आपल्या कामातील कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी ‘या’ नऊ गोष्टी करा

तुम्ही सतत बिझी असता असे तुम्हाला वाटते का? तुमचे काम कधी संपतच नाही, दिलेल्या वेळेत तुमचे काम पूर्ण होत नाही असे तुम्हाला वाटते का? तसेच तुम्ही जास्त वेळ लक्षपूर्वक काम करू शकत नाही असे तुम्हाला वाटते का?

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जर हो अशी असतील तर ह्याचा अर्थ तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आहात आणि त्यामुळे तुम्ही तुमची संपूर्ण क्षमता कामासाठी वापरू शकत नाही आणि त्यामुळे मागे पडत आहात.

कामावर लक्ष केंद्रित न करू शकल्यामुळे काम पूर्ण होत नाही आणि काम पूर्ण होत नाही ह्या टेन्शनमुळे कामावर लक्ष केंद्रित होत नाही अशी ही सायकल आहे. ही सायकल तोडून त्यावर मात करणे आवश्यक असते.

कामावर अगदी संपूर्ण 100% लक्ष केंद्रित करणे जरी अवघड वाटत असले तरी तसे हळूहळू शिकल्यामुळे आपण आपले काम पूर्ण करू शकू.

चला तर मग आज आपण आपल्या कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित कसे करायचे आणि आपले काम पूर्ण क्षमतेने कसे करायचे ते पाहूया.

१. कोणतेही काम करण्याआधी ते पूर्ण समजून घ्या

आपले काम आपल्या आवडीचे नसेल, आपल्याला पूर्ण समजले नसेल तर त्यावर लक्ष केंद्रित करून काम करणे अवघड होऊन बसते. न आवडणारे काम असेल तर ते काम सलग करत राहणे जमत नाही.

कामावरून लक्ष उडून ते इतर गोष्टींकडे जाते. त्यामुळे सर्वप्रथम आपले काम नक्की काय आहे, ते किती वेळात पूर्ण करणे आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे ते आपल्याला आवडते आहे ना, आपण ते शेवटपर्यंत पूर्ण करू शकू ना, हे सुरुवातीलाच समजून घ्या, त्याशिवाय कामाला सुरुवात करू नका.

पूर्णपणे समजून घेऊन काम केले की ते उत्कृष्टप्रकारे करणे आणि वेळेत पूर्ण करणे शक्य होते.

२. आपल्या कामांची प्रायॉरिटी ठरवा

अनेक वेळा असे होते की खूप कामे एकदम करायची असल्यामुळे आपण त्यातले कुठलेच काम नीट आणि वेळेत पूर्ण करू शकत नाही. जसजसा वेळ पुढे जातो आपल्यापुढे कामाचा डोंगर उभा राहतो आणि त्यामुळे मग कुठलेच काम पूर्ण होत नाही.

अशा वेळी कोणते काम आधी पूर्ण करायचे आणि कोणते नंतर केले तरी चालणार आहे हे ठरवून घ्या, कामांची प्रायॉरिटी ठरवा, असे नियोजन करण्यासाठी कामे सुरु करण्यापूर्वी सकाळचा थोडा वेळ द्या.

त्यामुळे सगळी कामे पूर्ण करण्यासाठी तुम्ही पूर्ण फोकसने काम करू शकाल.

३. कामावरून लक्ष हटवणाऱ्या बाबी कमी करा

आपण काम सुरु केल्यावर आपले त्या कामावरून लक्ष हटवणाऱ्या बऱ्याच गोष्टी घडत असतात. त्या कमी करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ तुम्ही जर वर्क फ्रॉम होम करत असाल तर शक्यतो स्वतंत्र खोलीत बसून काम करा.

त्यामुळे घरातील इतर लोकांच्या बोलण्यामुळे तुमचे लक्ष विचलित होणार नाही. तसेच एखादे अतिशय महत्वाचे काम करत असताना फोन बंद किंवा सायलेंट करून ठेवा म्हणजे त्या आवाजाने तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही.

ह्या झाल्या बाह्य गोष्टी ज्यांमुळे आपले कॉन्संट्रेशन कमी होते पण आणि अंतर्गत बाबी देखील असतात, जसे की मन अशांत असणे, झोप झालेली नसणे, भूक लागलेली असणे ज्यामुळे आपले आपल्या कामावरून लक्ष उडू शकते, ह्या गोष्टीदेखील कमी करण्याचा प्रयत्न करा.

त्यामुळे तुम्ही तुमचे काम पूर्ण लक्ष केंद्रित करून वेळेत पूर्ण करू शकाल.

