हरभरा डाळीचा पराठा रेसिपी

हरभरा डाळीचा पराठा रेसिपी harbhara dalicha paratha recipe

मस्त पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. बाहेर धोधो पाऊस सुरू असताना गरमागरम चमचमीत खाऊ खायला तर सगळ्यांनाच आवडतं.

मग भजीपेक्षा काहीतरी हटके रेसिपी नक्की करून बघा. साहित्य आणि कृती इथे दिलेलीच आहे.

हरभरा डाळीचा पराठा :

साहित्य 

 • दीड कप हरभरा डाळ
 • कणिक (मीठ, तेल, पाणी घालून व्यवस्थित मळून घेतलेली)
 • चवीपुरते मीठ
 • अर्धा टीस्पून हळद
 • बारीक चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या
 • बारीक चिरलेलं अर्धा टेबलस्पून आलं
 • एक टीस्पून जिरे
 • अर्धा टीस्पून तिखट
 • एक टीस्पून गरम मसाला
 • एक टेबलस्पून बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर
 • दही

कृती 

 • हरभरा डाळ स्वच्छ धुवून घ्यावी. पुरेसं पाणी घालून ३ -४ तास भिजवावी. नंतर पाणी काढून टाकावं.
 • जाड बुडाच्या पातेल्यात हरभरा डाळ, दोन कप पाणी, हळद, मीठ एकत्र करून मिश्रण १५ – २० मिनीटं व्यवस्थित शिजवून घ्यावं.
 • डाळ व्यवस्थित शिजल्यावर पुरणयंत्रात घ्यावी. त्यात हिरवी मिरची, आलं, जिरे घालून डाळ चांगली वाटून घ्यावी.
 • वाटलेल्या मिश्रणात तिखट, गरम मसाला, कोथिंबीर घालून एकजीव करावं.
 • कणकेचे एकसारखे गोळे करून घ्यावे. त्याच आकाराचे हरभरा डाळीच्या मिश्रणाचे गोळे करून घ्यावे.
 • एकीकडे तवा गरम करावा.
 • कणकेचा एक गोळा थोडासा लाटून त्याची पारी तयार करावी. त्यात एक हरभरा डाळीच्या मिश्रणाचा गोळा घालून पारीच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्याव्या. त्याचा छोटा पराठा लाटावा.
 • लाटलेल्या पराठ्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगाचा होईपर्यंत चांगला भाजून घ्यावा.
 • छान तयार झालेला गरमागरम पराठा डिशमध्ये घेऊन दह्याबरोबर खायला द्यावा.

झिंक, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर अशा विविध घटकांचे प्रमाण मुबलक असल्याने ऊर्जा निर्मितीसाठी चणाडाळ/हरभराडाळ हा उत्तम आहे.

चणाडाळीचे/ हरभराडाळीचे आहारातील फायदे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

हरभरा डाळीची गोड पुरणपोळी सगळेच खातात. वाटली डाळ खायलाही सगळ्यांना आवडत असेल. मग एकदा हा हरभरा डाळीचा चमचमीत पराठा नक्की करून बघा आणि आपल्या प्रियजनांना खूश करा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!