कोणी तुमच्या जखमेवर मीठ चोळले तरी, वाईट वाटून न घेण्यासाठी ‘हे’ करा

कोणी तुमच्या जखमेवर मीठ चोळले तरी वाईट वाटून न घेण्यासाठी 'हे' करा

काही आगाऊ माणसे तयारच असतात जखमेवर मीठ चोळायला.. आम्ही आपले असेच सांगितले हो, तुम्ही मनावर घेऊ नका फारसे..!!

असे म्हणायला देखील कमी करत नाहीत.. मग आपण कितीही दुखावले गेलो तरी त्यांना फरक पडत नसतो.

अशा वेळेस गोष्टी मनावर न घेणे इतके सहजासहजी जमू शकते का?

दुसऱ्यांच्या बोलण्याचे आपण स्वतःवर परिणाम का करून घ्यावे..? का सगळ्या गोष्टी उगीच मनावर घ्याव्यात..?

का आपण स्वतःला उदास करावे..? तिकडे दुनिया धमाल करते आणि आपणच विनाकारण एकटे पडतो.

का अशी शिक्षा द्या स्वतःला..? बरं हे तर मनाचे खेळ असतात मग ह्याला आवर घालणेही आपल्या हातात असते.

म्हणून ह्या ‘मनाला लावून’ घेण्याच्या आपल्या सवयीला दूर करण्यासाठी काही सोप्पे उपाय करून तर पहा. बघा तुमचे मन:स्वास्थ्य कसे ठणठणीत राहते.

१. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठीच असते हा विचार सोडा:

एखादी व्यक्ती तुम्हाला कडवट बोलली असेल तर तो त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याचा भाग असतो.

त्या व्यक्तीच्या आयुष्यात आलेल्या अडचणींचा परिणाम असतो. वडाचे तेल वांग्यावर निघते ना ?? अगदी तसेच..

सहसा आपल्याशी दिलखुलास असणारी व्यक्ती काही अपशब्द बोललीच असेल तर मनावर घेऊ नका.

ते खरोखरीच तुमच्या साठी असेल असे नाही. मग जे तुमच्या साठी नव्हतेच त्याला मनात आणायचेच कशाला..!! थोडे समजुतीने घ्या..

२. हे नाते टिकवाचे आहे का तोडायचे हा विचार नक्की झाला पाहिजे:

एखाद्या नात्यात कटुता निर्माण होत असल्यास जरा विचार करा.

हा समोरचा माणूस आपल्याला महत्वाचा आहे की नाही. जर त्या व्यक्तीशी अतूट नाते असेल तर मात्र आपल्या शब्दांवर लगाम लावा.

म्हणून रगात बोललेले मनावर घेत राहण्यापेक्षा योग्य वेळी आपले मुद्दे समोरच्यास समजावून द्या. शेवटी नात्यातला ओलावा टिकवणे महत्वाचे..!!

३. झालेल्या प्रसंगाला समोरच्याच्या नजरेतून पहा:

कधी कधी प्रत्येक गोष्ट आपल्याच नजरेतून पाहिल्यास आपल्याला आपली चूक कधीच उमजत नाही.

मग समोरच्याचे बोलणे फक्त नकारात्मक पद्धतीने मनात घर करून राहते. आणि आपली प्रचंड चीड चीड होते. हे टाळण्यासाठी कधीतरी समोरच्या व्यक्तीच्या अँगलनेही घडलेल्या प्रसंगाकडे बघा..

कदाचित त्यावेळी आपल्याला आपले काय चुकले हे कळू शकेल. नंतरच्या मनःस्तापापेक्षा घडलेल्या प्रसंगातून शिकलेले कधीही चांगले. म्हणून म्हणतात ना ‘Put yourself into the other person’s shoes..’

४. आपल्याच माणसांना ‘अरे ला कारे’ करणे गरजेचे आहे का?:

‘Every action has an equal reaction’ असे आपण म्हणतो. ते योग्यहि आहे.

अनोळखी व्यक्तीला आपण एंटरटेन करणे योग्य नाहीच. तिथे ‘आली अंगावर तर घेतली शिंगावर’ असे करावेच लागते.

पण आपल्या सख्ख्या, जिवाभावाच्या लोकांबरोबर असे करणे कितपत योग्य आहे ह्याचा विचार जरूर व्हावा. कोणी अरे केल्यावर तात्काळ कारे करायची गरज आहे का..?

समोरच्याने अपमान केलाच तरी जरा मोठा श्वास घ्या. एक ते शंभर मोजा. आपल्या भावनांना यावर घाला. रागात बोललेला शब्द समोरच्याला अनंतकाळासाठी घायाळ करू शकतो हे ध्यानात ठेवा.

वातावरण निवळू द्या आणि मगच आपल्या अपमानाचा जाब विचारा.. सगळ्यांकडे आपल्यासारखे पेशन्स असतातच असे नाही.

मात्र आपण सबुरीने घेतले तर काही मिसअंडरस्टँडिंग चुटकी सरशी दूर होतात. एकमेकांशी थंड डोक्याने बोलून तर बघा, सगळे प्रॉब्लेम पटापट सुटतील आणि मन शांत होईल.

५. स्वतःची किंमत स्वतःच ठेवा:

आपला मान आपल्यालाच ठेवावा लागतो. म्हणजे काही नाती आपण तोडू शकत नाही आणि त्यांना निभावू शकत नाही.

अशा वेळी अशा अवघड जागेचे दुखणे असलेली माणसे आपल्याला सतत भंडावून सोडू शकतात. अशांच्या नादी लागून आपलं मनःस्वास्थ्य बिघडवण्यापेक्षा त्यांना दुर्लक्षित केलेले कधीही चांगले.

मग ते आपल्या पाठीमागे काहीही बोलो. ते पाहणे आपले काम नाही. त्याना स्वतःच्या मनात घर करू देऊ नका. त्यांच्यापासून आपला मान आणि मन दोन्हीही जपून ठेवा.

काहीही झाले तरी आपण भवतालच्या माणसांशिवाय राहू शकत नाही. नाहीतर जंगलात, निर्मनुष्य ठिकाणीच जाऊन राहावे लागेल.

ते तर केवळ अशक्यच आहे.. त्यामुळे लोक काय म्हणतील, कोण आपल्याशी कसे बोलतो ह्याला जास्ती महत्व देण्यापेक्षा ज्यांच्याशी आपले नाते सुंदर जुळते अशा लोकांच्या कंपनीत राहिलेले उत्तम.

ह्याने आपले जग सुंदर बनते. आपले प्रिय दोस्तमंडळी, नातेवाईक आपल्या सोबत हवेच. आणि त्यांचीही मने आपल्यामुळे दुखावली जाणार नाहीत ही जबाबदारी आपण देखील घेतली पाहिजे.

ह्यांच्या शिवाय आपल्या जीवनाला शोभा नाही.

असे असले तरीही काही गोष्टी, भावना, निर्णय हे आपले स्वतःचे असतात आणि ते आपल्यापुरतेच ठेवले गेले पाहिजेत.

अकारण आपली मानसिक आणि शारीरिक शक्ती निगेटिव्ह गोष्टीत संपावण्यापेक्षा इतर स्वतःसाठी आणि समाजास उपयोगी कामांसाठी वापरली तर क्या केहना..!!

असे संतुलित जगले तर आयुष्य अत्यंत सुंदर आहे… हो ना..!?

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!