४. एका वेळी अनेक कामे करणे टाळा

जरी आपल्यावर कामाचा लोड खूप असला तरी एकाचवेळी अनेक कामे करणे किंवा ती करण्याची हमी देणे टाळा. एकाचवेळी अनेक कामे केल्यामुळे कोणतेच काम व्यवस्थित पूर्ण होत नाही. सर्व कामे अर्धवट राहतात किंवा ज्या प्रकारे पूर्ण व्हायला हवी त्याप्रकारे होत नाहीत.

आपल्या कामाची क्वालिटी नीट ठेवायची असेल तर एका वेळी मोजकीच कामे करून ती व्यवस्थित पूर्ण करण्याला प्राधान्य द्या.

५. आपल्या कामात टाळाटाळ किंवा चालढकल करू नका

एकवेळ जास्त कामे एकदम करणे किंवा कामातून लक्ष विचलित होणे चालू शकेल परंतु आपल्या कामात चालढकल करू नका. किंवा काम पूर्ण करणे टाळू नका. अनेकवेळा अतिशय उत्तम प्रकारे काम पूर्ण करण्यासाठी लोक त्या कामाचे नियोजनच करत राहतात.

काम सुरु करून ते पूर्ण करण्याकडे लक्ष देत नाहीत. दुसऱ्या प्रकारचे लोक असेही असतात जे फक्त मोठमोठ्या कामांची स्वप्ने पहात राहतात पण प्रत्यक्ष काम मुळीच करत नाही. पण अशा प्रकारचे वागणे ठेवले तर आपल्या हातून कोणतेच काम चांगल्या प्रकारे पूर्ण होणार नाही. त्यामुळे आपल्या कामात चालढकल करू नका.

६. मेडिटेशन करा

आपल्या कामात आपले लक्ष केंद्रित व्हावे, संपूर्ण कॉन्संट्रेशनने आपल्याला काम करता यावे ह्यासाठी दिवसातील काही वेळ मेडिटेशन करण्यासाठी द्या.

मेडिटेशनमुळे आपली मानसिक शक्ती वाढण्यास मदत होते. मेडिटेशन हे आपले शरीर आणि मन ह्या दोन्हीवर चांगल्या प्रकारे काम करते. दररोज मेडिटेशन केल्यामुळे आपले कामावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित होऊ शकते.

७. पोषक, एनर्जि वाढवणारा आहार घ्या

कोणतेही काम करताना अंगात शक्ति असणे अतिशय आवश्यक आहे. कामावर लक्ष केंद्रित करायचे असेल तर योग्य आहार घेतलेला असणे तसेच योग्य प्रमाणात विटामीन सप्लिमेंट्स घेणे आवश्यक आहे.

थोड्या प्रमाणात कॉफी पिण्यामुळे मेंदूला तरतरी येते. योग्य आहार, योग्य व्यायाम करून आपले शरीर आणि मन तंदुरुस्त असेल तर आपण कोणतेही काम पूर्ण फोकसने करू शकू. ह्यासाठी आपली दिनचर्या चांगली असणे आवश्यक आहे. दररोजचे ठराविक रुटीन करून ते काटेकोरपणे पाळावे. लवकर झोपणे, लवकर उठणे ह्या सवयी अवश्य लावून घ्याव्या.

८. कामांमधून छोटा ब्रेक घेण्याची सवय लावून घ्या

सतत काम करण्यामुळे कोणालाही त्या कामाचा कंटाळा येणे आणि काम नीट न होणे अगदी सहज शक्य आहे. त्यासाठी आपल्या कामामधून छोटा ब्रेक घेण्याची सवय लावून घ्या.

पाणी पिण्यासाठी किंवा एक फेरी मारून येण्यासाठी जागेवरून उठा. असे करण्यामुळे कामातला तोच तोच पणा जाऊन तुम्ही अधिक जोमाने काम करू शकाल.

९. सोशल मीडियाचा वापर कमी करा

आपला फोकस डिस्ट्रॅक्ट करण्याला सर्वात जास्त कारणीभूत असतो तो आपला फोन किंवा कम्प्युटर. एकदा का आपण सोशल मीडिया साइटवर गेलो की आपला किती वेळ जातो हे आपले आपल्यालाच समजत नाही. सोशल मीडियावर रमल्यामुळे आपल्याला आपल्या कामाचा विसर पडतो किंवा तेथील विचार सतत डोक्यात असल्यामुळे आपले कामावर लक्ष केंद्रित होणे अवघड होऊन बसते.

त्यामुळे सोशल मीडियाचा वापर मर्यादित प्रमाणात करा. त्यासाठी दिवसातील एक वेळ निश्चित करा. त्यावेळेतच फोनचा वापर करा. त्यामुळे इतर वेळी तुम्ही पूर्ण लक्ष कामावर देऊ शकाल.

तर ह्या आहेत ९ टिप्स ज्यामुळे आपण आपल्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतो आणि पूर्ण क्षमतेने आपले काम करू शकतो.

ह्या टिप्सचा वापर जरूर करा आणि आपले कामावरील लक्ष वाढवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय