सुशांत सिंह राजपूतच्या मृ_त्यूला झाले १ वर्ष – जाणून घ्या काय काय घडलं आजपर्यंत?

आजपासून बरोबर १ वर्षापूर्वी म्हणजेच १४ जून २०२० रोजी बॉलीवूडचा सितारा सुशांत सिंह राजपूत बांद्रयातील त्याच्या राहत्या घरी मृ_तावस्थेत आढळला आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली.

त्यानंतर सुरु झाले आरोप, प्रत्यारोप. खऱ्या खोट्या बातम्या सगळीकडे पसरल्या आणि संशयाची सुई वेगवेगळ्या लोकांवर रोखली गेली.

आज त्याच्या पहिल्या स्मृतिदिनी आपण ह्या वर्षभरात तारिखवार काय काय घडलं हे जाणून घेऊया.

जून १४, २०२०

बॉलीवूडचा सितारा सुशांत सिंह राजपूत बांद्रयातील त्याच्या राहत्या घरी मृ_तावस्थेत आढळला. त्याच्या घरी काम करणाऱ्या नोकराने ही बातमी पोलिसांना दिली आणि तपासकार्य सुरु झाले. तसेच शोकसंदेशांचा ओघ सुरु झाला. सर्वत्र हळहळ व्यक्त होऊ लागली.

जून १५, २०२०

सुशांत सिंह राजपूतवर मुंबईत अं_त्यसंस्कार केले गेले. त्याचे मेव्हणे श्री. ओ पी सिंह ह्यांनी सुशांतच्या मृ_त्यूबद्दल संशय व्यक्त करून सखोल तपासणीची मागणी केली.

जून १८, २०२०

सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिहा चक्रवर्ती हिचा जबाब बांद्रा पोलिसांनी नोंदवून घेतला.

जून २४, २०२०

सुशांत सिंह राजपूतचा पो_स्ट मो_र्टेम रिपोर्ट आला. त्यात कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमा किंवा झटापट झाल्यामुळे झालेल्या जखमांची नोंद नव्हती.

जुलै २९, २०२०

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी बिहारमधील पोलिस स्टेशनमध्ये कम्पलेंट करून सुशांतला आ_त्म_ह_त्ये_साठी प्रवृत्त केल्याचा आरोप काही जणांवर ठेवला. त्याच दिवशी रिहा चक्रवर्तीने ही तपासणी मुंबईतच व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन तपासकार्य सुरु केले.

जुलै ३०, २०२०

ई. डी. च्या डायरेक्टरनी बिहार पोलिसांकडे तपासकार्याचे डिटेल्स मागितले.

ऑगस्ट ४, २०२०

बिहार पोलिसांनी सी बी आय तपासणीची मागणी केली.

ऑगस्ट ५,२०२०

सुशांत सिंह राजपूतच्या केसची तपासणी सी बी आय कडे सोपवली गेली.

ऑगस्ट ६, २०२०

सी. बी. आय. ने त्यांच्या एफ. आय. आर. मध्ये रिहा चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत, तिची आई संध्या, भाऊ शोविक, तसेच सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युल मिरांडा, श्रुती मोदी आणि अन्य काही लोकांचा समावेश केला. त्यांच्यावर सुशांतला आ_त्म_ह_त्या करण्यास प्रवृत्त केल्याचा चार्ज लावण्यात आला.

ऑगस्ट १९, २०२०

सुप्रीम कोर्टाने सी बी आय ला तपासणी लवकर करण्याचे आदेश दिले.

ऑगस्ट २६, २०२०

ना_र्कोटि_क्सविरोधी खात्याने रिहा चक्रवर्तीच्या विरोधात ड्र_ग्सच्या वापराबद्दल केस केली. ह्या केसमध्ये ड्र_ग्सचा वापर असू शकेल हे पुढे आले.

ऑगस्ट २८, २०२०

रिहा चक्रवर्तीची सी बी आय कडून ८ तास कसून तपासणी.

सप्टेंबर ४, २०२०

रिहाचा भाऊ शोविक आणि सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा ह्यांना अटक.

सप्टेंबर ८, २०२०

ना_र्को_टि_क्सविरोधी खात्याकडून रिहा चक्रवर्तीला ३ दिवसांच्या कसून तपासणीनंतर अटक

ऑक्टोबर ५, २०२०

एम्स कडून सुशांतच्या खु_नाची शक्यता फेटाळली गेली. त्याने आ_त्म_ह_त्या केल्याचा निर्वाळा.

ऑक्टोबर ८, २०२०

रिहाची जामिनावर सुटका

फेब्रुवारी १५, २०२१

रिहाने सुशांतच्या बहीणीवर केलेली केस मुंबई हाय कोर्टाने फेटाळली.

मे २८, २०२१

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी ह्याला ना_र्को_टि_क्स_विरोधी खात्याकडून अटक.

ह्या केसमध्ये सी बी आय चा तपास अजून चालू असून त्यांनी अजून कोणावरही चार्जशिट फाइल केलेले नाही.

तर हे आहेत सुशांत सिंह राजपुतच्या आ_त्म_ह_त्या_प्रकरणी झालेल्या आणि होत असणाऱ्या तपासाचे डिटेल्स.

सत्य काही असो, एक गुणी कलाकार हरवला हे मात्र खरं.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय