दुकानातील विक्री कशी वाढवावी?

दिवाळी, दसरा म्हणजे व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्याची चालून आलेली संधी असते.

म्हणूनच आज आपण अशा दुकानदारांना त्यांचा व्यवसाय, रोजची दुकानातील विक्री कशी वाढवता येईल हे पाहणार आहोत.

इलेक्ट्रिकल किंवा हार्डवेअर वस्तूंचे दुकान, कपड्यांचे दुकान, किरकोळ वस्तूंचे दुकान असणाऱ्या व्यावसायिकांना आता त्यांची रोजची विक्री वाढवणे खूप गरजेचे आहे.

ह्यासाठी नुसता दुकानाचा आकर्षक बोर्ड किंवा काय मिळते हे लिहिलेल्या पाट्या उपयोगी नाहीत. दुकानात आलेला ग्राहक रिकाम्या हाती परत जाता कामा नये म्हणून दुकानदाराने विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

मारवाड्याच्या बरोबरीने दुकानदारी करण्यासाठी आपला मराठी माणूस कुठेही कमी पडू नये म्हणून, या नऊ विशेष टिप्स खास तुमच्यासाठी.

त्यासाठी आज आपण रोजची दुकानातील विक्री वाढवणाऱ्या ९ टिप्स पाहूया.

१. ग्राहकाला खरेदी आधी ट्रायल / चव जरूर घेऊ द्या.

तुम्ही जर कपड्यांचे दुकानदार असाल तर ग्राहकांना निरनिराळे कपडे ट्राय करायला प्रोत्साहित करा. एक ड्रेस घेण्यासाठी आलेला ग्राहक घालून बघितल्यावर आवडले म्हणून ३, ४ ड्रेस नक्कीच घेऊ शकतो.

तसेच तुमचे आइसक्रीम पार्लर किंवा स्नॅक सेंटर असेल तर एखादे नवीन चवीचे आइसक्रीम किंवा नवीन पदार्थ आलेल्या ग्राहकांना खाऊन बघायला सांगा. असे चवीसाठी ठेवलेले पदार्थ आवडले की ग्राहक नक्की खरेदी करतात.

म्हणजेच ह्यामुळे विक्री तर वाढतेच शिवाय नवीन पदार्थ, वस्तु ह्यांच्याबद्दल ग्राहकांचा फीडबॅक देखील मिळतो.

जूस सेंटर किंवा चहाचा स्टॉल असणारे दुकानदार देखील हे करू शकतात. अगदी किरकोळ इन्व्हेस्टमेंट मध्ये चांगला फायदा होऊ शकतो.

२. दुकानातील वस्तु ग्राहकाला सहज दिसतील अशा पद्धतीने ठेवा.

ग्राहक आपल्या दुकानात आल्यानंतर त्याचे सर्वप्रथम लक्ष कुठे जाते ते पहा. तिथे आकर्षक वस्तूंची मांडणी करा. अनेकवेळा डोळ्यासमोर सहज दिसलेली वस्तु ग्राहक खरेदी करतो.

आपल्याकडे काय काय विक्रीला आहे हे नीट दर्शनी भागात ठेवल्याशिवाय ग्राहकाला येथे काय मिळते हे कसे समजणार. समोर दिसल्या की हव्या असलेल्या वस्तूशिवाय इतरही वस्तु सहज घेतल्या जातात.

३. दूसरा ग्राहक घेऊन येणाऱ्याला काही डिस्काऊंट अवश्य द्या.

हा पर्याय ब्युटिपार्लर किंवा कॅफेसाठी बेस्ट आहे. एखादा नवीन ग्राहक कुणाच्या ओळखीमुळे, शिफारसीमुळे आला असेल तर त्या ग्राहकाला तसेच शिफारस करणाऱ्या ग्राहकाला देखील काही सवलत, विशेष सेवा द्या. ह्यामुळे त्या दोघांचाही फायदा होतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त शिफारसी मिळून व्यवसाय वाढण्यास मदत होते.

उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या पार्लर मध्ये आलेल्या स्त्रीला सांगायचं की तुम्ही जर तुमच्या एखाद्या मैत्रिणीला घेऊन आलात तर तुम्हाला १० % सूट मिळेल आणि त्यांनी आणखी कोणाला आणलं तर त्यांनाही १० % सूट मिळेल. अशा तऱ्हेने डिस्काऊंट मिळणार म्हटल्यावर व्यवसाय नक्की वाढतो.

४. ग्राहकाला इतर संतुष्ट ग्राहकांचे उदाहरण नक्की द्या.

एखाद्या ग्राहकाला एखाद्या वस्तूची विक्री करताना ती वस्तु आधी घेऊन संतुष्ट झालेल्या ग्राहकाचे उदाहरण नक्की द्या. एखादी वस्तु महाग असेल तरी तिची क्वालिटी कशी चांगली आहे, ती वस्तु किती टिकाऊ आहे हे समजावून सांगा.

तसेच अशा प्रकारच्या वस्तु किती विकल्या जातात हेही सांगा. त्यामुळे ग्राहक त्या वस्तु विकत घेण्यास तयार होतील. अर्थात ही सर्व माहिती खरी असली पाहिजे. सचोटीने व्यवसाय केला तरच ग्राहक पुन्हापुन्हा आपल्या दुकानात येतात.

५. जे भरपुर प्रमाणात विकले जाते ते सतत दुकानात असुद्या.

सीजनप्रमाणे विकल्या जाणाऱ्या वस्तु किंवा फॅशनमध्ये असणारे कपडे हे सतत आपल्या दुकानात असतील ह्याची खात्री करा. उदाहरणार्थ उन्हाळा आला की कपड्यांच्या दुकानात भरपुर प्रमाणात स्लीवलेस कपडे, कॉटनचे कपडे, शॉर्ट्स असायला पाहिजे. किंवा आइसक्रीमच्या दुकानात भरपूर स्टॉक असला पाहिजे.

ग्राहकाने मागितल्यावर त्या त्या वस्तु आपल्याकडे विक्रीला असणे आवश्यक आहे. अगदीच शक्य नसेल तर ग्राहकाचा फोन नंबर घेऊन स्टॉक आला की तसे जरूर कळवावे. ह्यामुळे ग्राहकाशी पॉसिटीव बॉंडिंग तयार होते.

६. वस्तु निवडायला ग्राहकाला मदत करा.

जर तुमचे एखादे गिफ्ट शॉप असेल किंवा कपड्यांचे शॉप असेल तर ही टीप फार उपयुक्त आहे. गिफ्ट खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना गिफ्ट सिलेक्ट करायला मदत करा. वेगवेगळ्या योग्य वस्तु दाखवा.

किंवा कपडे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना नवीन ट्रेंड सांगून कपडे खरेदीला मदत करा. अशा एक्स्पर्ट मदतीमुळे ग्राहक खुश होतो. शिवाय ऑनलाइन खरेदीपेक्षा डोळ्यासमोर पारखून केलेली खरेदी लोकांना आवडते.

७. छोट्या छोट्या उपयोगी वस्तु समोर ठेवा.

अनेक वेळा अगदी छोट्या गरजेच्या वस्तु लोकांना हव्या असतात परंतु त्या घेण्याचे त्यांच्या लक्षात नसते. अशा वेळी आपल्या दुकानात काऊंटरवर ह्या वस्तु मांडून ठेवलेल्या असतील तर त्या सहजपणे घेतल्या जातात. उदाहरणार्थ स्टेशनरीच्या दुकानात पेन, पेन्सिली, खोडरबर इत्यादि, किंवा कपड्यांच्या दुकानात मास्क, स्कार्फ, टोप्या, रुमाल, सॉक्स इत्यादि

ह्या वस्तु समोर दिसल्या की ग्राहक सहजपणे खरेदी करतात.

८. ग्राहकांना ई रिसीट द्या.

कागदी बिल देण्यापेक्षा जर ग्राहकांना ई-रिसीट दिली तर फक्त कागद आणि पर्यावरण वाचते असे नाही तर आपल्याकडे ग्राहकांचा ईमेल आयडी आणि फोन नंबर देखील येतो.

ह्यावरून आपण आपल्या ग्राहकांचा एक डेटाबेस तयार करून त्यांना नवीन ऑफर्स, सेल ह्यांची माहिती देऊन आपली विक्री वाढवू शकतो.

९. ऑनलाइन विक्रीसाठी प्रयत्न करा.

सध्या जरी दुकाने उघडली असली तरी एकूण पॅनडेमीकच्या काळात लोकांचा कल ऑनलाइन खरेदीकडे वाढत चालला आहे. त्यामुळे आपले दुकान देखील ऑनलाइन विक्री कशी करू शकेल ह्यासाठी प्रयत्न करा.

त्याकरता फेसबुक पेज तयार करणे, व्हाट्सअप ग्रुप तयार करणे असे करून तिथे जाहिरात करा, कुरियरने माल घरपोच पोचवण्याची व्यवस्था करा.

तुमच्या दुकानातला माल दुकानात विक्री करण्याबरोबरच अमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म वरून विकण्याची सुरुवात सुद्धा तुम्ही करू शकता. अमेझॉन सेलर बनण्यासाठी काय करावे ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तसेच ऑनलाइन खरेदी करणाऱ्यांना काही गिफ्ट कार्ड किंवा तत्सम ऑफर द्या. त्यामुळे कोणत्याही काळात आपला व्यवसाय ठप्प न होता सुरूच राहील.

तर ह्या आहेत छोट्या व्यावसायिकांसाठी रोजची विक्री वाढवणाऱ्या काही टिप्स.

मित्रांनो, हा दिवाळी-दसऱ्याचा सण नक्कीच तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येईल. गरज आहे फक्त चिकाटीची आणि स्मार्ट वर्कची!!

all-the-best

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय