एन.आर.आय. मुंबईकराची ६०० शेतकरी कुटुंबाना मदत

Rohit Shelatkar

सरकारने कर्जमाफीसाठी निकष, तत्वतः असे शब्द वापरले असले तरी या शब्दांची ढाल न करता केवळ समाजभान आणि समाजऋण समजून Rohit Shelatkar या एन.आर.आय. तरुणाने गेली तीन वर्षे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.

Rohit-Shelatkar-Vice-President-Director-Vitabiotics-UKमुळचा बोरिवलीकर असलेला रोहित सध्या इंग्लडमध्ये एका औषध कंपनीचा संचालक आहे. आतापर्यंत ६०० शेतकरी कुटुंबांना त्याने मदतीचा हात दिला आहे. २०१४ मध्ये त्याने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा आणि मंगी कोलमपोडा येथील १०३ विधवा महिलांसोबत संवाद साधून त्यांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत केली. तसेच ४० विद्यार्थी आणि ६ महिलांच्या शिक्षणाचा सम्पूर्ण खर्च त्याने उचलला. आता देखील १५ विद्यार्थी आणि ४ महिलांच्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी त्याने घेतली आहे. यातील काही विद्यार्थी हे पदवीचे शिक्षण घेत आहेत.

२४ जून रोजी यवतमाळ जिल्ह्यातील झरी जामनी येथे रोहितच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना बि-बियाणे, खत, किटकनाशकाचे वितरण करण्यात येणार आहे. असे विदर्भ जनआंदोलन समितीचे आयोजक किशोर तिवारी यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हा हा सर्वात जास्त आत्महत्या झालेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील झरी जामनी, टीळापूर, घाटंजी आणि राळेगाव या भागात सर्वात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत. त्यामुळे या भागातील अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंबांना रोहितने विहीरी बांधण्यासाठी मदत केली आहे. कृषी पंप घेवून दिले आहेत. एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांना रोजगार मिळावा यासाठी शेतमालावर प्रक्रिया उद्योग येथे उभारण्याचा मानस देखील त्याचा आहे.

कोण आहे रोहित…

रोहित बोरिवलीचा राहणारा आहे. त्याचे शालेय शिक्षण सेंट फ्रान्सिस हायस्कूल, बोरिवली (पश्चिम) येथे झाले. बी.फार्म केल्यावर मास्टर डीग्री त्याने हर्टफोर्डशायर युनिव्हर्सिटी, ब्रिटन येथून मिळवली. त्याचे आईवडील निवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. आपल्या अथक परिश्रमाने अवघ्या २८ व्या वर्षी त्याने जगविख्यात औषध कंपनी विटाबायोेटिक्सचा संचालक होण्याचा मान मिळवला आहे.

रोहित त्याच्या कष्टानेच आज या उंचीवर आहे. महत्त्वाचे म्हणजे परदेशात राहूनही तो ज्या पद्धतीने आपली सामाजिक बांधिलकी जपत आहे त्या बांधिलकीचा आणि तो करत असलेल्या सामाजिक कार्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. –लक्ष्मण शेलटकर, वडील

वाचण्यासारखे आणखी काही…..

इस्रो आणि नववर्ष २०१८
हिंदी सिनेमाची ट्रॅजिडी क्वीन : मीना कुमारी
Falcon Heavy Rocket नेत आहे मंगळाच्या कक्षेत टेस्लाची गाडी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!