांनी लक्षात घेण्याचा मुद्दा हा कि, या पूर्वी येऊ गेलेल्या SARS आणि MERS सारखाच कोविड-19 सुद्धा एक दिवशी जगाचा निरोप घेईल. फक्त तोपर्यंत सर्वांना नियम पाळून सुरक्षित राहायचं आहे… काय पटतंय ना!!!

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय