डिझेलची होम डिलिव्हरी? हो हे शक्य करून दाखवले चेतन आणि आदिती या मराठी दाम्पत्याने

भारतात दर दिवशी 27 करोड लिटर डिझेलचा वापर होतो. आणि त्यातलं 5 ते 10 टक्के डिझेल हे ‘डेड मायलेज’ म्हणून वाया जातं….

त्यावरून चेतन वाळुंज आणि आदिती भोसले यांना या व्यवसायाची कल्पना सुचली.

उद्योग म्हटलं की ठराविक प्रांतातील लोक डोळ्यासमोर येतात. मराठी माणसांची टक्केवारी त्यात तशी कमीच दिसते.

तरीही महाराष्ट्रात वेगळा विचार करून उद्योग करणारे लोक आहेतच की. आणि सध्याचा काळ पाहिला तर विशेषतः तरुण पिढीने स्टार्ट अप बिझिनेस कल्पना प्रत्यक्षात आणणं गरजेचं आहे.

त्यासाठी अर्थात कष्ट हवेत, फक्त ९ ते ५ कामाची वेळ हा दृष्टिकोन बाजूला ठेवावा लागणार, कामात चिकाटी हवी, कामात रिस्क घ्यायची तयारी हवी आणि अशा अनेक गोष्टी असतात.

फक्त तयारीनिशी स्वतःला झोकून देणं महत्वाचं असतं. अडथळे आले, अडचणी आल्या तरी न खचता प्रयत्न करत राहीलं पाहिजे, लोकांशी चांगला संपर्क ठेवणंही महत्वाचं.

आज या लेखात अशाच एका तरुण दांपत्याची वेगळी वाट पाहुया ज्यांना प्रत्यक्ष रतन टाटांनी सुद्धा सहकार्य करायचं ठरवलं…

या दांपत्याचं नाव आहे चेतन वाळुंज आणि अदिती भोसले – वाळुंज. अदितीने फॉरेन्सिक आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे.

तर चेतनने आपल्या घरचा पेट्रोल पंपाचा व्यवसाय पुढे चालू ठेवला आहे. लग्नानंतर दोघांनीही व्यवसायात लक्ष द्यायचं ठरवलं.

उद्योगी स्वभाव असल्यामुळे वेगळं काहीतरी करायचं असा सतत विचार चालायचा. पण नेमकं काय करावं हे काही सुचत नव्हतं.
आपल्या पेट्रोल पंपाच्या व्यवसायाला अनुसरून एक वेगळी कल्पना त्यांना सुचली.

‘रिपोज एनर्जी’ या नावाखाली त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी निगडित डेड मायलेज ही समस्या दूर करण्याचा निर्णय घेतला.

त्यातूनच व्यवसायाला एक वेगळं वळण मिळालं. ट्रान्सपोर्ट व्यवसायात गाडीत इंधन भरायचं म्हटलं की पेट्रोल पंपापर्यंत गाडी आणावी लागते.

त्यात वेळ, पैसा आणि उरलंसुरलं इंधनही खर्च होतं. शिवाय प्रदूषण होतं ते वेगळच. नेमकी हीच समस्या भोसले दांपत्याने हेरली.

उपाय म्हणून डिझेलची होम डिलिव्हरी करण्याचा अफलातून निर्णय घेतला. अर्थात असं इंधन होम डिलिव्हरी करणं म्हणजे रिस्क आलीच.

तरीही हे धाडस करायचं त्यांनी ठरवलं. त्यांच्या मते, भारतात दररोज २७ करोड लिटर डिझेलचा वापर होतो. त्यापैकी ५-१०% डिझेल हे डेड मायलेज मध्ये वाया जातं.

डिझेलची होम डिलिव्हरी करायची तर ती सुरक्षितपणे व्हायला हवी. त्यासाठी सुरक्षित साधनं हवी. त्यादृष्टीने शोध सुरू झाला.

आर. एम. पी. पी. म्हणजेच ‘रिपोज मोबाईल पेट्रोल पंप’ सुरू करण्यापूर्वी त्यांनी डिझेलच्या सुरक्षित होम डिलिव्हरीसाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या प्रमुख कंपन्यांशी संपर्क साधला.

पाहता पाहता या दांपत्याची धडपड खुद्द रतन टाटांना समजली. भोसले दांपत्याने हाती घेतलेल्या कामासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी रतन टाटांनी त्यांना बोलावलं.

आपल्या कामासंदर्भात इतक्या मोठ्या व्यक्तीशी चर्चा करायची म्हणजे हाती घेतलेल्या कामाचं स्वप्न पूर्ण होण्याची ही नांदी आहे, हे त्यांनी ओळखलं.

रतन टाटांनी भोसले दांपत्याच्या उपक्रमासाठी मेंटरशिप देण्याचं आश्वासन दिलं. तेव्हापासून रिपोज फर्म टाटा मोटर्स आणि इतर प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांबरोबर काम करत आहे.

रिपोजने अलिकडेच डबल डिस्पेंसर मोबाईल पेट्रोल पंप सुरू केला आहे. जिथे आधुनिक पद्धतीने सुरक्षितता विचारात घेतली आहे. दोन उच्च गतीचे डिस्पेंसर, loT controller, ब्रेक इंटरलॉक सिस्टिम, जिओ फेंसिंग, फ्युल सेंसर अशी संसाधने वापरून आधुनिकता आणली आहे.

त्यांच्या कंपनीने ‘रिपोज मोबाईल पेट्रोल पंप’साठी तीन पेटंट रजिस्टर केले आहेत. कंपनी सध्याच्या उपलबधतेप्रमाणे ३० मिलियन डॉलर्स फंड गोळा करून आर एम. पी. पी. चे ३५०० युनिट विकण्यासाठी तयार आहे.

इंधनाचं सुलभ वितरण होण्यासाठी Vo Alfa सिस्टिमचं संशोधन करण्यात आलं.

यामधे फायर सेफ्टीचा मुख्य विचार केला आहे. इंधनाच्या सुरक्षित वितरणासाठी अशा गोष्टी खुप महत्वाच्या ठरतील यात शंकाच नाही.

कोविड लॉकडाऊनच्या काळात भोसले दांपत्याने सुरक्षित आणि यशस्वीपणे डिझेलची होम डिलिव्हरी केली.

इतक्या कठीण प्रसंगात माणसांना घराबाहेर पडणं अवघड असताना डिझेलची सुरक्षित होम डिलिव्हरी करून कित्येकांचं काम भोसले दांपत्याने सुकर केलं. इतकंच नाही तर त्यांच्या कामाचं महत्त्व त्यांनी काम करून पटवून दिलं.

चेतन भोसले म्हणतात की, त्यांच्या कामाच्या या पद्धतीमुळे ई कॉमर्स माध्यमातून २०२०-२१ मधे डिझेलची जवळपास १६००,००० लिटर इतकी बचत झाली.

२०२३-२४ पर्यंत १६,०००,००० लिटर इतकी डिझेलची बचत होऊ शकते असा त्यांचा अंदाज आहे. याशिवाय कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण ३१,४७४,५६३,२०० किलोग्रॅम इतकं नियंत्रित करता येऊ शकेल.

मित्रहो कुठलंही काम निरुपयोगी किंवा कमीपणाचं नसतं. फक्त ते योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी करता आलं पाहिजे.

भोसले दांपत्याच्या कामावरून आपण नक्कीच एक गोष्ट शिकू शकतो की, यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर लोकांची नेमकी गरज ओळखून काम सुरू केलं, त्याला विज्ञानाची आणि दूरदृष्टीची जोड दिली तर त्याचा लोकांना आणि परिणामी आपल्यालाही फायदा होतोच.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय